सत्येन देसाई (भाग २)
----------------+ऑफिसमधल्या बहुतेक पोरी सत्येन वर खूष असायच्या. सत्येन ऑफिसच्या कल्चरल ग्रुपचा हेड होता. मी येण्याच्या आदल्या वर्षीच ग्रुपने नाटकाचा प्रयोग केला होता. आय. टी . पण खूष होता. तो सिंधी असला तरी मराठी बर बोलायचा.मराठी नाटक, चित्रपट त्याला आवडायचे.ठरल्याप्रमाणे शनिवारी बोर्ड मिटिंग झाली. सत्येनला टाळून ,मी आणि प्रीतमनि डेटर्स क्रेडिटर्स लिस्ट व चालू असलेल्या प्रोजेक्टस बद्दल एक टिप्पणी तयार केली होती.सत्येन अधून मधून काही मदत हवी आहे का असं विचारायचा.पण आम्ही दोघांनी त्याचा सहभाग कटाक्षाने टाळला.बरोबर सकाळी नऊ वाजता आय.टी आला.तो यायचा तोच मुळी बोंबलत यायचा.पण त्याची भीती किंवा त्याच्या येण्यामुळे कोणत्याही प्रकारचे टेन्शन येत नसे.मी नवीन असल्याने मला थोडं टेन्शन होतं. आजही तो आला तो रिसेप्शनिस्ट लैला पासून ते अगदी मॅनेजर पर्यंत सगळ्यांची वैयक्तिक चौकशी करीतच आला. बाहेरचं हाय हॅलो झाल्यावर तो कॉंफरन्स रुम मध्ये जाऊन तो बसला.थोड्या वेळानी बाकीचे डायरेक्टर्स ,म्हणजे डिसूझा,थडानी,शेजवलकर आणि सोनी पण आले.

लवकरच मिटिंगला सुरुवात झाली.मी आणि प्रीतम आय.टी.च्या मागे बसलो होतो.अजेंड्याप्रमाणे सगळं नीट चालू होतं. थोडे फार हास्य विनोदही चालू होते. मी उभा राहून प्रत्येक मुद्दा व्यवस्थित स्पष्ट करीत होतो. मी चालू प्रोजेक्टसची प्रोग्रेस व भविष्यातील फायदे विशद केले. बहुतेक डायरेक्टर्स नि माना डोलावल्या. डिसूझाला पण ते पटलं असावं. कारण त्याची प्रतिक्रिया काही नव्हती. तो पटलं नाही तरच तोंड उघडत असे. मग प्रीतम उठला. आणि डेटर्स क्रेडिटर्स लिस्टवर बोलू लागला. कंपनी च्या खरेदी विक्रीचाही स्टॅटिस्टिकल डेटा त्याने विशद केला. मग मात्र डिसूझा मध्येच ओरडला., "अरे वो सब छोडो ,पह्यले किसके पास कंपनीका कितना पैसा बाकी है वो बोलो. और आय. टी ., तूने वसुली का क्या किया ये बता. हमेशा पैसा नही पैसा नही करके बोलता है. और तेरा स्टाफ काम नही करेगा तो क्या फायदा? ये देख. (हातातली डेटर्स लिस्ट आय. टी . पुढे नाचवीत म्हणाला) ये लिस्टमे तीन पार्टीज का बाकी पैसा देख. ये नितीन भाय अँड कंपनी के पास अपना २७ लाख है., जिवाजी ब्रदर्स के पास अपना २३ लाख है, और ये शिवा एंटरप्राइजेस के पास अपना १७ लाख बाकी है. सब मिलके ६७ लाख होता है. साला पावना करोड अपना मार्केटमे अटका हुवा है. और तू बोलता है नया प्रोजेक्ट लेलो. कैसी बात करता है रे तू ? . .. "
आय. टी . चिडलेला दिसला. प्रीतम मध्येच म्हणाला, " आमचे वसुली साठी प्रयत्न चालू आहेत. योग्य त्या नोटिसाही बजावल्या आहेत. " पण आय. टी . ओरडून म्हणाला, " अरे ते तुझा नोटीस बाजूला ठेव रे. पैसे का क्या ? तुमने सत्येन को नही बताया ? तुमने ये सब तैयारी किया , सत्येन का रिपोर्ट किधर है. ? प्री तमनि माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, " पण आय. टी . अरे सत्येन आपला लास्ट रिसॉर्ट आहे. " आय. टी आणखिनच भडकून म्हणाला, " तुम क्या बात कर राहा है. अरे ६७ लॅक्स पिछले छे महिने से बाकी है, बा.. की. समझा ? उसका ब्याज कौन देगा ? ( त्याला बहुतेक, " तेरा बाप "? असं म्हणायचं असावं )
मग काय सगळेच डायरेक्टर्स भडकले. सोनी म्हणाला, ( ते आय. टी. ला चांगलच लागलं ) " अरे आय. टी . तू काय कंपनी चालवते का भेलपुरी का गाडी चालवते. ? सिर्फ तेरे पास शेअर्स जादा है इसलिये तू एम. डी. है. "
मग शेजवलकर मागे कसे राहतील ? ते म्हणाले, " जे जे या वसुलीला जबाबदार आहेत त्यांच्या कडून या पैशांचं व्याज वसूल करावं. "
प्रीतमचा चेहरा पांढरा पडला. थडानी फक्त काही बोलला नाही. त्याचं काम परस्पर होत असावं. मग आय. टी विरुद्ध इतर अशी भडकाभडकी सुरू झाली. आय. टी. च डोकं फिरलं. तो ओरडला. " सत्येन को बुलाव. "
आवाज एवढा मोठा होता की सत्येन्ला बोलवायला शिपायाची गरजच पडली नाही. सत्येन स्वतःच दार ढकलून आत आला. आल्या आल्याच आय. टी . ने त्याच्या अंगावर डेटर्स लिस्ट भिरकावली आणि म्हणाला, " सत्येन तू काय काम करतो रे ? तुला काय मी लडकी लोक बरोबर वार्ता करायचा पगार देते काय ? .तुम लोग चरिया हो गया क्या ? ( तुम्ही वेडे झालात काय ? ) छे छे महिना तुम लोग सोता है क्या ? मेरेको ये पैसा तीन दिनमे वसूल करके मंगताहै. समझा. तु रात्री जा ., दिवसा जा, काय पण कर. नाही तर तू आणि प्रीतमचा मी काय करेल सांगता येत नाय. "
मला जरा बरं वाटलं. पण तो पुढे म्हणाला, " इधर साला एम. बी. ए.लोक एपॉइंट केला तरी काय उपेग नाय. तुम दोनो ( मी नाही प्री तम. ) पैसा लाव नही तो तुम दोनो आऊट. " मग त्याने आजची मिटिंग बरखास्त झाल्याचं जाहीर केलं. आणि पुढील मिटींग पूढच्याच शनिवारी ठेवली. मग सगळेच डायरेक्टर्स भडकून बाहेर पडले. रूमच्या बाहेर चहा नाश्ता तसाच होता.
आय. टी . तेवढा थांवला. त्याने मग मी , प्रीतम आणि सत्येन अशी तिघांची मिटिंग घेतली. आधी कोणीच काही बोललं नाही. मग तोच म्हणाला, " मला वाटतं मी तुमच्या तिघांचा काम सुपरवाईज करावा. सत्येन यु आर बिकमिंग अनरिलाएबल. (सत्येन् ने मान खाली घातली.) मी काय सांगतो ते नीट ऐका. तो शेजवलकर हाय ना , तो हाय मराठी माणस, आय ऍम सॉरी, पण तो तुमच्या कडून ब्याज वसूल करणार , घ्येनात ठेवा. काय वाट्टेल ते करून नितीन भाय चे पैशे मला बुधवारी पाह्यजे. गुरुवारी मी फोन करेल. आणि हेच्या पुढे मी हप्त्यातून एक दिवस इथे येऊन बसणार. तुम्हाला पण फ्री सोडून चालणार नाय. निघा आता. " असं म्हणून तो गेला. सत्येन ने काय ठरवलं होतं कोणास ठाऊक. पण आम्ही दोघांनी मात्र सोमवारी एकत्र बसू न याच्यावर सोल्यूशन शोधण्याच ठरवलं.
सोमवार उजाडला. ऑफिसमध्ये सत्येन आलाच नाही.
(क्र म शः )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा