सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 13

Nature of women

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 13

दुस-या दिवशी रमेश सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांची अपोइंटमेंट घेतो,दोन दिवसांनंतरची मिळते, तो घरी आल्यावर नेहाला त्याबद्दल नेहाला सांगतो. 

दोन दिवसांनी तिघेही हॉस्पिटल मध्ये जातात,तिथे गेल्यावर रिसेप्शनला विचारतात कितवा नंबर आहे,ती विचारते ,पेशंटच नाव काय . रमेश आणि नेहा एकाच वेळेला बोलतात,रमेश नेहा बोलतो आणि नेहा सरोज बोलते ,ती रिसेप्शनीस्ट गोंधळून त्यांच्या कडे पहाते,मग नेहा बोलते ,नेहाच्या ऐवजी सरोज लिहा.

नंबर आल्यावर ते आत जातात,त्यांना पाहून डॉक्टर म्हणतात-"या कशा आहात मिसेस नेहा,असं अचानक,काही त्रास होत आहे का आणि या कोण?"

नेहा-"ही सरोज, मला बहीणी सारखीच आहे आणि मग ती सांगते की रमेशच्ं दुसरं लग्न केलं आहे,आम्हांला ह्या महीन्या पासून IUI ची ट्रिटमेंट घ्यायची आहे ,कारण रमेशची या लग्नासाठी ती अट होती , कारण ही गोष्ट फक्त आमच्या दोघांमध्ये आहे,बाकी कुणाला काही माहित नाही,तुम्ही प्लीज आम्हांला मदत करा"

डॉक्टर-"तुम्ही माझे नेहमीचे पेशंट आहात म्हणून मी तुम्हांला सहकार्य करीन,ठीक आहे त्यांची सोनोग्राफी करावी लागेल,उद्याची  अपोइंटमेंट देतो, रिपोर्ट आला की घेऊन या ,मग सांगतो पुढे काय करायचं ते "

नेहा-" चालेल डॉक्टर"

असं म्हणून ते बाहेर येतात,घरी येण्यासाठी गाडीत बसतात,गाडीत बसल्यावर

सरोज-"मला काय झालं,मला का डॉक्टर कडे नेलं होतं?"

नेहा-"आपल्याला हॉस्पिटल मधून बाळ आणावं लागणार आहे ना म्हणून"

सरोज-"पण आई तर म्हणत होती त्रास झाल्यावर बाळ होतं,मग हॉस्पिटल मध्ये कसे मिळेल"

नेहा -"तुला कुणीही त्रास न देता आपल्याला हॉस्पिटल मधून बाळ मिळेल "

सरोज-"हो का, किती काळजी घेते तू माझी ,थँक यू ताई"

रमेश आणि नेहा तिला खुश बघून ते एकमेकांकडे बघून हसतात.

दुस-या दिवशी रमेश विचारतो, सोनोग्राफी करायला तुम्ही दोघी मिळून जाल ना, मला सुट्टी टाकायची गरज नाही आहे ना,त्यावर नेहा बोलते मी करेल ऐडजस्ट, रमेश म्हणतो ,ठीक आहे.

सोनोग्राफीला जाण्याआधी नेहाने तिला नीट समजावून सांगितलं की,तिथे गेल्यावर डॉक्टर तुझ्या पोटावरून मशीन फिरवतील त्यात घाबरण्याचे काही कारण नाही,आणि मग ती तिला घेऊन जाते ,सोनोग्राफी करून त्या घरी येतात,रिपोर्ट संध्याकाळी येणार असतात.

संध्याकाळी नेहा एकटीच जाऊन रिपोर्ट कलेक्ट करते आणि डॉक्टरांना दाखवते, डॉक्टर म्हणतात ,सगळं व्यवस्थित आहे आपण या महिन्यात ट्रिटमेंटला सुरुवात करु शकतो,एक विचारू का तुम्हांला,तुम्ही एवढं शिकलेल्या तरी तुम्ही रमेशच्ं दुसरं लग्न लावलं.

नेहा-"परिस्थिती तशी निर्माण झाली होती तशी " मग तिने सविस्तर डॉक्टरांना सांगितले, पण ही गोष्ट फक्त आपल्यात राहू द्या"

डॉक्टर-"तुम्ही निंश्चीत्त रहा , तुम्ही एवढ्या विश्वासाने आला आहात त्याला कधीही तडा नाही जाणार,पण एक सांगू तुम्ही खुप लकी आहात की तुम्हांला रमेश सारखा जोडीदार मिळाला,नाहीतर असेही त्याचं लग्न तुम्ही लावून दिलं आहे त्याचा तो फायदा घेऊ शकत होता ,मुल होण्याच्या नावाखाली"

नेहा-" त्याच्या त्याच गोष्टीवर तर फिदा आहे ,म्हणून तर त्याच्या साठी एवढं करतिये"

एवढं बोलून नेहा बाहेर येते,रिक्षात बसते,तेव्हा डॉक्टर बोललेले शब्द तिला आठवतात,खरचं रमेश नुसतं बोललाच नाही तर त्याप्रमाणे वागतोय पण,तितक्यात घर येते,घरात जाताच सरोज बोलते ,किती वेळ झाला ,मला भिती वाटत होती किती ,इथून पुढे मी पण येणार तुझ्या बरोबर,एकटी नाही थांबणार.नेहा हो चालेल ,इथून पुढे मी नाही तुला एकटे सोडून जाणार ,दोघीही बरोबर जात जाऊ.

तितक्यात सरोजच्या आईचा फोन येतो,ती त्यांचा फोन उचलते,

बोलायला सुरुवात केली,त्या विचारत होत्या ,सरोज तुला त्रास तर नाही ना देत,तसं मी तिला सारं समजावून सांगितल आहे,कुठे आहे ,दे तिला ,नेहा म्हणते ,नाही हो काकू माझं सगळं ऐकते ,थांबा तिला फोन देते.

सरोजची आई सरोजला सांगते ,ताईला आणि जावई बापूना खुश ठेव,त्यांच सगळं ऐकत जा.

सरोज-"हो आई सगळं ऐकते, तू मला बोललेली मी त्यांना दूध द्यायच पण त्यांनी तर मलाच प्यायला लावले आणि मला काही त्रास पण नाही दिला,आम्ही काल डॉक्टर कडे गेलेलो ,बाळ आणायचं आहेना हॉस्पिटल मधून म्हणून"

सरोजची आई-" म्हणजे काय केलं"

तितक्यात नेहा सरोजच्या हातातून फोन घेते ,"हलॉ,काकू अहो काही नाही ते तिच्या पोटात दुखत होतं ना म्हणून सोनोग्राफी करायला नेलेल्ं ,तुम्हांला तर माहित आहे ना ती किती प्रश्न विचारते म्हणून मीच तसं सांगितल "

सरोजची आई-"अग ठिक आहे,ती तुझ्या बरोबर आहे तर मला काही टेन्शन नाही ,आता मीही मरायला मोकळी,पोरी मला वचन दे की ,तू माझ्या सरोजला कधीही एकटी सोडणार नाही,तिच्या बोलण्यावरून तरी ती मला आनंदात वाटली,म्हणजे तुम्ही दोघेही तिला चांगल्या प्रकारे हाताळत आहात ,पहिल्यांदा असल्यामूळे तिच्या पोटात दुखत असेल"

नेहाला ओरडून सांगावस्ं वाटत होतं तसं काही नाही,पण तिला सत्य सांगून तिच्या आईच मन दुखवायच नव्हतं.

नेहा-"अहो काकू असं काय म्हणताय,मरु दे तुमचे दुश्मन,काकू तुम्ही नका काळजी करू तिची ,ती व्यवस्थित आहे "

सरोजची आई-"हो ग,तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर ,तू काकांची इच्छा पूर्ण केली आणि माझ सरोजच्या बाबतीटाळ टेन्शन कमी झालं,देव माझ्या दोन्ही पोरिंच्या आयुष्यात आनंद भर"

नेहा-"काकू खरचं तुमच्या आशिर्वादाची गरज आहे तुमच्या दोन्ही पोरींना "

सरोजची आई-"चल ठेवते फोन सांभाळून रहा एकमेकांना "

फोन ठेवून नेहा स्वयंपाकात व्यस्त होते आणि सरोज कार्टून मध्ये गुंग असते,रमेश आल्यावर त्याचा चहा होतो ,ते बागेत चक्कर मारतात,मग नेहा सरोजला झोपवून त्यांच्या रूममध्ये जाते ,हे आता त्यांच रोजच्ं रूटीन होवून जाते.

सरोजची मासिक पाळी आल्यावर ते ट्रिटमेंट करतात पण ती यशस्वी होत नाही असेच दोन तीन महिने उपचार सुरू असतात पण प्रयत्नांना काही यश येत नाही,त्यात भर म्हणून की काय,सासुबाईंचा फोन विचारायला यायचा,की चुकली का तिची पाळी,विचारायच्या, जातो ना रमेश तिकडे झोपायला,नेहा हो उत्तर द्यायची,त्या विचार करतात असं का होतय्ं मग आणि त्या मनातल्या मनात काही तरी ठरवतात.

नक्की काय ठरवतात ,काय असेल त्यांच्या मनात ,त्याचा ह्या तिघांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल .

ते पाहू पुढच्या भागात.......

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all