© शुभांगी शिंदे
कबीर हॉटेलवर न जाता तिथेच एका बेंचवर बसून असतो… थोड्यावेळाने हॉटेलवर निघून जातो…. दिड दोन तासानंतर त्याच्या मोबाइलवर मेसेज येतो.. त्याला अशीही झोप लागत नसते… तो फोन चेक करतो….. कायाचा मेसेज असतो… तो खूश होतो….
“Hiiiii Kabir… Can you join me tomorrow for festival… Deepak doesn’t like this type of festival… Is it possible to you… ”
कबीर लगेचच Yess म्हणून मेसेज पाठवून देतो…. कबीर ठरवतो की कायाला नव्याने आपल्या प्रेमात पाडायच आणि दिपकपासून तिची सुटका करायची…..
आता पुढे...
सावर रे... (भाग ३)
सकाळी लवकर उठून मस्तपैकी तयार होऊन कबीर मधूच्या घराबाहेर उभा असतो… काया येताच त्याची नजर तिच्यावरच स्थिरावते…. रेड कलरचा शॉर्ट वन पीस गाऊन.. त्यावर डेनीमच जॅकेट… केस वनसाइड पीनप करुन डाव्या बाजूला रोल करून मोकळे सोडलेले… कानात स्टडस… हातात नाजूक ब्रेसलेट, पायात ब्लॅक शूज…. आणि पाठिवर guitar…..
तिने निघूया का?? अस विचारताच कबीर भानावर येतो… ते दोघेही इवेंटच्या ठिकाणी पोहचतात.. इवेंट संपल्यावर तिला एका स्टुडिओत जायच होत… तो स्टुडिओ इवेंट ग्राउंडपासून तीन तासाच्या अंतरावर होत… त्यांनी ट्रेन ने जाण सोईस्कर समजून ते निघाले… वाटेत दोघांच्या छान गप्पा रंगल्या… ट्रेनमधे गर्दी जरी नसली तरी बसायला जागा नव्हती ते उभ्यानेच प्रवास करत होते… एका स्टॉपवर काही चार पाच मुले ट्रेनमधे चढली… थोडी टपोरीच होती ती मुल…
कायाला बघून ते मुद्दाम तिच्याच बाजूला येऊन उभे राहिले… मुद्दाम तिला स्पर्श करू लागले… कबीर त्यांना काही बोलणार तर कायाने त्याला अडवले… ते चार पाच जण आणि तु एकटा आहेस… नको पंगा घेउ अस सांगत कबीरला अडवल… पण त्या मुलांचा आगाऊपणा चालूच होता… कबीर आणि काया थोडे मागे सरकले… रेल्वे डब्याला चिटकून उभे होते… आता आणखी मागे कुठे जाणार पण ती मुल अजूनच अंगावर येत होते… आता कबीर कायाच्या समोर उभा राहिला आपले हात त्या रेल्वे डब्याच्या भिंतीला टेकवून तेही कायाला अजिबात स्पर्श न करता… आणि त्याने नजरेनेच कायाला धीर दिला… पण ती आगाऊ मुले आता कबीरला धक्का मारू बघत होते.. ते चौघ एकत्र कबीरला टेकून होते.. आणि टिंगलटवाळी करत नुसते मस्ती करत होते.. त्यांच वजन कबीरने पाठीवर झेलल.. त्यामुळे तो कायाच्या खूप जवळ आला होता इतका की त्या दोघांचे ओठ आता एकमेकांवर टेकणारच होते पण कबीर पूर्ण तोल सांभाळून होता… कायाच अंग भितीने थरथरायला लागल होत… इतक्यात त्या मुलांच स्टेशन आलं आणि ते उतरले…
कबीर आणि कायाने सुटकेचा निःश्वास सोडला..कबीरचं तिला अस प्रोटेक्ट करण तिला खूप भाळल… नकळत झालेल्या त्याच्या स्पर्शाने तिला शहारून आल होत… थोड्यावेळ कोणीच कोणाशी बोलत नव्हत… संध्याकाळ होऊन गेली होती… वातावरणात बऱ्यापैकी गारवा जाणवत होता… बाहेर बर्फ पडायला लागला होता… त्यांच स्टेशन येताच ते उतरले… स्टेशनपासून चालत जाण्याइतपत ते स्टुडिओ जवळ होत… तिथे पोहचल्यावर स्टुडिओत त्यांचे दोन तास गेले….. बाहेर येऊन बघतात तर सगळीकडे बर्फ जमा झालेला असतो… थंडीपण खूप पडलेली असते…. कायाला परत स्टुडिओच्या वेटींग रुममध्ये बसवून तो बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडतो… काया आपली हातांवर हात चोळत बसून असते…. असा अचानक पाऊस येइल याचा अंदाज दोघांना पण नसतो. ..
थोड्यावेळाने कबीर परत येतो… तोही बराच गारठलेला असतो…. त्याच्या लेदर जॅकेटमुळे थोडा का होईना पण जरा कमी थंडी जाणवत होती…
कबीर : अती बर्फ पडल्याने बाहेर वाहतुक बंद आहे… परीस्थिती नॉर्मल होईपर्यंत इथेच थांबाव लागेल…
काया : (हातावर हात घासत ) इथे??? No ways…. कुल्फी जमा होईल आपली….
कबीर : बघतो काय करता येईल ते… (विचार करून)
तेवढ्यात त्याची नजर त्या पारदर्शक काचेतून दिसणाऱ्या समोरच्या हॉटेलवर जाते… पण ती काय म्हणेल या विचाराने तो गप्प बसतो… काया त्या स्टुडिओतल्या रिसेप्शनला इथे जवळपास कुठे हॉटेल आहे का विचारून येते… रिसेप्शन सुद्धा तिला समोरच हॉटेल सुचवते… कबीर आधी नाही म्हणतो पण नंतर पर्याय नसल्याने तयार होतो… दोघेही त्या हॉटेलवर जातात…
आत प्रवेश करताच मोठी लॉबी असते… उजव्या बाजूला भल मोठ रिसेप्शन…. प्रशस्त अस हॉटेल असत.. कबीर रिसेप्शनवर चौकशी करून येतो… तिथे एकच रूम शिल्लक असते… कबीर कायाला सांगतो… काहिच ओपशन नसल्याने ते दोघ एकच रूम बुक करतात… कायाला आता खूप अॉकवड फील होत की एकाच रूममध्ये दोघ कसे राहणार? पण आता काय करणार… नाइलाज होता… कबीर म्हणाला देखील कायाला की मधू तु जा मी इथेच थांबेन… पण मधूला ते योग्य वाटले नाही ती त्याला सोबत घेऊन गेली…
दुसऱ्या मजल्यावर त्यांची रूम असते… दोघेही आत जातात… थंडीमुळे काया थरथर कापत होती…. रूममध्ये शेकोटीसाठी चिमणीची सोय होती… सर्वंटने त्यांना शेकोटी पेटवून दिली.. काया पटकन जाऊन शेकोटीजवळ बसली… कबीरने जेवणाची अॉर्डर देऊन ठेवली होती आणि जेवण रूमवरतीच मागवल… कायाने पायातले शूज काढले आणि शेकोटीची ऊब घेऊ लागली… कबीर लांबूनच तिला बघत होता…
थोड्याच वेळात रूम सर्वंट जेवण घेऊन आला… दोघेही छान गप्पा मारत जेवण करत होते…
मधू : कबीर... तु दिपकचा खास मित्र ना???
कबीर : (घास तोंडात घेत )हममम…
मधू : मग आमची love story सांग ना…. तुला तर नक्कीच माहित असेल… (अगदीच सहज)
हे ऐकून कबीरचा घास घशातच अडकतो… त्याला जोरात ठसका लागतो… मधू त्याला पटकन पाणी पाजते आणि त्याची पाठ चोळते…ठसका थांबल्यावर लक्षात येत की नकळत मधू बरीच जवळ होती कबीरच्या त्याला खूप बर वाटल… मन करत होत की आता तीला आपल्या कुशीत घेऊ आणि घट्ट मिठीत धरून ठेउ… पण कबीरच्या डोळ्यात चटकन पाणी आले… त्याने अश्रू लपवत जेवणावर लक्ष केंद्रीत केल… जेवण झाल्यावर मधू बेडवर जाऊन झोपते….
तिला गार झोप लागलेली बघून कबीरने बेडवरच ब्लँकेट तिच्या अंगावर ओढले आणि स्वतः बाजूच्या सोफ्यावर जाऊन तिला एकटक बघत झोपी गेला…
सकाळी मधूला जाग आली तेव्हा तिने पाहिल कबीर नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता… त्याने मधूकडे पाहिल तस ती झोपेच नाटक करू लागली… तिने परत ब्लँकेटच्या आडून त्याच्याकडे पाहिल…. जीम करून कमावले पिळदार शरीर… त्याचे ते मसल्स….तिची तर नजरच हटत नव्हती त्याच्यावरून… कबीरने अंगावर शर्ट चढवला आणि तो रूमच्या बाहेर निघून गेला… ती उठून फ्रेश होण्यासाठी निघून जाते…
अंघोळ करताना ती कबीरचाच विचार करत असते… कि कसे आपण रात्रभर एकाच रुममध्ये होतो… पण कबीरने त्याचा गैरफायदा घेतला नाही… उलट आपली काळजीच घेतली.. ट्रेनमधे पण त्याने आपल्याला कस प्रोटेक्ट केल…. त्या विचारांच्या तंद्रीत ती फक्त टॉवेल अंगाभोवती लपेटून बाथरूम मधून बाहेर आली.. इतक्यात कबीरने बाहेरुन दार उघडून आत प्रवेश केला… मधू त्याला बघताच दचकली आणि पाठी फिरली…. कबीरही तिला या अवस्थेत बघून नजर फिरवून मागे वळला आणि तसाच सॉरी बोलून रूमच्या बाहेर पडला…. मधूला खूप अवघडल्यासारखे झाले…आणि कबीरबद्दल हसूही आले….
कबीरने यावेळेस प्रायव्हेट कॅब बुक केली… मगाजच्या प्रसंगानंतर कोणीच कोणाशी बोलत नव्हते… कबीर थोडा खुश होता कारण कालचा संपूर्ण दिवस आणि रात्र काया त्याच्या सोबत होती….
तीन चार तासांचा प्रवास करून ते घरी पोहचले… कबीरही हॉटेलवर निघून गेला… इथे घरी आल्यावर तीने आपल्या बाबांना कबीरच्या वागणुकीबद्दल सांगितले… तिला दिपकपेक्षा कबीरची ओढ जास्त वाटते हेही सांगितले….
-------------------------------------------------------------------------
रात्री उशीरा दिपक आणि मधू मुव्ही बघायला जातात… मुव्ही बघायला लागल्यावर काहीवेळाने दिपक तिची जवळीक साधायला बघतो… तिला किस करायला जातो पण मधूला हे सहन होत नाही आणि ती बाहेर निघून येते.. .. तिच्या मागोमाग दिपकही बाहेर येतो… आणि त्यांचे कडाक्याचे भांडण होते… दिपकने जरी त्याची ओळख तिला तिचा नवरा म्हणून केली असली तरी मधूने त्याला अजूनही स्विकारलेल नव्हतं… तिने आजपर्यंत त्याला जवळीक साधू दिलेली नसते… त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडण होत असे… आजही तो भांडणानंतर तिला तिथेच एकटीला सोडून निघून गेला….
मधूला काहिच सुचत नव्हते… तिला तर रडूच आले होते…. इतक्यात तिच्या मोबाईलवर कबीरचा Hiiii म्हणून मेसेज आला…. तिला जरा हायसे वाटले…. तिने पटकन कबीरला फोन करून दिपक आणि तिच्या भांडणाबद्दल सांगितले आणि ती तिथे एवढ्या रात्री एकटीच उभी असल्याचेही सांगितले.. तिचा रडवेला आवाज ऐकुन कबीरने मी तिथे येतो तु थांब तिथे आणि घाबरू नको असे सांगितले… कबीरला तिथे पोहचायला वीस मिनिटे लागणार होती…. तिला तिथेच बाहेर न थांबता मुव्ही बघत टाईमपास करण्यास सांगितले… आणि मी लवकरात लवकर पोहचतो असे आश्वासन देऊन तो हॉटेलवरून निघाला….
कबीर कॅब घेऊन पोहचतो… कबीरला पोहचायला दहा मिनिटे उशिर झाला होता… तिथे पोहचल्यावर तो मधूला फोन करतो… पण तिचा फोन बंद येतो… तो संपूर्ण ठिकाणी तिला शोधतो… पण ती तिथे नसते… परत बाहेर येऊन बघतो…. तर ती बाहेर एका बेंचवर बसलेली होती.. कबीर धावतच तिथे गेला आणि तिच्या समोर उभा राहिला… आपल्या गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून धापा टाकत होता… तिला बघताच क्षणी त्याच्या जिवात जीव आला….
कबीर : (थोड रागातच) Have you gone mad?? तुला आतच बसून रहा सांगितलं होतं ना?? मग इथे का बसलीस ?? तुला काही झालं असत तर??
मधू : (तीही रागातच आहे) yess I am mad… आणि मला काही झालं असतं तर दिपकला फरक पडायला हवा… तुला काय फरक पडतो??
कबीर : (तिला हळूवार समजावत) हे बघ काया मला तस म्हणायच नव्हत…
मधू : काया??? (प्रश्नार्थक मुद्रेने) येवढ्या मध्यरात्री दिपक मला असाच इथे रागात सोडून गेला आणि तु!!! …., तुला एक हाक दिली तर तर तु धावत आलास…… माझ्यासाठी….., त्यादिवशी ट्रेनमध्ये मला प्रोटेक्ट केलस अंगावर लोड येऊनही साधा मला स्पर्श होऊ नये म्हणून किती दक्षता घेत होतास…. त्या रात्री होटेल मध्ये मी तुला एक प्रश्न विचारला तर त्याच उत्तर तु टाळलस… तुला ठसका लागला तेव्हा नकळत मी तुझ्या काळजीने व्याकुळ होऊन तुझी पाठ थोपटली… त्यावेळी झालेल्या तुझ्या स्पर्शाने मी मोहरून गेले… “दिपक”…. जो स्वतःला माझा नवरा म्हणवतो त्याच्या सोबत असूनही का मला ती ओढ जाणवत नाही जी तुझ्या सोबत असल्याने जाणवते….
कबीर : (अजूनही समजावण्याच्या प्रयत्नात) हे बघ मधू… आता शांत हो… आपण बोलू नंतर…
मधू : काय बोलू नंतर कबीर??? आत्ता का नाही???? ज्याला माझी काळजी असायला हवी तो मला इथे सोडून जातो… आणि तु इथे माझी काळजी करत येतोस… तु का आलास कबीर???? का कबीर का??? बोल ना कबीर?? का तुला नी मला एकमेकांची ओढ जाणवतेय??? बोल ना कबीर बोल?? (त्याच्या शर्टाला धरून रडत रडत विचारते)
कबीर : (तिच्या प्रश्नांचा भडीमार असह्य झाल्याने) Because I love you dammit…. I love you so much….. (तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन, पाणावलेल्या डोळ्यांनी मनावरचा संयम सुटल्याने)
मधू त्याच्या डोळ्यांत एकटक पाहत बसते… त्याचे पाणावलेले डोळे खूप काही सांगून जातात… मधूही रडतच असते….तिच्या डोळ्याच्या किनारातून अश्रूंची धार ओघळते ….
कबीर तसाच आपल्या हाताने तिचा चेहरा अजून आपल्या जवळ घेतो… दोघांच्याही हृदयाचे ठोके वाढतात… पोटात फुलपाखरू उडायला लागतात, श्वासांत श्वास मिसळले आणि दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठांवर टेकले… मधू काहीच प्रतिसाद देत नव्हती… पण आज कबीर थांबणार नव्हता… तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि स्वतःच्या मनाची घालमेल आज त्याला सोडवायचीच होती… तो तसाच आपले ओठ तिच्या ओठांवर क्रश करत होता… आता तिचाही संयम तुटला होता… भावनांचा बांध मोकळा झाला होता… आणि तिही त्याच्यात हरवून गेली होती……
हो हो….
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वाट हळवी वेचताना सावर रे मना
सावर रे
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना सावर रे मना
सावर रे
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
भान उरले ना जगाचे ना स्वतःचे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रात दिन तू सावर रे
सावर रे मना
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
येतील आता आपुले ॠतू
बघ स्वप्न हेच खरे
पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे
पानगळ ही सोसताना सावर रे मना
सावर रे मना
सावर रे
सावर रे एकदा
सावर रे
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वाट हळवी वेचताना सावर रे…..
काही वेळाने दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली…त्यांच्या हृदयाचे ठोके आता एकाच वेगाने धडधडत होते….. दोघांनीही एकमेकांच्या नजरेत पाहिले….कबीरने कायाचा चेहरा परत आपल्या हातात घेतला आणि तो वेड्यासारखा तिच्या चेहर्यावर किस करू लागला….
कबीर : I love you … I love you… I love you so much काया…. I love you…
मधू : (काया हे नाव ऐकून तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले) काया??? कोण आहे मी कबीर??? तुझी काया की दिपकची मधू??? (अश्रूंनी डोळे भरलेले….. घसा एव्हाना कोरडा पडला होता) हे द्विधा आयुष्य मला नाही जगायच कबीर…. मला माझी खरी ओळख हवी आहे कबीर………. I want my life back कबीर…. I want my life back ….. (ती जिवाच्या आकांताने रडून रडून विचारत होती)
कबीर स्तब्ध होऊन जातो…. त्यालाही आता रडू येत होत… मधू आपल्याच आयुष्याने आपल्या सोबत खेळलेल्या खेळीला वैतागून रडत होती…. कबीर निरुत्तर राहून तिथेच बेंचवर आपल्या हाताच्या ओंजळीत आपल तोंड धरून रडत बसतो…. मधू सगळं असह्य झाल्याने रडतच पळत सुटते….कबीरच्या लक्षात येताच तो तिच्या मागे जातच असतो इतक्यात भरधाव गडीने मधूला धडक दिली…. तिच्या डोक्याला जबर मार लागला… गाडी तर पुढे निघून गेली आणि त्या निर्जन रस्त्यावर कबीर मदतीची भीक शोधू लागला…. तो वेड्यासारखा मदतीची हाक मारत होता…
इतक्यात समोरून येणार्या गाडीला थांबवून कबीरने मदतीची विनंती केली… नशीबाने ते लोक मदतीला तयार झाले… कबीरने मधूला उचलून गाडीत घेतली.. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होत… त्याने आपल्या हाताने तीच डोक दाबून धरल…. वाहणार रक्त प्रवाह थोडा कमी होत होता… त्यांनी जवळच्याच हॉस्पिटल मध्ये तिला नेले आणि डॉक्टरांनी ताबडतोब उपचाराला सुरूवात केली… कबीरने तिथून निघतानाच मधूच्या वडिलांना फोन करून परिस्थिती सांगितली होती… तेही तिथे हजर झाले… त्यांच्या येण्याने डॉक्टरांना कायाच्या केसमध्ये मदत झाली….
कायाला operation theater मध्ये नेले… कबीर रागाच्या भरात भिंतीवर आपल्या हाताचे मुठ्ठी मारू लागला…खुपच काळजीत पडला होता सारखा स्वतःलाच दोष देत होता… मी हे काय केलं…. मी स्वतःवर संयम ठेवायला हवा होता… काया…. काया…. Ohh god please…. (अजूनही आपले हात भिंतीवर आपटत होता )
पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान
दूर दूर चालली आज माझी सावली………२
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले सोबती ………….२
काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना…….२ मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती ………….२
कबीरला खूपच एकट पडल्यासारखे वाटते… तो नेहा आणि राजेशलाही बोलावून घेतो…
क्रमशः
( चौथा भाग सुद्धा प्रकाशित केला आहे या भागाच्या शेवटी लिंक दिली आहे..हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.. काही त्रुटी असल्यास तेही कळवा.. आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा