मी हे सगळं विसरायच ठरवलं. गणपती होऊन गेले. मी सोलापूरला जाणार होतो. पण जमलं नाही् . हळूहळू दसरा आला . बोनस डिक्लेअर झाला. स्टाफ आणि अर्थातच मी पण आनंदात होतो. सत्येन परत नॉर्मल झाला. फक्त वासंतीची गैरहजेरी जाणवत होती . पाठीत वाकलेला सत्येन परत ताठ चालू लागला. पण त्यात पूर्वीचा ताठा नव्हता. वासंतीला होणाऱ्या मुलाचं ओझं त्याच्या डोक्यावरून उतरलं होतं. ऑफिस व्यवस्थित चालू होतं. मी सृजनशीलचे सगळे रिपोर्ट घरी नेले. इथे ते कोणालाही सापडायला नकोत. म्हणजे सापडण्यासाठी प्रयत्न होणार हे माझ्या लक्षात आलं नाही. म्हणजे कोणितरी माझा खण तपासणार असेल. माणूस जेव्हा भविष्यकाळाच्या तरतुदी करतो तेव्हा त्याने जरा विचारच करावा. पुढील घटनांच्या संदर्भांची मनाला कल्पना असावी. म्हणूनच नकळत असल्या गोष्टी माणूस करत असावा. असो. केवळ एक काळजी घेणं , म्हणून मी हे केलं असं तव्हा तरी डोक्यात होतं. मध्येच एकदा सुप्रियाचा फोन आला . ती मला लगेच घरी यायला सांगत होती. तिला माहित होतं. की मला कामावरून घरी बोलावलेलं आवडत नाही. तिने काय ते फोन वर सांगण्यास नकार दिला. म्हणून मी साडेपाच वाजताच घरी गेलो. (नाही तर नऊ वाजेपर्यंत मी बसत असे. ) मी घरी गेलो आणि बॅग ठेवण्याच्या आतच ती गळ्यात पडली. म्हणाली, "ओळखा पाहू. मी का बोलावलं असेल ? " मला फारसं आवडलं नाही. मी फक्त खांदे उडवले. मला कोडी घातलेली आवडत नसत. तिने आज विशेष मेक अप केला होता. ती म्हणाली, " आज आपण बाहेत जेवायला जाऊ. " मी चिडून म्हंटलं. "हे सांगण्यासाठी मला लवकर बोलावलस ? " .... ती म्हणाली, " अहो गुड न्यूज आहे. " मी म्हंटलं , कसली ? " ति म्हणाली, " अहो तुम्ही बाबा होणार आहात ". मी मग विचार केला, " बाबा ? " तिची अपेक्षा , मी तिच्याइतकाच उत्तेजित होईन. मग ति चिडून म्हणाली, " चला तुम्हाला कशाचचं नाविन् नाही. " माझ्या आवाजात उत्साह आणित म्हंटलं, " काहीतरिच काय? सुप्रिया , धिस इज रियली ए गुड न्यूज. लेट अस सेलिब्रेट. खरच जाऊ आपण जेवायला बाहेर. तिचं समाधान झालं. आम्ही रात्री एका मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो. रात्र फारच छान गेली . बाप होण्याचं फिलींग एवढं आनंददायी असेल याची मला कल्पना नव्हती. असणारच कशी ? लग्नानंतरच या गोष्टी अनुभवण्याची पद्धत आहे, त्यापूर्वी हे सुख कसं लाभणार ?
असो ऑक्टोबरच्या वीस तारखेला वासंती कामावर रुजू झाली. मी तिला माझ्या समोर बसवली आणि म्हंटलं. " वासंती तब्बेतीची काळजी घे. फार ताण घेऊन काहीही करू नकोस. आवश्यक असेल तर रजा वाढव . " मला जरा कीव आली. नाही म्हंटलं तरी माझ्या सदिच्छांचं (? ) फळ तिला अप्रत्यक्षपणे मिळालं होतं. ती थोडावेळ बसली . म्नला वाटतं तिला काहीतरी बोलायच असावं. पण ती म्हणाली, " मी फार आभारी आहे. (अगदीच फॉर्मल) कंपनीने पैशाची मदत केली . म्हणून हे शक्य झालं. खरच फार बरं वाटलं. " आणि ती उठली. मला कसतरीच वाटलं. मी काही पैसे दिलेले नव्हते. आणि तिच्या बद्दलच्या माझ्या भावनाही फार पवित्र होत्या अस नाही. तिने मला कधीच प्रतिसाद दिला नाही. हे माझ्या मनात पक्क बसलं होतं. ऑफिस मध्ये सत्येनची बडबड चालू झाली. पण वासंतीचा आवाज बंद होता. मला का वाटलं कोण जाणे, पण अजूनतरी हे प्रकरण संपलं नसावं, किंबहुना ते संपू नये अशी माझी इच्छा होती. मी , नंतर सृजनशीलला फोन केला , " मला तुमची सर्व्हिस पाहिजे. " तो तयारच होता. त्याच्याकडेही नवीन केस नसावी. मग मी त्याला सत्येन आणि वासंती यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं. फक्त मला लेखी रिपोर्ट नको होते. त्याचा माणुस दुपारी चारच्या सुमारास आला आणि पैसे घेऊन गेला..
सृजनशील कडून तशी मला काही खास माहिती मिळत नव्हती. जवळ जवळ एक आठवडा झाला. मला त्याला आता ठेवण्याची घाई केल्या सारखं वाटू लागलं. त्याच्याकडून सध्या एवढच कळलं होतं की सत्येन जरी बाहेर वासंतीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता तरी ती मात्र त्याच्याशी वोलत नव्हती. तिच्या मनात नक्की काय होतं ते कळत नव्हतं. सृजनशीलने मात्र सत्येन ची न सांगताच घरची सर्व माहिती काढली होती. त्याच्या घरी दिवसा त्याची फक्त बायको असते. त्याचा मुलगा आणि सून दोघेही एकाच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होते. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. मुली चं लग्न एका चार्टर्ड अकौंटंटशी ठरलं होतं. लग्न केव्हातरी फेब्रुवारी महिन्यात होईल. सध्या मात्र त्यांच्या घरात अधून मधून सत्येन आणि त्याची बायको यांच्यत भांडणं होतात. कारण कळू शकलं नाही. दिवस असेच मंद चालले होते. तसं वातावरण बरं होतं. सुप्रिया खूष होती. आमच्या पण डॉक्टरांकडे नियमित फेऱ्या होऊ लागल्या. मला वाटलं ही कथा इथेच थांबते की काय? पण सत्येन ला केलेल्या कर्माची किंमत द्यायलाच हवी. निदान माझी तरी तशी इच्छा होती.
आणि एका रात्री अकरा वाजता मला सृजनशीलचा फोन आला. सुप्रिया नुकतीच झोपली होती. मी बाल्कनीत जाऊन बोलू लागलो. "सर एक महत्त्वाची बातमी आहे. आजींनी पुष्कळ समजाऊन सांगितलं तरिही वासंती दोन मोठ्या बॅगा भरून रात्रीच सत्येनच्या घरी राहायला गेली. सर मी आता दोन माणसं कामाला लावलेली आहेत. एक वासंतीच्या घरावर आणि दुसरा सत्येनच्या घरावर नजर ठेऊन आहे. सत्येनच्या घरावरचा माणूस म्हणाला, की सत्येनने वासंतीला धक्का बुक्की करून घालवण्याचा प्रयत्न केला. सर त्यांचं काय बोलणं झालं ते सांगू का ? तुम्हाला बोअर तर होत नाही ना? " मी म्हंटलं. " नाही नाही, इट इज इंपॉर्टंट. " " सर, वासंती सत्येनच्या घरी राहणार आहे म्हंटल्यावर , सत्येन आणि त्याच्या बायको मध्ये भांडण चालू झालं. सत्येन म्हणाला , अगं वासंती वेडीबिडी झालिस का काय? इथे राहणं कसं शक्य आहे. ? . व्हॉट नॉनसेन्स ?. वासंती म्हणाली, ते मला काही माहित नाही. हा विचार तू पुर्वी करायचा होतास. तू , पोलिसांना बोलावलस तर त्यांना तुला सगळं सांगावं लागेल. त्यावर सत्येनची बायको म्हणाली,तुम्हाला काही लाज लज्जा वगैरे नाही का ? तुमच्या या अशा वागण्या मुळे सुषमाचं (त्याच्या मुलीचं नाव) लग्न मोडलं नाही म्हणजे मिळवलं. इतके दिवस आम्ही हे सगळं ऐकून होतो. पण या थराला गोष्टी जातील असं वाटलं नाही. आणि काय ग भवाने तू इथे कशी राहणार ? . वासंती म्हणाली, तो तुमचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने हेच सोल्यूशन आहे. सत्येननी मला सांभाळायलाच हवं. तुमच्या नवऱ्या मुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला. यांनी माझ्या मुलचा जीव घेतलाय. त्यावर बायको म्हणाली, अगं निर्लज्ज मुली तुला काही शरम वगैरे वाटत नाही का ? . मग वासंती त्वेषाने म्हणाली, तुमच्या नवऱ्याने कोणती शरम बाळगली ,? हे सर्व करताना . ती सत्येनच्या बायकोला धक्का मारून आत शिरली सर. घरात सत्येनचा मुलगा आणि सूनही उभे होते. नंतर दरवाजा लागला सर."
(क्रमशः)

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा