Login

तेरा साथ हो तो - भाग - पहिला

sathiya


तेरा साथ हो तो – भाग – १


साधना ते फक्त माझे आईवडील नाही राहिलेत आता. ते आता तुझेही सासू - सासरे होणार आहेत. मी तुला या आधीही सांगिलेले आहे आणि आजही सांगतो. मी वेगळे राहणार नाही. ज्यांनी मला वाढवले त्यांना त्यांच्या म्हातारपणी असे एकटे सोडणे मला पटत नाही आणि पटणारही नाही. माझ्याशिवाय त्यांना कोणीही नाही." दोघी बहिणी त्यांच्या सासरी आहेत.


" मग माझ्याही आईवडिलांना माझ्याशिवाय कोणीही नाहीयेय. मी एकुलती एक मुलगी आहे त्यांची.... मी मुलगी आहे म्हणून माझे घर सोडून तुझ्यासोबत यायचे ?. त्यांना मी खूप नवसाने आणि त्यात उशिरा झाले आहे, त्यामुळे त्यांचेही तसे वय जास्तच आहे, त्यामुळे त्यांना माझा होणारा नवरा हा घरजावईच हवा होता......त्यांना उतारवयात मी नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार..... " साधना म्हणाली... आणि ह्या वाक्यावरून साधना आणि आकाश मध्ये जोरदार वाद झाला...


आकाश च्या मित्राची मैत्रीण ही साधना...... आकाशला साधना आवडायला लागली.. आकाश ने साधना चा मोबाईल नंबर मिळवला, ओळख झाली. बोलणं वाढलं. सवय झाली. एकमेकांशिवाय राहणं कठीण झालं. मनातल्या विचारांना दोघांनी मिळून \"प्रेम\" असे नाव देऊन टाकलं. पाच वर्षाच्या नात्याला घरच्यांनी हॊ नाही करत परवानगी दिली आणि लग्नाची तारीखही ठरवली.


साधना तुला भेटायचं आहे मला तुला आज.भेटशील? रोजच्याच जागेवर. गार्डन मध्ये दुपारी भेटू. येशील ना?" आकाश म्हणाला, "चालेल. येईन मी वेळेवर.- साधना म्हणाली.

दुपारची वेळ. हे दोघं गार्डन मध्ये बसले होते. लग्न होतंय. खरंच नाही वाटतं आहे ना . मी खूप खुश आहे. बोल ना तू का शांत बसलायस? " साधना म्हणाली..

"मीही खूप खुश आहे. पण, खूप खुश असलो ना की काय, कसं, किती आणि कुठवर बोलायचं ते कळत नाही. तसं झालंय माझं. शांत बसून सगळं फील करतोय मी. आकाश म्हणाला.

साधना ..... सुख कधी मोजताच येत नाही ना? खूप मोठं असतं ते.....

" आकाश आपलं मस्त टुमदार घर हवं. फक्त आपल्या दोघांचं. तू ऑफिसला जाशील. जाताना मी दारावरून तुला बाय करेन. . मी घरी संध्याकाळ होण्याची वाट पाहीन. संध्याकाळी दाराशी उभी राहीन. तूही येशील घरी घाईघाईने. आल्यावर घर कसं एकदम उजळून निघेल. सगळं कसं मस्त मस्त असेल ना? " आपल्या दोघांच जग असेल किती छान ना रे ....साधना म्हणाली.


.... अस कधीच होणार नाही आहे समजल तुला......आकाश संतापून बोलला...


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – आकाश – साधना ला कसं समजावतो ते.....)


लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे...
0

🎭 Series Post

View all