मी आनंदात घरी आलो. सुप्रियाला सांगण्यात अर्थ नव्हता्. ही माहिती प्री तमला कधी सांगेन असं मला झालंहोतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर टेंडर मिळाले नसल्याचे कळले. आय. टी. चा फोन आला. तो भडकून म्हणाला, "विनायक, मैने तो तुमको पहलेही बोला था टेंडर का काम मुझे पसंद नही. आज सुबे दिल्ली ऑफिसका फोन आया था. तुम लोगोने किसी पार्टकी किमत २०० के बजाय २००० लिखी है. पूरा कास्टींग बिगाड दिया तुम लोगोने. सत्येन का ठिक है, वो तो टेक्निकल आदमी नही है. लेकीन तुम्हारा क्या ? भेजनेसे पहले तुमने देखा नही ? तुम को मैने सत्येन का काम सुपरवाईज करनेको बोला था ना? ...... अब बात नही करेगा क्या ? (शेवटी तो त्याचा पर्मनंट जावई होता, माझ्या मनात आलं. )........ मी म्हणालो, " आय ऍम सॉरी . "
"ये तो तू कहेगाही. सॉरी बोल दिया, तेरा काम हो गया. आइंदा टेंडरके लफडेमे पडनेका नही, समझे ? " मी येस सर म्हणून वाद थांबवला. मला सत्येंच्या आगाऊपणाचा राग आला. मला न दाखवता पेपर्स त्याने पाठवले होते.पण मी सत्येनला काही बोललो नाही. प्रीतमला सत्येन जावई असल्याचं सांगितलं. तो त्याला माहित आहे असं म्हणाला. त्यावर त्याने मला ऍलर्ट राहायला सांगितलं. या बाबतीत त्याला आय. टी. ने बंगल्यावर बोलावून झाडला होता. हल्ली नाटकाच्या तालमी कॉंफरन्स हॉलमध्ये चालत. कधी कधी त्या तालमी आय. टी. पण पाहात बसायचा. मी सहज म्हणून एकदा डोकावलो. लव सीन चालू होता. डायरेक्शन आमच्याच स्टाफमधला पिं टो करीत होता. तुन्हाला वाटलं असेल , पिंटो आणि मराठी नाटकाचं डायरेक्शन ? पण तो मराठी ख्रिश्चन होता. तसच नाटकाच्या विषयात त्याला चांगलीच गती होती असं म्हणतात. सगळेच म्हणत म्हणून मीही म्हणतोय. लव्ह सीन मध्ये सत्येन वासंतीला मिठित घेऊन संवाद म्हणतो. संवाद संपला तरी त्याने वाजवीपेक्षा जास्त वेळ तिला धरून ठेवल्याने पिंटो चिडला म्हणाला, " अरे यार , सत्येन धिस इज ड्रामा. बिहेव लाइक ऍक्टर ऍंड नॉट लाइक ऑर्डिनरी मॅन. किती वेळ तिला धरून ठेवतोस ? " मला तो सीन सहन होईना . मी निघून गेलो. नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरला झाला. अर्थातच रंगला. आय. टी. नि सत्येन बरोबर वासंतीचंही कौतुक केलं. त्यांना रोख पारितोषिकंही दिली. काही दिवस तरी नाटकाचा हँगओव्हर ऑफिसमध्ये राहिला.
मग अचानक नितीन भाईच्या माणसानी माझ्या कडे बारा लाखाचा चेक आणून दिला. सत्येन चकित झाला. आय. टि. ने अर्थातच मला कॉंप्लिमेंटस दिले. सत्येन ला ते फारसं आवडलं नाही. एक दिवस प्रतिभाने सांगितलं की रस्त्यावर वासंतीशी सत्येनचं भांडण झालं. वासंती बहुतेक रजेवर जाईल असं ती म्हणाली. मी मनात म्हंटलं , मी बरा तिला रजा देईन पण पुढे काही वेगळच होतं. आधी सत्येन आजारी होता म्हणून रजेवर गेला. त्याचा अर्ज आला होता. मला वाटलं, बरी सत्येन ची अडचण नाहीशी झाली. माझ्या हातात आता बरच होतं. मी वासंतीची वाट पाहात होतो. ती उशिरा आली. मी मुद्दामच काही बोललो नाही. आता सहमाही बजेटचं काम चालू झाल्याने आणि नवीन प्रोजेक्ट मुळे कोणालाही मान वर करायला वेळ नव्हता. असं असून सुद्धा वासंती उशिरा येत होती. एक दिवस ती अशीच उशिरा आली. सही करताना मी तिच्याकडे पाहात होतो. तिची चर्या मला उतरलेली दिसली . आज ती साध्या कपड्यात होती. विशेष मेक अप नव्हता. तरी ही ती मला आकर्षक वाटली . चेहऱ्यावर नेहेमीचा उत्साह नव्हता. काही प्रॉब्लेम असल्यास माणसाची मान आपोआप खाली झुकते, असं माझं निरिक्षण होतं. मी तिला एकदम विचारलं, " वासंती गेले काही दिवस तुझ्या ऑफिसला येण्याच्या वेळा तुझ्या स्व्तःच्या झालेल्या दिसतायत. काही अडचण किंवा काही कारण आहे का? तिने मानेनेच नाही म्हंटलं, म्हणून मी पुढे विचारलं, " पैशाची अडचण असेल तर ती आपण दूर करू या ना . " ती पुन्हा मानेनेच नाही म्हणाली आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर नदेता ति बाहेर गेली. इच्छा असूनही मी तिच्या विरुद्ध काहीही कारवाई करीत नव्हतो. इतर कोणी असतं तर मी त्याला चांगलाच झापला असता. दिवसभर ती यांत्रिकपणे काम करीत होती. नाहीतर तिचा आणि सत्येनचा आवाज मला केबीन मध्ये ऐकू यायचा. दुपारी चार वाजेपर्यंत सगळं काही ठिक होतं. मग एकदम वासंतीला चक्कर आल्याच प्रतिभानं सांगितलं. मी बाहेर आलो. लगेच सगळ्यांनी तिला पाणी मारून शुद्धीवर आणली . तेवढयातल्या तेवढयात कोणीतरी लिंवू सरबत आणून पाजलं. मी डॉक्टरांना बोलवावं असं म्हंटलं. कंपनीचे डॉक्टर राणे खालच्याच मजल्यावर बसत . पण वासंतीने नाही म्हंटलं. त्या दिवशी संध्याकाळी मी तिला टॅक्सीने घरी सोडली. ती प्रभादेवीला एका जुनाट चाळीत राहात होती. टॅक्सी तही ती माझ्याशी काहीही बोलली नाही. कदाचित तिची तब्बेत ठीक नसावी. चाळीजवळ टॅक्सी थांबली. ती पडू नते म्हणून मी तिला हात धरून उतरवली. आणि तिला घेऊन तिच्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोली जवळ पोचलो. तिचा हात गरम लागत होता. तिला ताप असावा. मी वेल वाजवली. एका म्हाताऱ्या बाईंनी दार उघडलं. दोन खोल्यांची जागा असावी. आत जुनाट लाक्डी कपाट होतं. पलंगावर पांघरूण दिसलं. आजी झोपल्या असाव्यात्. जागा अंधारी होती. आजी कमरेत वाकलेल्या होत्या . दातांनी तोंडाची जागा केव्हाच सोडली असावी. त्या विधवा होत्या. मी त्यांना माझी ओळख सांगितली. वासंतीला त्यांच्या ताब्यात दिली. वासंती एकही शब्द बोलली नाही, की आजीही बोलल्या नाहीत. मी आल्याचं त्यांना आवडलेलं नसाव हे स्पष्ट दिसत ह्नोतं. वासंती आत गेली . आणि दरवाजा धाडकन लावला गेला. मी काही पावलं चालत जिन्यापाशी पोचलो. मला आतुन वासंतीचा विव्हळण्याचा आवाज येत होता. आणि आजींचा तारस्वरात आवाज आला, " कार्टे काय करून आलीस. ?......... पूढे ऐकायला मी थांवलो नाही.

मी तसाच घरी गेलो. काय प्रॉब्लेम असावा ? सत्येनशी भांडण झालं कशाबद्दल? पैशा बद्दल ? की आणखी कशा बद्दल ? का सत्येन ने तिचा गैरफायदा घेतला होता? मला तरी हाच विचार पटला. कारण तो करणं सोपही होतं आणि सोइस्करही. कुठुनतरी ते दोघे गंभीर अडचणीत यावेत असं माझ्या मनात घर करून होतं. मला जरा समाधान वाटलं . इतके दिवसांची त्यांची रिलेशन शीप तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. आज मात्र मी सुप्रियाशी घरी गेल्यावर बोललो. सत्येन च नाव काढलं की ति नीट बोलत नसे. ती म्हणाली, " अहो तिला चक्कर आली ना ? मग नक्कीच तिला दिवस असणार. " मला खरतर ते शब्द आवडत होते. पण वरकरणी मी म्हणालो. " मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस . सत्येन च वय जास्त आहे आणि त्याला सून आलेली आहे. " त्यावर ती म्हणाली, " राहिलं. मला काय करायचय. ? मी आपला अंदाज सांगितला. जाऊ द्या. तुम्ही उद्या रजा घ्याल का ? मला डॉक्टर कडे जायचय. "
मी म्हणालो, " आता हे आणखीन काय आहे. तुला दिवस आहेत का ? (माझा खंवचटपणा ) " ती लाजत म्हणाली , " काहीतरीच काय? . " मी तिला आपण रविवारी जाउ असं म्हंटलं. त्यावर ती म्हणाली. " हो रविवारी कोणता दवाखाना उघडा मिळणार आहे तुम्हाला? मी आपली शेजारच्या काकूना घेऊन जाईन. " तो दिवस ती माझ्याशी फार बोलली नाही. मला तिच्यापेक्षा वासंती मध्ये इंटरेस्ट जास्त होता. दुसऱ्या दिवशी वासंती आली नाही. मला ते अपेक्षितच होतं. त्याऐवजी तिचा रजेचा अर्ज आला. तिला पंधरा दिवस रजा पाहिजे होती. आता मी काय करून घेणार होतो. सत्येन नाही वासंतीही नाही. दोघांचं नक्की काय चालू होतं. तुम्ही म्हणाल मला दुसरं काही काम नव्हतं का ? पण मी कामात चालढकल करीत नव्हतो. की माझा स्टाफही करीत नव्हता. सुप्रिया माझी "आउटलेट " होती. सगळ्या रागालोभाचा बळी ती ठरत होती. लहान सहान गोष्टींवरून आमची भांडणं होत होती. अर्थातच तिच्या समजूतदारपणा मुळे ती विकोपाला गेली नाहीत. तसा मी शीघ्रकोपी होतो.
मग काय झालं , कोण जाणे. सत्येन अचानक कामावर येऊ लागला. कामाचं लोड थोडं त्याच्याकडे सरकवलं. पण पूर्वी सारखा तो मोकळा वागत नव्हता. तो थोडा वाकल्या सारखा वाटला. एरवी असा ताठ चालायचा , की तो च जनरल मॅनेजर आहे. कामात त्याचं फारसं लक्ष नव्हतं. मी फक्त त्याचं निरिक्षण करीत होतो. मी प्रतिभाला सत्येन वर नजर ठेवायला सांगितलं. ती स्वतःचं काम सांभाळून हेही काम फार छान करीत असे. सत्येनच्या आजकाल कामात फार चुका होऊ लागल्या. मग मी त्याला एक दिवस त्याला बोलावलं. तो बसला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह पार मावळला होता. तो काही बोलण्याची मी वाट पाहू लागलो. पण तो काहीच बोलला नाही. मग मीच तोंड फोडलं. " सत्येन हल्ली तब्बेत ठीक नसते का? काल तू जी फाईल पाठवलीस त्यातल्या वर्किंग मध्ये एवढ्या चुका आहेत की ते सगळं मला परत करावं लागलं . कॉंपुटरचा वापर करीत नाही का तू ? " तो काहीही प्रतिक्रिया देत न्व्हता. मला खरं तर त्याला वासंती बद्दल विचारायचं होतं. पण मला धैर्य होईना. तो कसा रिऍक्ट होईल काय माहित. मग मी जरा आवाजात कडकपणा आणून म्हंटलं, \"\"तुझ्या सारख्या जुन्या माणसाच्या हातून चुका व्हायला नकोत. तू टेंडर मला न दाखवता तसच कसं पाठवलस ? बुशिंगची किंमत तु दोनशे ऐवजी दोन हजार लिहिलीस. त्यामुळे आपलं टेंडर गेलं. आय. टी. नि मला झापला. समजलं ? तरीही तो काहीच बोलत नव्हता. सत्येन मला तुझ्या वैयक्तिक प्रॉब्लेमशी देण घेणं नाही ( कसं नाही ? ) " एवढं झाल्यावर त्याला कंठ फुटला. " सर, गेले काही दिवस माझी मनस्थिती फार वाईट आहे. "
"हो , पण तू जवळ जवळ महिनाभर रजा घेतलीस, "मी मध्येच बोललो. त्यावर तो काही ही बोलला नाही. मग मीच पुढे म्हणालो, " मि. सत्येन आयदर यू कॉन्सेंट्रेट ऑर प्रोसिड ऑन फर्दर लीव्ह . (खरं तर मला म्हणायच होतं की ऑर यू रिझाइन. पण तो आय. टी. चा पर्मनंट जावई होता. ). " तो काहीही न बोलता आणि माझी परवानगी न घेता उठून गेला. मी सत्येनशी बोलणं सोडलं.
(क्र म शः )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा