सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 10

Truth of society
सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 10

मागच्या भागात आपण पाहिले , की नेहाच्या मनात काही तरी चालू आहे ,तिने विचार करताना ज्या गोष्टींकचा विचार केला,पहिली सासुबाईंची इच्छा पूर्ण होईल,सरोजच्या बाबांची इच्छा पूर्ण होईल, सरोजला  आधार मिळेल, रमेशला स्वत:च मूल मिळेल, मलाही मुलांच सुख मिळेल,माझ्या एका त्यागाने जर एवढी लोक सुखी होणार असतील तर मला हा निर्णय घ्यावाच लागेल, मला जरी हे पटत नसलं तरी ,प्रेम म्हणजे नुसतं घेणं नसतं देण्यातही आनंद मिळतो म्हणतात ,खरचं मिळतो का बघायला काय हरकत आहे, मोठा प्रश्न होता की,रमेशला या सर्वा साठी तयार करायचं ते कसं, काही मार्ग सुचत नव्हता.

रमेश कडे विषय कसा काढायचा हे कळत नव्हतं,त्यातच तीन चार दिवस निघून गेले, आईवडीलांना तिने फोनवर तिचा निर्णय सांगितला होता,ते म्हणाले आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो,देव तुला शक्ती देवो,हे सगळं करण्यासाठी आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी आणि तुला सुखी ठेवो.

कोणत्याही बायकोला जर नव-याला  खुश करायचं असेल तर त्याची पहिली पायरी त्याच्या आवडीचे जेवण बनवायचे, नेहाने आज रमेशशी बोलयचं असं ठरवून त्याच्या आवडीचं सर्व जेवण बनवलं, घरातच बागेत छान कैंडल लाईट डिनरची व्यवस्था केली, संथ संगीत चालू केलं,आता ती रमेश यायची वाट पहात होती. आज रमेशला थोडा यायला उशीर झाला होता, त्याने ही सगळी  तयारी पाहिल्यावर नेहाला विचारलं-"मी आज काही विसरलोय का?"

नेहा-"नाही ,असं का विचारतो "

रमेश-"आज माझा वाढदिवस नाही,तुझा नाही ,आपल्या लग्नाचा वाढदिवस पण नाही ,मग एवढी सारी तयारी,आज काय विशेष,काय हवयं तुम्हांला माझ्या कडून"

नेहा-"अरे,असं काही नाही, आज असाच मूड झाला ,म्हणून केलं,जा तू फ्रेश होऊन ये नाही तर जेवण थंड होईल ".

नेहा मनातल्या मनात म्हणते ,किती चांगलं ओळखतो हा मला,मला मात्र त्याच्या मनातलं नाही समजतं.

रमेश फ्रेश होऊन येतो, गाणं छान लागलेल असतं,

हम बने तुम बने एक दुजे के लिये

रमेश डान्स साठी नेहा पुढे हात करतो,ती ही तिचा हात देते, हातात हात घालून दोघेही कपल डान्स करतात ,दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून जातात. 

नेहा -"चल आता जेवून घेऊ"

रमेश-"जशी आपली इच्छा, राणी सरकार"

दोघेही  हसत खेळत जेवतात,नेहाला मात्र समजत नसतं, सुरवात कुठून करु ,सगळं आवरून ती रमेश जवळ येवून बसते, नेहा-"मला तुझ्याशी काही बोलायचं आहे "

रमेश-"तू जी  सगळी तयारी करून ठेवली होती त्या वरून मला असे वाटले की काहितरी गडबड आहे,बोल काय बोलयच्ं"

नेहा-"अरे मी सरोज कडे जाऊन आली ना तर तिच्या बाबांची अशी इच्छा होती की,मी तिला माझी बहिण म्हणून सांभाळावं"

रमेश-"ठीक आहे,आण मग तू एक चांगलं काम करीत आहे,तर मी तुला आडवणार नाही"

नेहा-"गोष्ट तेवढीच नाही , मी आता तुला जे काही सांगते ,ते ऐकून चिडणार नसशील शांतपणे मध्ये न बोलता सगळं ऐक"

सासुबाईंच्या फोन आला होता हे सोडून सविस्तर तिने आधी पासून जे काही घडलं ते त्याला सांगितल्ं  कारण त्या जरी कशाही वागल्या तरी तिला त्यांना त्यांच्या मुलापासून दूर करायचं नव्हतं.

रमेश-"पण दुसरे लग्न करणे माझ्या साठी शक्य नाही,मी तुझ्या शिवाय दुस-या कुणाचा विचारच करु शकत नाही."

नेहा-"जर मी ह्या जगात राहिले नसते तर तू लग्न केलेच असते"

रमेश-" बिलकुल नाही,मी तुझ्या आठवणी जपत सारं आयुष्य काढलं असतं,पण तू असं मरायची भाषा करु नको ,मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत,तुझ्या आधी मी मरु.."

असे बोलणार तितक्यात नेहा त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणते,नेहा-"असं काही अभद्र बोलू नकोस, मला तू हवा आहेस,मी पण तुझ्या शिवाय नाही जगू शकत,खरच तुझं माझ्यावर किती प्रेम आहे " असं म्हणून ती त्याच्या खांद्यावर डोक ठेवून बसते.

नेहा-"तुला आठवतं माझ्या ट्रिटमेंटच्या आधी आपण बसलो होतो ,तेव्हा तू म्हणाला होता की,मी तुझ्यासाठी काहीही करु शकतो,मग आता वेळ आली आहे, माझ्या साठी तरी सरोजशी लग्न कर "

रमेश नेहाला बाजुला करुन उभा रहातो आणि तिला म्हणतो,"लग्न म्हणजे काही तुला बाहुला बाहुलीचा खेळ वाटला का, हे होऊ शकत नाही " असे बोलून तो झोपायला निघून जातो.

इकडे नेहा बागेतच बसून रहाते , तो बेडरूम मध्ये जातो पण त्यालाही झोप येत नसते, नेहा असं कसं बोलू शकते ,ती स्वत:च माझं दुसरं लग्न कसं लावून देऊ शकते,तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून तर मी आईवडीलांशी पण भांडण करुन आलो  आणि मला नाही वाटत की मुलांना जन्म देणे म्हणजेच पौरुषत्व सिध्द करणे,जी आधी दोन लग्नांच्या विरुध्द होती ,ती आता मला स्वत:च सांगत आहे ,की मी दुसरं लग्न करावं, आणि किती सहजपणे बोलली की,आपण सगळे एकत्र राहू, मी तुला सोडून जाणार नाही,इतकं सोपं असतं का सगळं,मी माझ्या मनात तिची जागा दुस-या कोणाला नाही देऊ शकत असा विचार करता करता रात्रीचे एक वाजले,नेहा अजुनही झोपायला आलेली नसते,म्हणून तो तिला पहायला बाहेर जातो,ती अजुनही बागेतच बसलेली असते,तो तिच्या अंगावर शॉल टाकतो आणि म्हणतो-"चल झोपायला "

नेहा-" तुला माझी काळजी असती तर असा सोडून गेला नसतास, जर तुला मी म्हणते ते मान्य असेल तर मी झोपायला येते"

रमेश-"लहान आहेस का अजून , असा हट्ट करु नकोस , मी माझ्या मनात तुझ्या शिवाय दुस-या कुणाला जागा देऊ शकत नाही,मी जरी लग्न केले तरी मी तिला नव-याच प्रेम नाही देऊ शकत,हे तुलाही माहित आहे तरी हा हट्ट कशासाठी "

नेहा -" आपण तिला असही सांभाळायला तयार आहोत,फक्त तिला एका नात्यात बांधू म्हणजे लोकांना ही बोलायला चान्स मिळणार नाही."

रमेश -" मला लोकांसाठी तू लग्न करायला लावतेस का,मला हे सारं नाही पटत "

नेहा-"मी हे लोकांसाठी बिलकुल करत नाही आहे ,मलाही हेच योग्य वाटत ,कारण माझ्या मनातही ही अपराधीपणाची भावना आहे ,की मी तुला मूल नाही देऊ शकत, आतपर्यंत सगळे त्याग तू करत आला आहेस ,मला ही एक संधी दे आणि असं काही मला हौस नाही माझ्यासाठी सवत आणायची"

रमेश-"मी तर या गोष्टी साठी कधीच तयार नाही ,मी तर माझ्या मुल दत्तक घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे"

नेहा-" तू काळजी करु नकोस,आमच्यात नेहमी बहिणीच नात राहील आणि यातून मी माझाही स्वार्थ साधणार आहे ,तुझ्या मुलाची यशोदा होऊन, ते तरी सुख मला मिळू दे,आणि हा माझा अंतिम निर्णय आहे,तुला जर माझ्या बरोबर रहायच असेल तर तुला सरोजशी लग्न करावं लागेल,तू मला तुझा निर्णय दोन दिवसात सांग ,नाही तर मी आईवडीलांकडे कायमची निघुन जाईन "

रमेश -" बघू पुढे ,आता आत तर चल झोपायला "

नेहा आत जाता जाता-"तुला माहित आहे की,मी किती हट्टी आहे "

बघू आता रमेश काय निर्णय घेतो, ते पाहुया पुढील भागात..

( नेहाने ज्या परिस्थितीत  निर्णय घेतला तो योग्य आहे का ,काय वाटते तुम्हांला पुढे काय होईल,सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होतील की रमेश वेगळा काही निर्णय घेईल)

रुपाली थोरात 

   

🎭 Series Post

View all