Login

साथ स्वतःची (भाग-१०)

Marathi katha, Marathi blog, Sath swathachi, Part 10

     ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अनामिका आणि युक्ती ऑफिस ला जाण्याच्या निमित्ताने निघतात. 
युक्ती:- चल मुग्धा! मी येते... काही दिवस मला स्मृती मावशीच्या घरी राहावं लागेल जरा नवीन प्रोजेक्ट वर काम सुरु आहे... तू इथे छान अभ्यास कर हा! तुझी परीक्षा आठवड्यावर आली आहे.... ऑल द बेस्ट.... 
मुग्धा:- हो गं दिदी! जा तू बिनधास्त... आणि माझी काळजी नको करू... तू कामावर लक्ष दे... बाय बाय... 
अनामिका आता युक्तीला स्मृतीच्या घरी घेऊन येते. 
अनामिका:- स्मृती! तू आज नको येऊ कामाला... मी सगळं बघते.... युक्ती सोबत कोणीतरी हवं ना... मी रोज ऑफिस मधून थोडी लवकर निघेन आणि इकडे येऊन जाईन..
स्मृती:- बरं... मी आता आठवडाभर वर्क फ्रॉम होम करते! आपल्याला काही प्रेसेंटशन्स करायची आहेत ती मी करते आणि तुला मेल करते.... तू कसलीच काळजी नको करुस... आणि विशेषतः युक्तीची तर अजिबात नको! मी घेते सगळं सांभाळून... डोन्ट वरी... 
तीन दिवस होऊन जातात... आज आता युक्तीला पुन्हा चेकअप साठी घेऊन जायचं असत! अनामिका स्मृतीच्या घरी जाते... 
अनामिका:- चला... आवरलं का तुमचं?? आज डॉक्टर कडे जायचं आहे ना... 
स्मृती:- हो आवरलंच आहे.... पण, युक्ती परत झोपली आहे गं! जरावेळ थांबूया... ती उठली कि निघू... किंवा मग थोड्यावेळाने उठवू तिला.. तो पर्यंत बस तू! तसही तुझी या सगळ्यात खूप धावपळ होतेय.... 
थोड्यावेळाने युक्तीला जाग येते... तिघी डॉक्टर कडे जायला निघतात... 
डॉक्टर:- काय मग काय म्हणतोय आमचा पेशंट?... काही त्रास होतोय का?
युक्ती:- हो! खूपच झोप येतेय... आणि खूप अशक्त असल्यासारखं वाटतंय... जेवण पण जात नाहीये.... खूप मरगळ येतेय सारखी.. 
डॉक्टर:- हो ते औषधाने होतंय... मी पुन्हा काही टेस्ट्स लिहून देतोय त्या करा... त्याच्या रिपोर्ट्स वरून पुढचे डोस ठरवू आपण... सध्या भूक लागण्यासाठी टॉनिक लिहून देतोय ते जेवणाआधी दिवसातून तीन वेळा दोन चमचे घे.. याने भूक लागेल आणि जरा फ्रेश पण वाटेल मरगळ नाही येणार सारखी... 
डॉक्टरने सांगितल्या प्रमाणे सगळे उपचार चालू असतात....काही महिने निघून जातात... हळूहळू युक्ती बरी होऊ लागलेली असते. इकडे मुग्धाची नेट/सेट ची परीक्षा सुद्धा होते.... चांगल्या गुणांनी ती पास पण होते आणि एका प्रतिष्ठित कॉलेज मध्ये प्रोफेसर ची नोकरी सुद्धा तिला मिळते... 
       युक्तीच्या या आजारामुळे तिचा लग्नाचा विषय कधीच मागे पडलेला असतो.... तिला जास्त ताण नको म्हणून अनामिका सुद्धा तिच्या कलानेच घ्यायचं ठरवते... अजूनही मुग्धाला या बाबतीत काहीही माहित नसतं! उद्या पासून मुग्धाच्या कॉलेज मध्ये सांस्कृतिक विभागाने आयोजन केलेल्या सगळ्या स्पर्धा आणि नंतर स्पोर्ट्स सुरु होणार असतात. संध्याकाळी चार च्या आसपास मुग्धा घरी येते.... घरी कोणी नसतं! ती तिचं तिचं आवरून दुसऱ्या दिवशीची तयारी करण्यात व्यस्त होते.... संध्याकाळी अनामिका आणि युक्ती घरी येतात... 
मुग्धा:- आई मला उद्या पासून घरी यायला थोडा उशीर होईल आणि लवकर पण जावं लागेल... आमच्या कॉलेज मध्ये आता सगळे स्पोर्ट्स आणि फेस्ट्स सुरु होतायत... निदान आठवडा तरी जाईल यात... 
 बरं चालेल... पण वेळेवर जेवण करत जा... एवढंच अनामिका बोलते... 
        दुसऱ्या दिवशी मुग्धा नेहमी पेक्षा लवकर जाते.... स्मृती आणि अनामिका युक्तीला पुन्हा रुटीन चेकअप साठी डॉक्टर कडे घेऊन जातात.. डॉक्टर तिला तपासतात... 
डॉक्टर:- आता आधी पेक्षा खूप चांगली प्रोग्रेस आहे... लवकरच पूर्ण आजार बरा होईल पण, जास्त ताण किंवा टेन्शन आलं तर ब्रेन ट्युमर होण्याचा धोका आहे.... ती काळजी मात्र घ्या... आत्ताचा जो गोळ्यांच्या कोर्स आहे तोच आपण पुढे चालू ठेवूया... आता तुम्ही पुढच्या महिन्यात या... मग आपण टेस्ट्स करू आणि बघूया पुढे काय करायचं ते...
अनामिका:- बरं! थँक्यू डॉक्टर... असं म्हणून तिघी बाहेर पडतात आणि ऑफिस ला जातात... 
         पुढच्या महिन्यातही सगळं ठीक असत.. रिपोर्ट्स पण अगदी नॉर्मल आलेले असतात.. युक्ती आता हळूहळू बरी होऊ लागलेली असते आणि त्यामुळे नव्या उत्साहाने कामाला सुद्धा लागलेली असते... अशीच काही वर्ष निघून जातात... मुग्धाला सुद्धा पदोन्नती मिळते... तिच्या कॉलेज मध्ये बेस्ट प्रोफेसर ऑफ द इयर च अवॉर्ड सुद्धा मिळतं! कारण असतेच ती सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी मुग्धा मिस... त्या दिवशी सगळे खुश असतात... छान पार्टी वैगरे होते.... दुसऱ्याच दिवशी युक्ती ज्या फॉरेन डेलिगेट्स शी डील करत होती त्यांचा मेल येतो... त्यांना सुद्धा अनामिका क्रीयेशन्स मध्ये गुंतवणूक करायला आवडेल असं लिहिलेलं असत! बऱ्याच महिन्यांची मेहनत आज हे फळ देत असते! यात जास्तीचा वाटा असतो युक्तीचा! तिनेच सगळं प्लॅन करून त्या डेलिगेट्स ना प्रेसेंटशन दिलेलं असत तेही एवढ्या मोठ्या आजाराच्या विळख्यात असताना! हि बातमी येते न् येते तोवर युक्तीचे काही दिवस आधी टेस्ट्स केलेले रिपोर्ट्स सुद्धा येतात आणि डॉक्टर सांगतात; "अभिनंदन! युक्तीने एवढ्या मोठ्या आजाराशी लढा देत यावर मात केली! ती आता पूर्णपणे बरी झालेली आहे!" 
        आदल्या दिवशी मुग्धाच्या यशाची बातमी आणि आज या दोन आनंदाच्या बातम्या! अनामिका आज पूर्णपणे भरून पावते... तिच्या दोन्ही मुलींनी आज समाजात स्वतःच स्थान निर्माण केलेलं असतं! त्यांच्या आईच नाव उज्वल केलेलं असत! आज अनामिकाला तिच्या जीवनाचं सार्थक झालं हीच भावना मनात दाटून येते.... आणि मनात ओळी उमटतात;
आयुष्याच्या वळणावर 
कितीही आले चढ उतार
तरीही नको घेऊस माघार
सहजा सहजी नको पत्करू तू हार
दे आयुष्याला नवा आकार
स्वप्न तुझी तूच साकारणार
विश्वासाचा दे स्वतःला आधार....

समाप्त
(अनामिकाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कथामालिका लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न.. तुम्ही दिलेल्या भरगोस प्रतिसादाला मनापासून धन्यवाद! लवकरच भेटू पुढच्या लेखांमध्ये... )

(वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. यातून कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.)


     

🎭 Series Post

View all