Login

सत्येन देसाई (भाग ५)

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे गेलो....

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. सत्येनसहित सर्व स्टाफ वेळेवर हजर होता. वासंती मात्र मला दिसली नाही. मला जरा बरं वाटलं. ती उशिरा आली म्हणजे तिला झापता येईल. मी कामाला सुरुवात केलि. थोड्याच वेळात सत्येन माझया कडे दोन तीन वर्तमान पत्रे घेऊन आला. आम्ही दोघांनी काही टेंडर नोटिसावर चर्चा केली . शेवटी दिल्लीचे ट्रान्सफॉर्मर पुरवण्याचे टेंडर भरण्याचे ठरवले. सर्व कॉस्टिंग वगैरे करून पेपर्स तयार केले. दिल्लीला आमचे एरिया ऑफिसही होते. तिकडे सर्व पेपर्स टाईप वगैरे करून , आय. टी. च्या सह्या घेऊन पाठवण्याची सत्येननी जबाबदारी घेतली. मग मी आय. टी. ला फोन केला. तो म्हणाला की ती तुमची दोघांची जिम्मेदारी आहे, मला काही ही विचारू नका. सत्येन ने सर्व पेपर्स उचलले आणि तो केविनचं दार ढकलून जाऊ लागला. त्याचवेळी नेमकी वासंती आत शिरत होती. ती त्याच्याकडे पाहून गोड हासली . तोही हसत हसत बाहेर गेला. सही करण्यासाठी तिने मस्टर मागितला . केबिनचं दार लागल्यावर मी तिला तो दिला. ती सही करायला वाकली. मी तिचं निरिक्षण करीत होतो. तिनी आज सरबतीकलरचा ड्रेस घातला

होता.केसात त्याच रंगाची फुलं माळली होति. मला खरं तर राग आला होता. पण मी स्वतःवर ताबा ठेवित म्हंटलं, " अगं सव्वा अकरा वाजल्येत. " ती सही करायची थांबून म्हणाली, मला आज डॉक्टरांकडे जावं लागलं".

मी आवाजात उसनी सहानुभूती आणत म्हंटलं, " अगं तब्बेत ठिक नाही तर रजा घ्यायची. "मला तिनं लावलेल्या सेंटचा वास येत होता, मी, तो कालचाच होता की काय या विचारात असताना ती , माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता केबिनबाहेर पडली देखिल.

मग, असेच काही महिने गेले. सत्येन आणि वासंती जास्तच जवळ येत चालले होते. केबीन बाहेर काय चालतं याची इथंभूत बातमी तिची मैत्रीण प्रतिभा मला देत होती. मध्यंतरीच्या काळात सत्येन आणि वासंती यांनी दोघांनी सलग तीन दिवस दांड्या मारल्या. नंतर कळलं की सत्येन ऑफिस स्टाफचं एक नाटक बसवीत होता. नाटक होतं , "नका सोडून जाऊ रंगमहाल". लेखक नवीन होता असं कळलं. आय. टी . पण त्यांना उत्तेजन देत होता. एक दिवस आय. टी. नि मला सांगितलं की नितीन भाईंना एक नवा प्रॉडक्ट लाँच करायचा आहे, त्याबद्दल मी त्यांना भेटून माहिती द्यावी. मी लगेच तयार झालो. कारण मला सत्येनने त्यांच्याकडून वसुली कशी केली , ते समजून घ्यायचं होतं. मी एका शुक्रवारी सकाळी भेटी ची वेळ ठरवली. सकाळी अकरा वाजता मी त्यांच्या वडाळ्याच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांच्या केबीन वर नॉक करून मी आत शिरलो. केबीन कसली तो एक ए. सी . मिनी हॉ लच होता. नितिनभाई स्वतः उठून माझ्या स्वागतासाठी पुढे आले. आम्ही हात मिळवला मी त्यांच्या समोरच्या खुर्चित स्थानापन्न झालो. ते साधारण पन्नास बावन वर्षाचे होते. ते टिपिकल गुजराथी किंवा जैन व्यापारी दिसतात तसेच दिसत होते. पण चेहरा आनंदी होता. उंची बेताचीच. गोरा गुबगुबीत चेहरा. केस थोडे पांढरे झालेले दिसत होते किंवा ते रंग लावीत असतील तर थोडासा रंग उडालेला होता. पांढरा खोचलेला शर्ट, ब्राउन पँट, लाल टाय. डोळे बारिक पण एक प्रकारची मिस्किल झाक असलेले. ओठ थोडे पानानी रंगलेले. एका हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या आणि एका हातात किमती घड्याळ.

आम्ही कामाला सुरुवात केली. त्यांना हवी असलेली टेक्निकल माहिती मी सांगत होतो. ते अधून मधून नोटस काढित होते. ऐकताना ते फार कमी बोलत होते. ते खूष दिसले. मी त्यांना त्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगची ही माहिती दिलि. तेवढ्यात रिसेप्शनिस्टचा फोन आला की कोणी तरी भेटायला आलेलं आहे. ते म्हणाले, "टेल हिम आय ऍम इन ए मिटिंग. कमसे कम अडदो कल्लक तो लागे छे . जरा चाय नि बिस्किट भेज दो . "

मग ते गोड हासत म्हणाले, "विनायक तू दुसरा कंपनी का खोजते नाय ? तू तो बी . ई ,. मेकॅनिकल छे . "

मी सध्यातरी तसा विचार नसल्याचे सांगितले. मग मी विचारलं, " एक विचारू का ? अरे विचार नि ., परमिशन काय मांगते " तरी पण मी घाबरत विचारलं, " तुम्ही बारा लाख देणार होतात त्याचं काय झालं.? \"मला माहित आहेकी मी त्यासाठी आलो नाही. सत्येन कडे ते काम आहे. एरव्ही पण तुम्ही पंधरा लाख दिलेच असते नाही का ? राग मानू नका. "

ते थोडे गंभीर झाले. म्हणाले, " त्याचा काय आहे विनायक मी कधी बी कोणाला पण दुख देते नाय. पण हे तू ध्यानमा रख, सत्येन है ना एकदम चालू माणस छे. हे पैशासाठी काय पण करेल. तेचा मार्केटमधला रेपुटेशन जाणे छे ना ? जवा दे. पंधरा बिस लाख तो मिनी दिलाच असता. पण तू मला सांग कोणाचा जमाई जर तुझा पाव पकडेल तर तू काय करेल?. " मी नाही समजलो, " मी मध्येच म्हंटलं. त्यावर ते म्हणाले, " सत्येन आय.टी. चा जमाई हाय माह्नित हाय तुला ? और एक बार जमाई होते ना तो साला पर्मनंट जमाईच राहते. त्यानी माझ्या पाव पकडला. वो गिडगिडाया, रोया . म्हणून तर मी पैसा दिला. तुझा तो आय. टी. हाय ना एक नंबर साला कमीना आदमी हाय. " मला बाकी काही नको होतं. सत्येन आय. टी. चा जावई . ही बातमी मला नवीन होती. मला गप्प पाहून ते म्हणाले, " तुला खबर नाय ? अरे, आय. टी. ना डिक्री हती ना रिंकी , एटलो सत्येन ना बायडी हती. तेचा बी मरण जाला. एक लडका बी था. वो भी साला गुजर गया. "

मग चहा बिस्किटं आली. आम्ही ती संपवली. गप्पा मारल्या. मी त्यांना उरलेल्या बारा लाखांबद्दल विचारलं, ते एक दोम दिवसात चेक पाठवून देतो म्हणाले. . "

मी निघालो, माझ्याजवळ फार महत्त्वाची माहिती होती. म्हणजे सत्येन नि दुसरं लग्न केलं असणार, आणि या फार जुन्या गोष्टी असणार. म्हणूनच आय. टी . त्याला सारखा फेवर करतो. "एक बार जमाई पर्मनंट जमाई. " हे मला पटलं.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all