साथ तुझी

This poem is about love

एका क्षणासाठी नाही
प्रत्येक क्षणी तु हवी आहेस
फक्त आयुष्यात नाही
आयुष्यभराची तुझी साथ हवी आहे

रिमझीमती सर नाही
प्रेमाचा मुसळधार पाऊस हवा आहे
फक्त झुळूक नाही
तुझ्या प्रेमाचा गारवा हवा आहे

नजरेचा खेळ नाही
तर मनाला भिडणारी नजर हवी आहे
फक्त हाती हात नाही
तुझं सारं जीवन हवं आहे

केवळ आभास नाही
कायम तु जवळ हवी आहेस
फक्त एका वळणावर नाही
आयुष्याच्या पुर्ण रस्त्यावर तुझी साथ हवी आहे...!!!