सत्य... भाग - १
मुंबईला पाऊस नवीन नव्हता, पण त्या रात्रीचा पाऊस वेगळा होता. तो रस्त्यांवर नाही, तर माणसांच्या अंतर्मनावर कोसळत होता. रात्रीचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं. कुर्ला येथील एका जुन्या, विसरलेल्या चाळीत अचानक आरडाओरड सुरू झाली.
तिसऱ्या मजल्यावरून खाली धावत येणारा वॉचमन ओरडत होता, “खून झालाय… वर खून झालाय!”
दहा मिनिटांत पोलीस गाड्या, अॅम्ब्युलन्स, पत्रकार आणि कुतूहलाने पेटलेली गर्दी जमली.
दहा मिनिटांत पोलीस गाड्या, अॅम्ब्युलन्स, पत्रकार आणि कुतूहलाने पेटलेली गर्दी जमली.
इन्स्पेक्टर विक्रम देशमुख गाडीतून उतरला. सहा फूट उंच, थोडेसे थकलेले डोळे आणि चेहऱ्यावर कायम असलेली ती गंभीर शांतता, जी फक्त खूप काही पाहिलेल्या माणसाकडे असते. “कोण आहे?” “सर, पत्रकार आहे. नाव प्रिया कुलकर्णी.” हे नाव ऐकताच आरव थबकला. प्रिया कुलकर्णी…
ती गेल्या काही महिन्यांपासून सतत बातम्यांत होती.
भ्रष्टाचार, खोटे मेडिकल रिपोर्ट्स, बनावट एनकाऊंटर,
ती कुणालाच सोडत नव्हती. “दार उघडा.” दार उघडताच… एक सेकंद सगळे स्तब्ध. प्रिया जमिनीवर पडलेली होती. कोणताही संघर्षाचा आवाज नाही.
घर नीटनेटके. म्हणजे हा रागाचा खून नव्हता.

पण भिंतीवरचं दृश्य पाहून विक्रमच्या छातीत धडधड वाढली. रक्ताने लिहिलेलं वाक्य, “तो मीच आहे.” “सर… हे आत्महत्येसारखं नाही,” कॉन्स्टेबल म्हणाला. विक्रम हळूच भिंतीजवळ गेला. रक्त ताजं होतं. अक्षरं मुद्दाम नीट लिहिलेली. “कोणी घाईत लिहिलेलं नाही,” तो म्हणाला.
“हे लिहिणाऱ्याला वेळ होता… आणि सांगायचं काहीतरी होतं.”
“हे लिहिणाऱ्याला वेळ होता… आणि सांगायचं काहीतरी होतं.”
टेबलावर लॅपटॉप बंद होता. फोन गायब. पण एका कोपऱ्यात छोटी डायरी. डायरी उघडली. पहिल्या पानावर फक्त एक वाक्य, “सत्य शोधणं धोकादायक असतं.”
पुढची अनेक पानं रिकामी आणि शेवटच्या पानावर एकच नाव, अनेकदा लिहिलेलं, आदित्य सावेकर.
विक्रमने कपाळावर आठी आणली. “हा कोण?”
पुढची अनेक पानं रिकामी आणि शेवटच्या पानावर एकच नाव, अनेकदा लिहिलेलं, आदित्य सावेकर.
विक्रमने कपाळावर आठी आणली. “हा कोण?”
“सर, मोठा समाजसेवक आहे. NGO चालवतो. राजकीय ओळखी आहेत. क्लीन इमेज.” विक्रम मंद हसला.
“म्हणजेच… याच्यापासून सुरुवात करूया.” पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, मृत्यू आत्महत्येसारखा दाखवता येईल असा होता.
“म्हणजेच… याच्यापासून सुरुवात करूया.” पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, मृत्यू आत्महत्येसारखा दाखवता येईल असा होता.
पण विक्रमला माहीत होतं… हे सगळं खूप नीट आखलेलं आहे. त्या रात्री विक्रम घरी गेला… पण झोप त्याच्यापासून दूर पळत होती. रात्री अडीच वाजता फोन वाजला. “विक्रम देशमुख?” “हो. कोण बोलतंय?” “तुम्ही चुकीच्या फाईल्स उघडताय.” “तुम्ही कोण?” “फक्त एवढंच लक्षात ठेवा… प्रिया ही शेवटची नव्हती.” फोन कट झाला.
दुसऱ्या दिवशी विक्रमने प्रिया चा लॅपटॉप IT टीमकडून उघडून घेतला. एक फोल्डर. फोल्डरचं नाव, “१० वर्षांपूर्वी.” विक्रमच्या बोटांना थरथर आली. फाईल्स उघडल्या. काही रिपोर्ट्स, फोटो, ऑडिओ क्लिप्स.
एका ऑडिओत प्रिया म्हणत होती, “जर मी गायब झाले, तर समजा मी सत्याच्या खूप जवळ होते.” विक्रमचा श्वास अडकला.
एका ऑडिओत प्रिया म्हणत होती, “जर मी गायब झाले, तर समजा मी सत्याच्या खूप जवळ होते.” विक्रमचा श्वास अडकला.
त्याच दिवशी संध्याकाळी बातमी आली, आणखी एक मृत्यू. एक सरकारी डॉक्टर, त्याच पद्धतीने, त्याच भिंतीवर, “तो मीच आहे.” आता हा योगायोग नव्हता.
विक्रमने सगळ्या फाईल्स एकत्र मांडल्या. प्रिया, डॉक्टर… आणि एक जुनी केस. १० वर्षांपूर्वीची. १६ वर्षांची मुलगी.
केस बंद, आत्महत्या घोषित. फाईलच्या वर नाव होतं,
तनया देशमुख.
विक्रमने सगळ्या फाईल्स एकत्र मांडल्या. प्रिया, डॉक्टर… आणि एक जुनी केस. १० वर्षांपूर्वीची. १६ वर्षांची मुलगी.
केस बंद, आत्महत्या घोषित. फाईलच्या वर नाव होतं,
तनया देशमुख.
विक्रमच्या हातातून फाईल खाली पडली. तो बराच वेळ तसाच उभा राहिला. कारण तनया… ती त्याची बहीण होती आणि त्या केसचा तपास अधिकारी… तो स्वतः. विक्रमला जाणवलं, हा खेळ कोणीतरी त्याच्यासाठीच रचला आहे आणि हा खेळ अजून सुरूच होणार आहे.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा