सावर रे... (भाग २)

Short and sweet love story.. who have a romance, drama and tragedy

© शुभांगी शिंदे


इथे बर्थडे पार्टी संपवुन काही दिवसांच्या आतच कबीरच्या इच्छेनुसार ते दोघे रजिस्टर मॅरेज करतात… आज कायाला सगळं खर सांगून टाकू असे दिपक कबीरला सुचवतो पण कबीर टाळाटाळ करतो… कबीरला कोणाचातरी फोन येतो आणि तो तडक काहीही न सांगता निघून जातो… जाताना दिपकला कायाची काळजी घेण्यास सांगतो….


आता पुढे....


सावर रे... (भाग २)

कबीरची फ्लाईट दुबईत लँड होते… कबीरच्या आईनेच त्याला अर्जंट बोलावून घेतलं होतं… कारण प्रश्न नेहाचा होता… नेहाला एका मुलाने मागणी घातली होती… मागच्या जीव देण्याच्या प्रसंगानंतर सगळेच तिची आधीपेक्षा जास्त काळजी घेत होते…

इथे येऊन सगळयांना भेटून कबीरला खूप बर वाटत… नेहाला म्हणजे आपल्या लाडक्या दी ला एवढ खुश बघून तो अजूनच सुखावतो…

दी तुला आनंदी बघुन मला खूप…. खूप…. खूप बर वाटतय…. I am so much happy for you….

Who’s the lucky guy???  I’m so excited to meet him…..

नेहा : ते बघ आलेच (अस म्हणत नेहा पुढे जाते)

कबीर नेहाच्या दिशेने वळतो…. समोरच्या व्यक्तीला बघून त्याला शॉकच लागतो…. राजेश!!!!

राजेश पण कबीरला इथे बघून आश्चर्यचकित होतो….

नेहा दोघांची एकमेकांना ओळख करून देत सांगते की … कबीर राजेश मला दुबईत त्याच्या बिझिनेस टूअरवर असताना कॅफेमध्ये भेटला… आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि हा तेव्हापासून माझ्यावर प्रेम करतोय पण त्याने कधी सांगितलं नाही मला कारण त्यावेळी माझ  दुसऱ्या कोणावर प्रेम होत… त्याच मुलाने मला दगा दिला…. पण राजेशने मला या दुःखातून सावरायला मदत केली आणि कालच लग्नाला मागणी घातली… आणि म्हणूनच तुला आईने लगबगीने बोलावून घेतलं…. पण तुम्ही दोघे एकमेकांना कसे ओळखता????

कबीर : (अजूनही शॉकमध्ये. . काय बोलाव काहीच सुचत नाही)

राजेश : नेहा ते आपण नंतर बोलु… कबीर थकून आला आहे .. त्याला आराम करु देत…. (कबीरचा चेहरा ओळखुन)

राजेश कबीरला घेऊन टेरेसवर जातो….

कबीर त्याची हात जोडून माफी मागतो… राजेश माझा गैरसमज झाला… नेहा दीला दगा देणारा तुच आहे असं समजून एक भाऊ म्हणून होणारा त्रास तुला देण्यासाठी आलो होतो….

राजेश : काय??? म्हणजे तु कायाला???

कबीर : नाही नाही…. मी कायाला फसवल नाही किंवा काही त्रासही दिला नाही… फक्त खर काय ते लपवून ठेवल… पण प्रेम मात्र खर केल… तिला मागणी घालताना व्यक्त केलेल्या एकुण एक भावना खऱ्या होत्या … दी ला झालेल्या त्रासाची शिक्षा मला तिला द्यावीशी नाही वाटली…. कारण त्यात तिचा काहीच दोष नव्हता…. म्हणून मी नंतर माझा निर्णय बदलला…

राजेश : (मोठ्या समजुतीने) जे झालं ते झाल… हे आता आपल्या दोघांतच ठेव… कोणाला काही सांगायची गरज नाही….

कबीर मनातून समाधान व्यक्त करतो…. आणि नात्यात कोणतही गुपीत असू नये म्हणून कायाला विश्वासात घेऊन सगळं खर सांगण्याचा निर्णय घेतो….

---------------------------------------------------------------------

राजेश आणि कबीरची सगळी फॅमिली भारतात परतात…. घरी आल्यावर तो थेट कायाला भेटायला आपल्या फ्लॅटवर जातो आणि दिपकला पण बोलावून घेतो… दिपक आधीच तिथे हजर होतो… काया मात्र कुठेच दिसत नाही… कबीर दुबईत माहित पडलेल सगळं सत्य दिपकला सांगतो आणि काया कुठे आहे अशी विचारणा करतो…

दिपक : कबीर खूप उशीर झाला रे….

कबीर : (मनात धडकी भरत) म्हणजे???

दिपक : माहीत नाही पण तिला हे सगळं कसं कळाल?? ? तु गेल्यावर तिने मला सगळं विचारलं… मी तिच्यापुढे काहीच बोलू शकलो नाही… तुला जाब विचारण्यासाठी ती रागात इथुन निघाली… तु इथे नाही म्हटल्यावर मग भावाच्या घरी जाण्यासाठी निघाली…. आणि…. .

कबीर : आणि काय?? दिपक !!! (खूप टेंशनमध्ये)

दिपक : she got an accident कबीर…

कबीर : नाही…. हे नाही होऊ शकत…. (जबरदस्त शॉक लागून) तु तिला का नाही थांबवलस??…. आणि आम्हाला का नाही सांगितलं??? आता कुठे आहे ती???

दिपक : तीची गाडी नदीत सापडली… पण तिचा काहिच पता नाही लागला… मी फोन केला होता राजेशला पण तो इथे नव्हताच… आणि तुझाही काहीच ठाव नव्हता….

कबीरला दिपकच काहीच बोलन ऐकू येत नव्हत…. तो तसाच ढोपरावर खाली कोसळला… आणि जोर जोरात कायाच नाव घेऊन रडू लागला….

-------------------------------------------------------------------------

बघता बघता दिड वर्ष सरून गेल… कायाचा काहिच पता लागत नव्हता… कबीर कायाच्या आठवणीत नुसता झुरत चालला होता… गर्दीत असूनही नसल्यासारखा होता… तिच्या आठवणी विसरण्यासाठी कामात झोकून दिलं होतं त्याने स्वतःला पण रिकामी घर त्याला खायला उठत होत… राजेश आणि नेहानेही आपल्या सोबत राहण्यासाठी खूप समजावल… पण स्वतःला शिक्षा म्हणून तो एकटा राहत होता… खर तर त्याला आता एकांत हवा होता… दिवसभर अॉफीस आणि संध्याकाळी कायाचे स्केचेस काढण्यात मग्न असायचा…


एकेदिवशी आॅफीसच्या नवीन प्रोजेक्टमुळे निघायला त्याला उशीर झाला… अस पण घरी वाट बघणार कोण आहे म्हणून तोही कामात व्यस्त झाला… बाहेर जोरदार पाऊस पडत होता… जागोजागी पाणी भरत होत… आॅफीसचा अर्धा स्टाफ आधीच निघून गेला होता… फक्त प्रोजेक्टशी निगडित लोक आणि इतर काही स्टाफ अॉफीसमध्ये थांबून होते… पाऊस इतका जोरदार होता की आॉफीसचा एक मजला पूर्ण पाण्याखाली गेला… बरेच लोक अडकून पडले होते…

रेवाही आॅफीसमध्ये थांबून होती… काम संपवून सगळे निवांत झाले… इकडे कबीर केबीनमध्ये येऊन चेअरवर मागे टेकून डोळे मिटून शांत पडतो… इतक्यात रेवा आत येते…. आणि कबीरच्या केसात आपला हात फिरवते… (मनातून रेवाला कबीर खूप आवडत असतो)

कबीर : (दचकून) काय करतेस???

रेवा : कॉफी आणली होती तुमच्यासाठी… तुम्ही थकला असाल ना खूप…????

कबीर : बर केलस कॉफी आणलीस…

रेवा : बाहेर पाऊस किती छान पडतोय ना… अगदी रोमँटिक… (आपल्या हातातील कॉफीचा घोट घेत)

कबीर : (रोमँटिक शब्द ऐकून भरून आल्यामुळे) तुझ झालं असेल तर तु जाऊ शकते…

रेवा : (त्याचा मूड ठीक करण्यासाठी) सर… या पावसात गाणी ऐकायला आवडतात का तुम्हाला??? थांबा मी रेडिओ लावते…

बोलता बोलता तिने तिथल्या म्युझिक सिस्टिममध्ये रेडिओ आॅन केला.. FM वर छान छान गाणी सुरू होती.. कबीरने वैतागून रेडीओ बंद करण्यास सांगितला.. इतक्यात आतिफ असलमच गाण वाजू लागल… कलियुग चित्रपटातल… रेवाला ते गाणं चालू ठेवत खंबीर तिला बाहेर जाण्यास  सांगतो… आणि आपल पाकिट बाहेर काढून त्यातल्या कायाच्या फोटोला न्याहाळत तो त्या गाण्यात हरवून  जातो ….

आ…. आ….
जुदा होके भी, तू मुझमें कहीं बाकी है
पलकों में बनके आंसू, तू चली आती है
जुदा होके भी..

वैसे जिंदा हूँ मैं ज़िन्दगी, बिन तेरे मैं
दर्द ही दर्द बाकी रहा है सीने में
सांस लेना भर ही यहाँ जीना नहीं है

अब तो आदत सी है मुझको ऐसे जीने में
जुदा होके भी, तू मुझमें कहीं बाकी है

पलकों में बनके आंसू, तू चली आती है
जुदा होके भी..

गाण ऐकता ऐकता कधी झोप लागते कळतच नाही त्याला… सकाळी जाग येते तेव्हा लक्षात येत की काल तो इथेच झोपून गेला.

हात पाय ताणून एक आळस झटकून तो फ्रेश होण्यासाठी जातो… आणि परत आपल्या केबीनमध्ये येतो… केबिनच्या मोठ्या काचेतून बाहेरची परिस्थिती पाहत असतो… पाऊस बऱ्यापैकी थांबला होता… जमलेले पाणी ओसरत चालले होते…

रेवाही आता निघण्याच्या तयारीत होती… निघण्या आधी कबीरला भेटायला आली…

रेवा : (दार उघडून आत येत) Good morning Sir… Your morning coffee is here…

कबीर : (अजूनही बाहेरच्या वातावरणात मग्न) हममम्

रेवा डेस्कवर कॉफी कप ठेवतच असते तोच तिची नजर कबीरच्या पर्स मधल्या फोटोवर जाते…

रेवा : Ohh my god…. हि तर मधू आहे… सर तुम्ही ओळखता हिला… I am her biggest fan… She’s owsom…

कबीर : (मागे वळून) काय बोलतेस रेवा?? आणि कोणाबद्दल???

रेवा : तुमच्या पर्समध्ये मधूचा फोटो आहे मी त्याबद्दल बोलतेय…

कबीर : (थोडा गंभीर होत) मधू??? (एक नजर रेवावर टाकत)  ही तर काया आहे….

रेवा : कोण काया?? I am sure हि मधूच आहे…. Wait I will show you…

अस म्हणून रेवाने आपला मोबाइल काढला आणि Face book application आॅन केल… आणि कबीरला काहीतरी दाखवु लागली…

रेवा : हो… मधूच आहे ही हे काय… बघा ना…

कबीर : (अंधारात आशेची किरण सापडल्याप्रमाणे रेवाच्या हातातला मोबाईल घेतो… आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो… ) काया!!!!….. (नाव घेताना कंठ दाटून आला होता…. डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते)

रेवा : (अजून पुढे सांगू लागली ) सर पंधरा दिवसांनी कॅलिफोर्नियात Art festival आहे …. मधूचा मोठा फॅन क्लब आहे त्यांनीच या इवेंटबद्दल FB वर पोस्ट टाकली आहे… मधूचा स्पेशल शो आहे तिथे… As a guest म्हणून…. काय सुंदर guitar वाजवते ती… Outstanding…. जादू आहे तिच्या बोटांत….  Social media मुळे फार कमी वेळात नावारुपाला आली आहे ती… मी पण तिला फॉलो करते…

कबीर : (तिला बघून मनात विचार करत) हि मधू नाही माझी कायाच आहे… मी येतोय काया …. आता तुला कुठेच जाऊ देणार नाही….

रेवा कबीरला भानावर आणते तस कबीर तिला त्याची तिथे जाण्याची अर्जंट व्यवस्था करायला सांगतो.. त्याप्रमाणे रेवा त्याची फ्लाईटची टिकीट आणि हॉटेल बुकिंग करण्याच्या तयारीला लागते.. ती केबिनमधून बाहेर पडणार तोच कबीर तिला गळ्यात भेटून थँक्स म्हणतो… ती नजरेनेच रिस्पॉन्स देत निघून जाते….

कबीर आज भलताच खुश होतो… त्याच्या पुढे आता कायाच काया त्याला दिसत होती… सगळी तयारी करून कबीर एकदाचा तिथे पोहचला… हॉटेलवर न जाता त्याने आपल सामान ड्रायव्हर मार्फत हॉटेलवर पोचत केल आणि स्वतः डायरेक्ट कँपसमध्ये गेला जिथे काया अर्थात मधूचा म्युझिक गृप असतो….

ब्लू जीन्स, क्रीम कलरचा टी शर्ट, त्यावर ब्राऊन लेदर चा जॅकेट… डोळ्यांवर गॉगल… हातात स्पोर्ट्स वाॅच… पायात गम बुट… एकदम stunning look… कँपसमधल्या मुली तर त्याच्यावरच नजर ठेवून होत्या… पण कबीरची नजर तर कायाला शोधत होती… इतक्यात त्याला guitar ची धून ऐकायला येते….

पहला नशा, पहला खुमार 
नया प्यार हैं नया इंतज़ार 
करलूँ मैं क्या अपना हाल
ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार
तू ही बता

(उड़ता ही फिरूँ इन हवाओं में कहीं
या मैं झूल जाऊँ, इन घटाओं में कहीं ) – २
एक करलूँ आसमान और ज़मीन 
अब यारो क्या करूँ क्या नहीं 
पहला नशा, पहला खुमार …

Guitar ची धून ऐकताच सगळे तिथे जमा व्हायला लागतात. कबीरसुद्धा त्याच दिशेने जातो…कँपसच्या मध्यावर गोल चौथरा असतो… तिथे समोर एका चेअरवर बसून काया guitar वाजवताना त्याला दिसते… तो डोळ्यांवरचा गॉगल काढत तिलाच बघत बसतो… आसपासचे लोक धक्का मारून पुढे जातात तरी तो तिला बघण्यात गुंग असतो… आज कितीतरी महिन्यांनी तो तिला पाहत असतो… तितकीच सुंदर… तितकीच गोड… तितकेच निरागस भाव तिच्या चेहर्‍यावर त्याला दिसतात…

गाण संपताच सगळे टाळ्या वाजवून तीच कौतुक करतात.. आजची तिची प्रॅक्टिस संपलेली असते.. हळूहळू गर्दी ओसरल्यावर कबीर आनंदाच्या भरात तिला “काया” हाक मारत तिच्या समोर उभा रहातो… तिची नी त्याची नजरभेट होते… पण तिच्यासाठी कबीर अनोळखी असतो….. सॉरी…. I am not काया… My name is मधू…. पण कबीर मानायला तयार नसतो त्यामुळे तीचे आसपासचे फ्रेंडस त्याला पकडून दूर करतात… आणि तिथून हटकतात… तो तिच्या नजरेत नजर घालून बघत असतो…. न जाणो त्याच्या नजरेने तिच्या मनात काय भरल… तिने तिच्या फ्रेंडसना त्याला मोकळ सोडण्यास सांगितले आणि ती तिथून निघून जाऊ लागली… कबीर आपल जॅकेट सावरत तिच्या पाठमोर्‍या आकृतीला डोळ्यात साठवत होता….

कबीर हॉटेलवर जाऊन फ्रेश झा़ला आणि बेडवर निवांत पडला…. आपल्या कायाला आठवत… तिचाच विचार करत झोपी गेला… रोज तिला भेटण्यासाठी कँपसमध्ये जात होता… आर्ट फेस्टिवल पुढचे पाच दिवस चालणार होत… काया कडून काहिच रिस्पॉन्स येत नाही म्हणून कबीर थोडा अपसेट असतो… पण मनातील इच्छा शक्ती मजबूत असते… आज फेस्टिवलमध्ये होणार्‍या पेंटिंग स्पर्धेत तो भाग घेतो…

तो पेंटिंग काढत असताना एव्हाना त्याच्या भोवती बरीच गर्दी जमा होते… त्याने कायाला पहिल्या भेटीत जस पाहिल होत… तिच जे सौंदर्य बघून तो घायाळ झाला होता आणि प्रपोज मारताना पण जे पेंटिंग त्याने तिला दाखवल होत… आज परत तेच हुबेहुब उतरवल होत त्याने… कायाच पेंटिंग बघून तिचे चाहते आणखी गोळा झाले… गर्दी आणि लोकांना आकर्षित होताना बघून तीही उत्सुकतेने तिथे गेली… पेंटींग बघून ती आवासून उभी राहिली… कबीरला वाटल निदान हि पेंटिंग बघून तरी ती चलबिचल होईल पण नाही… कायाने अर्थात मधूने पेंटिंगच कौतुक करत त्याला मिठी मारली आणि तिथून निघून तिच्या फँनस् च्या घोळक्यात बिझी झाली….. पण तिने मारलेल्या मिठीने कबीर शहारून गेला.. पण ज्यासाठी येवढ केल तिला त्यातल काहीच कळल नाही… तरीही तिच्या थोडथोडक्या प्रतिसादामुळे त्याला थोडा का होईना पण आनंद मिळत होता… तिला घोळक्यात बघताना त्याच्या मनात एक गाण वाजत होत आणि तो त्या गर्दीत तिलाच न्याहाळत होता…

जिसे ज़िन्दगी ढूंढ रही है…क्या ये वो मक़ाम मेरा है..
यहाँ चैन से बस रुक जाऊं
क्यूं दिल ये मुझे कहता है
जज़्बात नये से मिले हैं
जाने क्या असर ये हुआ है
इक आस मिली फिर मुझको
जो क़ुबूल किसी ने किया है

किसी शायर की ग़ज़ल
जो दे रूह को सुकूं के पल
कोई मुझको यूँ मिला है
जैसे बंजारे को घर
नए मौसम की सहर
या सर्द में दोपहर
कोई मुझको यूँ मिला है
जैसे बंजारे को घर

संध्याकाळ झाली होती… कबीर कँपसच्या बाहेर गार्डनला लागुन असलेल्या एका बेंचवर बसला होता… समोर मोकळा रस्ता… त्या दिवसाचा इवेंट संपल्यामुळे रस्त्यावर रहदारी कमी होती.. मावळतीला येणाऱ्या सूर्याचा तांबडा प्रकाश…. मोकळ आभाळ आणि गार अशी मंद हवेची झुळूक मनाला तजेला देत होती… कबीर बेंचवर बसून आपल्या पर्स मधल्या कायाच्या फोटोला न्याहाळत होता… त्याची मान खाली झुकलेली होती… अचानक गार वारा सुटला… तो बसला होता त्या बेंच शेजारी मोठ झाड होत… लाल, पिवळ्या फुलांनी बहरलेल… वाऱ्याच्या लहरींचा स्पर्श होताच त्याची फुल गळुन पडत…

कबीरला कोणीतरी आपल्या जवळ असल्याचा भास झाला त्याने बाजूला पाहिल तर शेजारी काया बसली होती.. त्याची तिची नजरभेट होताच गोड हसली ती…

काया : Hiiii (हलकेच हात हलवून)

कबीर : Hiii…( जीव तुटत होता त्याचा कारण आपलीच व्यक्ती अनोळखी असल्याप्रमाणे ओळख देत होती)

काया : Nice painting… ( बोलायला सुरुवात करावी म्हणून )

कबीर : Thanks (हलकेच हसून)

थोड्यावेळ कोणीच काही बोलत नाही… तिला अस जवळ बघून मन भरुन आलं होतं… वाटत होतं की तिला आत्ता आपल्या मिठीत घ्याव आणि मन मोकळं करावं…

काया : Friends??? (काहीसा विचार करून)

कबीर : (हलकेच हसून) हममम् ( आपले अश्रूंना आवरत घालत)

काया : (हात मिळवणी करत) That’s good… I am मधू..

कबीर : कबीर… (स्वतःची नव्याने ओळख करून देत)

काया : कॉफी??? माझ्या घरी…. तुझी हरकत नसेल तर …

कबीर : (तेच तर हव होत त्याला हे confirm करण्यासाठी की कायाच आहे…. मनाला आवर घालत अतिशय नॉर्मल) Are you sure?? I mean तुझ्या घरी अस अनोळखी व्यक्तीने येण???

काया : No problem…

दोघेही एकत्र उठले… तिने आपली guitar आपल्या पाठीवर चढवली आणि पाउल पुढे टाकणार तोच ती अडखळली आणि तिचा तोल गेला… कबीरच्या हे लक्षात येताच त्याने तिला सावरल…. तिचा हात त्याच्या हातात होता दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले…. गार वाऱ्याने त्या मोहरलेल्या वृक्षाला गदागदा हलवले आणि आपल्या फुलांचा वर्षाव करायला भाग पाडले… तांबडा पिवळा प्रकाश… दोन जीवांची भेट आणि वरून होणारा फुलांचा वर्षाव छान सांगड घातली होती आज निसर्गाने….

काही वेळाने भानावर येऊन दोघेही तिथुन निघाले… घरी पोहचल्यावर तिने तिच्याकडच्या चावीने दार उघडले… समोरच तिचे बाबा अर्थात मधूचे बाबा पेपर वाचत बसले होते…

मधू : Hiii Dad….

बाबा : Hii… बेटा…

मधू : (ओळख करुन देत) कबीर… meet my Dad… And Dad his कबीर…

बाबा : Hello… Please be seated…

मधू : (कँपसमधून कबीरने काढलेल पेंटिंग दाखवत) हे बघा… Nice na … कबीरने काढल…

बाबा : (आश्चर्य करत) वाहह!!! Beautiful….

कबीर त्यांना थँक्यू म्हणत तिच घर बघत असतो… मधू त्यांना तिथेच सोडून आत जरा फ्रेश होण्यासाठी निघून जाते… इथल्या तिथल्या गप्पा झाल्यावर काही वेळाने डोअर बेल वाजते… मधू जाऊन दार उघडते… आणि दारात आलेल्या व्यक्तीला आत घेऊन येते…

मधू : Look Dad… Who’s here??? (सोबतच कबीरलाही ओळख करून देत) कबीर… Meet my husband दिपक…

दिपकला इथे बघून कबीरला आश्चर्याचा धक्काच बसला आणि मधूने करून दिलेल्या ओळखीनंतर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते…. दिपकही कबीरला बघून दोन मिनिटे शांतच होतो…

दिपक : मधू!!! कॉफी आणशिल please…

मधू : sure…,  कबीर!!! One more coffee for you ??

कबीर : हो…. (रागातच दिपकवर नजर टाकत)

दिपक कबीरला बाहेर बाल्कनीत घेऊन जातो….

कबीर : (अतिशय रागात) दिपक!! ! तु इथे??? आणि कायाचा husband ???? काय आहे हे सगळं….

दिपक : (हसून) ती accident च्या आधी तुझी काया होती आणि आता ती माझी मधू आहे… (दिपक आज वेगळाच वागत होता) त्या दिवशी तु दुबईला रवाना झाल्यावर मी कायाला तुझ खर रुप सांगितल तेव्हा ती रागातच गाडी घेऊन तुला जाब विचारायला निघाली आणि रस्त्यात तिची डॉक्टरच्या गाडीला धडक लागली… डॉक्टर म्हणजे मधूचे बाबा…. गाडी ब्रीजवर अडकून पडली होती… डॉक्टरांनी तिला गाडीतून बाहेर काढले आणि गाडी नदीत कोसळली… कायाच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे तिची स्मृती हरवली… ओपरेशन नंतरही तिला काहिच आठवत नव्हते… त्या अपघातात डॉक्टरांची एकुलती एक मुलगी मधू गेली… कायाची कोणतीच ओळख पटत नसल्याने त्यांनी तिला मधू नाव दिले आणि ते इथे आले… डॉक्टर एका पेशंटच्या ओपरेशनसाठी भारतात आले होते परतीच्या वेळेवर त्यांची मुलगी गाडी चालवत होती.. गाडीवरच नियंत्रण सुटून कायाच्या गाडीला धडक बसली… त्यांच स्वतःच हॉस्पिटल असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले नाही…

सहा महिन्याआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला तीची माहिती मिळाली… मी तडक इथे निघून आलो… इथे आल्यावर कळल कि तिला तर काहिच आठवत नाही…. (आणि हसायला लागला)

कबीर : पण तुला अस वागायची काय गरज होती…???

दिपक : Relax कबीर… मला काया आधीपासूनच पसंत होती… मी दादाला सांगून तिला लग्नाची मागणी पण घातली… पण तिने मला झिडकारला… नेहाने जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा मी त्या गोष्टीचा फायदा घेत तुला तिच्या भावाच खोट नाव सांगितल… आणि तुला नेहाला झालेल्या त्रासाचा सुड घेण्यासाठी उत्तेजित केल… मला माहीत होतं तु तुझ्या दी साठी काहीही करू शकतोस… मी त्याचाच फायदा घेतला… पण तु तर खरोखरच तिच्या प्रेमात पडलास आणि माझा प्लान फसला…. म्हणून मीच तिला हा तुझा प्लान होता अस सांगितल… तुझ्यावर प्रेम केल्याचा खूप राग आला तिला… खूप त्रास झाला बिचारीला हे सगळं ऐकून आणि मला बर वाटल तिला अस तडफडताना बघून….

कबीरला दिपकच्या खोटेपणाचा आणि अशा विक्षिप्त विचारांचा खूप राग आला… त्याने दिपकची कॉलर पकडली आणि….. मधू आली कॉफी घेऊन… तिला बघताच कबीर गप्प बसला….

मधू :(त्या दोघांना अस बघून… तिला जाणवलं की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालय) Hey guys any problem??? काय झालं आहे कबीर तु दिपकची कॉलर का पकडली… Are you guys fighting….????

दिपक : हो अग… (मधूचा काळजीत पडलेला चेहरा बघून) अग मधू कबीर माझा फ्रेंड आहे आपल लग्न झालं तेव्हा तो इथे नव्हता ना म्हणुन रागावलाय… बस इतकच….

मधू : ओहहहह…. म्हणजे याला आपली लव्हस्टोरी नक्कीच माहित असणार…. कबीर सांगशील ना मला??

कायाच्या या बोलण्यावर कबीरला काहिच सुचेनासे झाले… त्याला आता हे असह्य झाल होत… दिपक कायाच्या अती जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता.. पण कायाने स्वतःला त्याच्यापासून दूरच ठेवल होत… कबीरला तिथे थांबण मुश्किल झाल होत… मनाचा आवंढा गिळत तो तिथुन निघाला…. तिच्या घरापासून दूर थोड्या निर्जन स्थळी आल्यावर त्याच्या मनाचा बांध फुटला आणि ढसाढसा रडू लागला…..


कैसे बताये क्यूँ तुझको चाहे, यारा बता न पाएं
बातें दिलों की, देखो जो बाकी, आँखें तुझे समझाए
तू जाने ना…
मिलके भी हम न मिले तुमसे न जाने क्यूँ
मीलों के है फासले तुमसे न जाने क्यूँ
अनजाने है सिलसिले तुमसे न जाने क्यूँ
सपने है पलकों तले तुमसे न जाने क्यूँ

निगाहों में देखो मेरी जो है बस गया
वो है मिलाता तुमसे हुबहू
जाने तेरी आँखें थी या बातें थी वजह
हुए तुम जो दिल की आरजू
तुम पास हो के भी
तुम आस हो के भी
एहसास हो के भी अपने नहीं
ऐसे हैं हमको गिले तुमसे न जाने क्यूँ
मीलों के है फासले…


कबीर हॉटेलवर न जाता तिथेच एका बेंचवर बसून असतो… थोड्यावेळाने हॉटेलवर निघून जातो…. दिड दोन तासानंतर त्याच्या मोबाइलवर मेसेज येतो.. त्याला अशीही झोप लागत नसते… तो फोन चेक करतो….. कायाचा मेसेज असतो… तो खूश होतो….

“Hiiiii Kabir… Can you join me tomorrow for festival… Deepak doesn’t like this type of festival… Is it possible to you… ”

कबीर लगेचच Yess म्हणून मेसेज पाठवून देतो…. कबीर ठरवतो की कायाला नव्याने आपल्या प्रेमात पाडायच आणि दिपकपासून तिची सुटका करायची…..

क्रमशः

(हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.. काही त्रुटी असल्यास तेही कळवा.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल)

🎭 Series Post

View all