© शुभांगी शिंदे
कायाला operation theater मध्ये नेले… कबीर रागाच्या भरात भिंतीवर आपल्या हाताचे मुठ्ठी मारू लागला…खुपच काळजीत पडला होता सारखा स्वतःलाच दोष देत होता… मी हे काय केलं…. मी स्वतःवर संयम ठेवायला हवा होता… काया…. काया…. Ohh god please…. (अजूनही आपले हात भिंतीवर आपटत होता )
कबीरला खूपच एकट पडल्यासारखे वाटते… तो नेहा आणि राजेशलाही बोलावून घेतो…
आता पुढे....
सावर रे... (भाग ४)
इथे सहा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर डॉक्टरांना कायाला वाचवण्यात यश येते.. डॉक्टर operation theater बाहेर येताच कायाची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगतात पण ती शुद्धीवर आल्यावर खरी परिस्थिती कळेल…. कबीर डॉक्टरांचे हात धरून त्यांचे आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी आभार मानतो… डॉक्टर कबीरच्या पाठीवर हात थोपटतात आणि निघून जातात… थोड्यावेळाने कायाला operation theater मधून special ward ला शिफ्ट करतात…
कबीर दार उघडून आत जातो… ती निपचित पडून असते…. कबीर बेड शेजारी बसून कायाचा हात हातात घेतो… तिचा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडून आपल्या ओठांना टेकवून परत रडायला लागतो…
नेहा आणि राजेश दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलला पोहचतात… सोबत रेवाही येते… काया अजूनही शुद्धीवर आलेली नसते… सगळी हकीकत कळल्यावर राजेश आणि नेहा कबीरला धीर देतात… मागोमाग दिपकही तिथे पोहचतो… त्याला बघताच कबीर पेटून उठतो…. पण त्या आधीच तो कबीर आणि बाकी सर्वांची माफी मागतो… पण कबीर काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो… राजेश आणि रेवा कसबस त्या दोघांना वेगळ करतात आणि दिपकला तिथून निघून जाण्यास सांगतात…
सगळं शांत झाल्यावर नेहा कबीरला हॉटेलवर जाऊन आराम करण्यास सांगते… पण कबीर तिथून जाण्यास तयार नसतो… त्याला कायाची खूपच काळजी वाटत असते… तो बाहेरच बसून काया शुद्धीवर येण्याची वाट पहात असतो…
रात्री उशिराने काया शुद्धीवर येते त्यावेळेस नेहा तिच्या बाजुला बसून असते… नेहा ताबडतोब डॉक्टरांना बोलावते… लगेच डॉक्टरांची टीम येऊन तीची तपासणी करतात… अजूनही गुंगी पूर्ण उतरलेली नसते…ती परत झोपी जाते नेहा आणि राजेश तिथेच उभे असतात…. रेवा कबीर सोबत बाहेर उभी असते… डॉक्टरांनी मुद्दाम कबीरला कायाच्या नजरेपासून दूर राहण्यास सांगितले….
सकाळी लवकरच कबीर छानपैकी तयार होऊन फूलांचा गुच्छ घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो… काया आता पूर्ण शुद्धीवर होती…राजेश सोबत बोलत होती… तिला आता सर्वकाही आठवत होतं… कबीर तिला दाराच्या काचेतून मन भरून पाहत होता… मागून रेवाही फूलं घेऊन आली… रेवा येताच त्याने आपले अश्रू सावरले आणि हिंमत एकवटून आत शिरला…
कबीर : (गुच्छ पुढे करत) कशी आहेस???
काया : (रागात) कोण तू??? आणि इथे का आलास??? दिला तेवढा त्रास पूरे नाही झाला का??
कबीर : (त्याला काहिच कळत नव्हते) काया!!! Please माझ ऐकून घे… मी काही नाही केल ग… Please एकदा ऐकून घे माझं….
काया : मला तुझ काही एक ऐकायच नाहीए… तू जा इथुन…. मला खूप त्रास होतोय…
इतक्यात डॉक्टर आत येतात… राजेश आणि रेवा कबीरला बाहेर घेऊन येतात… थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर येऊन कबीरला खूप ओरडतात… कबीर!!! तुला आम्ही कालच काया पासुन दूर राहण्यास सांगितले कारण तिच्या डोक्यावर जास्त ताण पडता कामा नये… आता जे ती चिडली, रागावली हे तिच्या तब्बेतीला घातक आहे… Please try to understand… इतक समजावून ते निघून जातात…
कबीर हतबल होऊन बसून राहतो… रेवा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते पण तो तिथुन निघून जातो….
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा… सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
सैरभैर झालं मन
हरपल देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा… सांग ना… सांग ना…
कबीर रोज कायाला दाराच्या काचेतून न्याहाळत असतो… आठवड्याभराने कायाला डिस्चार्ज देण्यात येतो… सगळे परत मुंबईला रवाना होतात… इथे आल्यावर कबीर परत कायाला भेटण्याचा प्रयत्न करतो… पण यावेळेस राजेश त्याला अडवतो….
राजेश : कबीर कायाला नाही भेटायच तुला…
कबीर : ती माझी बायको आहे राजेश…. मी मनवीन तिला… Please मला भेटू देत…
राजेश : विसरतोयस तु कबीर… खोटे रजिस्टर पेपर बनवले होते तु… याचा अर्थ ती तुझी बायको नाही…
कबीर : (विनवणी करत) पण राजेश तुला खर माहित आहे ना कि मी तिच्यावर किती प्रेम करतो…
राजेश : हात जोडतो तुझ्या पुढे… Please leave her… नको त्रास देऊस आता…. जा इथून… तुझ्यामुळे परत तीच बरेवाईट झालेल मला नाही बघवणार….
कबीर निराश होऊन तिथून निघून जातो… घरी आल्यावर आई त्याला कायाचा नाद सोडून द्यायला सांगते आणि मी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करून नवीन आयुष्याला सुरूवात करण्यास सांगते… पण कबीर मानायला तयार नसतो… मघ नेहा समजावते आणि रेवा त्याला खूप लाइक करते आणि तिच खूप प्रेम आहे तुझ्यावर अस सांगते… रेवा तिथेच समोर उभी असते… कबीर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण रेवा काहीच ऐकून घेत नाही उलट मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय अस सांगून कबीरला द्विधा मनस्थितीत टाकते… शिवाय कायाने स्वखुशीने दिपक सोबत लग्नाला होकार दिल्याचे नेहाने सांगताच तो आतून चूर चूर होउन जातो…. अखेर हिच आपल्या चुकीची शिक्षा समजून तो रेवासोबत लग्नाला तयार होतो….
दहा दिवसांनंतर कबीर आणि रेवाच्या लग्नाचा दिवस उजाडतो… रेवा खूप खुश असते…. लग्न रेवाच्या म्हणजे गुज्जू पद्धतीने करायच ठरल होत…सगळी तयारी झालेली होती… कबीर छान शेरवानी घालून तयार बसला होता अगदी एखाद्या राजकुमारा प्रमाणे भासत होता आणि ती…. गडद जांभळ्या रंगाचा घागरा चोली त्यावर हिर्यांच नक्षीदार वर्क…. त्याला साजेसा घुंगट छान डुल असलेला…. चेहरा अर्धा झाकलेला… ज्यातून फक्त तिचे अर्धे गाल आणि लाल रंगात भिजलेले ओठच दिसत होते… हातात तो गुजराती स्टाईल चुडा… अगदी राजवाड्यातील राणीप्रमाणे भासत होती ती… पण कबीरने तिच्याकडे नीट पाहिले देखील नाही कारण अजूनही मनात काया घर करून बसली होती….
सगळा लग्न सोहळा विधीवत पार पडला…. घरी आल्यावर अगदी पारंपरिक पद्धतीने नव्या नवरीचे स्वागत झाले… माप ओलांडून ती आत आली… कबीर सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो… इथे सगळे बाहेरचे पाहूणे गेल्यावर घरचीच काही मंडळी उपस्थित होती… सगळी आवराआवर झाल्यावर नेहा आपल्या नव्या नवरीला त्यांच्या म्हणजे कबीरच्या रुममध्ये घेऊन जाते… कबीर आतून कडी लावून बसलेला असतो… नेहा बाहेरून दार ठोकत असते… नाइलाजाने कबीर दार उघडतो… समोर ती दुधाचा ग्लास घेऊन उभी असते… तो परत जाउन बेडवर बसतो…दुधाचा ग्लास ठेवून ती दार बंद करायला जाते तर तो दार उघडच ठेव म्हणून सांगतो…
रेवा : सर!!! नक्की…. तुम्हाला चालेल????
कबीर : हो.. (थोडा रागात)
रेवा : पण आम्हाला नाही ह चालणार… (अस बोलून जोर जोरात हसायला लागते)
तसे नेहा आणि राजेशही हसायला लागतात (जे तिथेच लपून बसलेले असतात) कबीर वळून बघतो तर रेवा छान पंजाबी ड्रेस घालून उभी असते तिच्या सोबत राजेश, नेहा आणि दिपकही जोरजोरात हसत असतात…(गोंधळून) कबीर त्या घुंगटवाल्या मुलीकडे जातो आणि तिचा घुंगट उचलून पाहणार तोच सगळे त्याला थांबवतात… आणि आम्ही आता जातो मग तुम्ही काय ते करा…. अस सांगून बाहेरून दार लावून घेतात… ती शांतपणे बेडवर जाऊन बसते…
कबीरला काहीच कळत नसत तो परत रागाच्या भरात आपली मुठ्ठी भिंतीवर आपटतो तशी ती पुढे जाऊन त्याचा हात धरते… तिच्या स्पर्शाने तो शहारून निघतो… त्याला तो स्पर्श ओळखीचा वाटतो…. तो अधीरतेने तिचा घुंगट उचलतो….
कबीर : (आश्चर्याने) काया !!!!!
काया : (त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेत) कबीर…
इतक्यात परत दार उघडून नेहा आणि रेवा हसत हसत त्यांना चिडवतात… अरे आता काय एकमेकांची ओळख करून देताय (रेवा म्हणाली) आता तरी आतुन दार लावून घे… (नेहा म्हणाली)
कबीर : रेवाची बच्ची थांब तुला मी सकाळी बघतो… आणि दी please ना जा इथून…
नेहा : हो हो आता आम्ही कशाला पाहिजे?? (लटक्या रागाने)
आणि त्या हसतच निघून जातात… कबीर आतून दार लावून घेतो…. कायाच्या समोर जाऊन हळूच तिचा घुंगट दूर सारतो… लाजताना किती गोड दिसत होती ती…. आणि हळुच तिला आपल्या मिठीत घेतो… आज कितीतरी दिवसांनी असा सुखद क्षण त्यांच्या वाटेला आलेला असतो….
कबीर : (थोड्यावेळाने) काया मग ते हॉस्पिटलमध्ये तुझ वागण आणि रेवा… हा सगळा काय प्रकार आहे….
काया : (हलकेच हसून ) इतक्या दिवसांच्या विरहानंतर आपल मिलन मला खास बनवायच होता… असा सहज वाया घालवायचा नव्हता…. राग तर तुझ्यावर होता पण प्रेम त्याहीपेक्षा जास्त… खोट रजिस्टर मॅरेज असल तरी माझ्यासाठी ते खर होत… मी पूर्णपणे तुझ्या स्वाधीन झाले होते पण तु तुझ्यावर संयम ठेवून होतास… माझ्यासोबत तु काहीही करू शकला असतास पण तस नाही केलस…
सकाळी पूर्ण शुद्धीवर आल्यावर दिपक आला होता तुझ्याआधी भेटायला…. त्याने स्वतःची चूक कबूल करून माफी मागितली आणि तुझ माझ्यावर किती प्रेम आहे हे सुद्धा सांगितल… त्यानंतर प्लान करुन आपल्या या क्षणांना आम्ही अस खास बनवल आणि तुला सरप्राइज दिल…
कबीर : (लटक्या रागात) पण तुझ्या या सरप्राइज ने माझा जीव काढला ना… आणि माझ प्रेम तुला दुसऱ्याने सांगितल्यावर कळल का??? (आणि तो मुद्दाम खिडकीजवळ जाऊन उभा राहतो)
काया : (त्याला अपसेट पाहून पळत जाऊन मागून मीठी मारते) नाही ना रे… मला कुणाकडूनही तुझ्या प्रेमाचा दाखला नकोय… फक्त तुझा आनंद द्विगुणित करायचा होता… Sorry… ना… गंमत केली….(अगदी लाडात आपले गाल त्याच्या पाठीवर चोळत)
कबीर : मी पण आता थोडी गंमतच केली… तुला स्वतःहून माझ्याकडे ओढण्यासाठी…
काया : (रागात मागे वळून) ए काय रे.. मी नाही बोलत जा..
कबीर : (मागून तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवून आपल्या दोन्ही हातांनी तिला विळखा घालून) ओ…. राग आला माझ्या काऊला… काऊ…. I love you… (आणि हळूच त्याने आपले ओठ तिच्या खांद्यावर टेकवले… तशी ती शहारली.. मग मानेवर किस केल… हलकेच कान चावला…)
काया :(तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली… )कबीर काय करतोयस???
कबीर : (तिची हनुवटी आपल्या हातात घेत) अच्छा तुला नाही माहित मी काय करतोय??? (आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवणार तो ती दूर पळायला बघते)
कबीर तिला भिंतीजवळ अडवतो….तिचे दोन्ही हात भिंतीवर धरून गच्च पकडतो… तिच्या पोटात आता फुलपाखरे उडायला लागतात… तिची नजर आता कबीरवरच स्थिरावते…
काया : कबीर सोड मला…. (लाजतच) मला जाऊ देत please….
कबीर : आता तर तु officially माझी आहेस… खूप गंमत केलीस माझी आता मी तुला नाही सोडणार… अस बोलून तो आपली पकड अजून घट्ट करतो… आणि patiently आपले ओठ तिच्या ओठांवर क्रश करतो… त्याच्या स्पर्शाने तिही मोहरते… आता ती सुद्धा त्याला प्रतिसाद देत त्याच्यात हरवून जाते….
असाच दहा एक मिनिटांनी ते भानावर येतात… काया लाजून त्याच्या मिठीत शिरते… कबीर तिला कुशीत उचलून घेतो आणि बेडवर बसवतो… आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून शांत तिला बघत राहतो… ती संपूर्ण रात्र ते आपल्या गोड जून्या आठवणीत आणि भविष्याची स्वप्न रंगवण्यात घालवतात….
बस ना आता अजून काय विचार करताय??? कथा संपली… विसरलात का दुसऱ्या दिवशी प्रथेप्रमाणे सत्यनारायणाची पूजा असते…. हनिमूनला वेळ आहे… ते आता त्यांच त्यांना ठरवू देत… पण तुम्ही मात्र कथा कशी वाटली हे नक्की सांगा… ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा