Login

झोप सुखाची

समाधान
सुखाची झोप लागत नाही
जोपर्यंत आपले ध्येय
मिळवत नाही.

झोप तर रोजच लागते
शरीराची गरज असते
कष्ट करून दमलेल्या जिवाला
आरामाची नड असते,

थकून झोपलेल्या नयनांना
सुखाची झोप लागत नाही
जगण्याच्या जाणीवेने
झोप मोड ही होत राही,

झोपन्या अगोदर असतात विचार
उठल्यावर ही तेच विचार
करून सारासार विचार
होत नाही मन ही शांत,

काही नाही म्हणून
झोप लागत नाही अन
असले जरी भरपूर परी
सुखाची झोप लागत नाही,

सतत पळत्याच्या मागे
लागून सुख मिळत नाही
आहे त्यात समाधानी असले की
सुखाची झोप लागल्याशिवाय
राहत नाही....