सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 2

life of two ladies with one man

सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 2

रमेशने त्याच्या एका मित्राच्या मदतीने दुस-या एका गायनाकोलिजिस्टची भेटीची वेळ घेतली,दोन दिवसांनंतरची मिळाली. दोन दिवस तसं घरातलं वातावरण तणावपूर्णचं होतंं,

कामाव्यतिरीक्त दोघेही एकमेकांशी जास्त बोलत नव्हते.

आज सकाळी ऑफीसला जाताना रमेश नेहाला म्हणाला,"आज संध्याकाळी  7.00 वाजता तू तयार होवून डायरेक्ट हॉस्पिटललाच ये,मी डायरेक्ट ऑफिस मधून हॉस्पिटल मध्ये पोहचतो." ती म्हणाली,"ठीक आहे ".

दोघेही 7.00 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचले , रिसेप्शनला चौकशी केली तर त्यांचा नंबर पंधरा मिनिटात येणार होता.त्यांचा नंबर आल्यावर दोघेही आत गेले,डॉक्टरांनी प्राथमिक माहिती समजून घेतल्यावर आता पर्यंतच्या सर्व ट्रिटमेंटचे रिपोर्ट बघितले . ते पाहिल्यावर ते म्हणाले ,"आधीच्या डॉक्टरांनी तुम्हांला जे काही सांगितल्ं , ते या रिपोर्ट प्रमाणे अगदी बरोबर आहे आणि माझाही तुम्हांला तोच सल्ला  आहे,नाही तर यांच्या जिवाला धोका आहे , आता तुम्ही ठरवा काय करायचं ते ".

रमेश म्हणाला," डॉक्टर तुम्ही सांगा कधी करायची ट्रिटमेंट आवश्यक ते सगळं करु". नेहा रमेशकडे बघत डॉक्टरांना म्हणाली, " आम्ही तुम्हांला या बाबतीत दोन दिवसात सांगतो". रमेश त्यावर बोलतो ,"त्यात विचार करण्या सारखं काय आहे,तुझ्या पेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही,डॉक्टर तुम्ही सांगाल त्या तारखेला ट्रिटमेंट करु."

"ठिक आहे , आपण पुढच्या आठवड्यात करु", असं डॉक्टर म्हणाले. रमेश डॉक्टरांना धन्यवाद देऊन तिथून निघाला,त्या बरोबर नेहा पण त्याच्या मागे निघाली, ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती, त्याचं लक्ष जाताच त्याने मानेने तिला विचारलं काय झालं,तर तिने मानेनेच काही नाही असं म्हटलं .तिच्या मनात रमेशबद्दलचा आदर खूपच वाढला होता.

नेहाला या गोष्टीचा विचार करून खूप छान वाटत होतं की ती त्याच्या आयुष्यात किती महत्वाची व्यक्ती आहे,पण त्या बरोबरच या गोष्टीचेही वाईट वाटतं होतं की ती त्याला पितृ सुख देऊ शकत नव्हती, तिच्या मनात एक द्वंद्व चालू होते.

घरी गेल्यावर परत एकदा आपण या विषयावर रमेशशी बोलू असं तिने ठरवलं. घरी जाता जाता वाटेत एका हॉटेल मध्ये जेवून ते घरी आले, त्या नंतर शत पावली करायला बाहेर बागेत फिरत असताना नेहाने विषय काढला, ती रमेशला म्हणाली,"मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आपण थोडं तिथे बसूया." रमेश म्हणाला ,"ठिक आहे,चल".

झोपाळ्यावर बसल्यावर रमेश नेहाला म्हणाला,"बोल,काय बोलायचय्ं ". नेहाने बोलायला सुरुवात केली," ही ट्रिटमेंट केल्यावर मी तूला तूझं मूलं देऊ शकत नाही, त्यामूळे मला असं वाटतं की आपण हा निर्णय घेऊ नये, मला तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक हवं आहे त्या साठी मला माझा जीव गमवावा लागला तरी चालेल,पण मी तुला असं नाही पाहू शकत,मला वाटतं तू परत एकदा या गोष्टिंचा विचार करावासं."

त्यावर रमेश म्हणाला," मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत,मला तू हवी आहेस, आपण एखादं मूल दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करू ".हे ऐकून तिचे डोळे भरून आले आणि ती त्याला म्हणाली ,"तू माझ्यासाठी एवढं करत आहे पण त्या बदल्यात मी तुला साधं एक मूल देऊ शकत नाही, मला तुला नेहमी हसताना पाहण्यासाठी काहीही करु शकते."

रमेश तिला म्हणाला की," अगं वेडा बाई,जर माझ्यात प्रोब्लेम असता तर तू मला सोडून गेली असतीस का?, जास्त विचार नको करू,चल आता झोपायला."

बेडरूम मध्ये गेल्यावर दोघेही झोपले,पण नेहाला झोप येत नव्हती आणि तिच्या मनात विचार आला की मी किती भाग्यवान आहे की,मला रमेश सारखा जीवनसाथी मिळाला.विचार करता करता तिला कधी झोप लागली हे तिला कळलच्ं नाही.आता तरी ती ,स्वत:ला भाग्यवान समजत होती .

असेच दिवस गेले ,तिच्या वर ट्रिटमेंट करण्यात आली, ती त्यातून सावरली , तिची काळजी घ्यायला तिची आई आली होती आणि रमेशही होताच त्यांच्या सोबतीला, पण या काळात तिची सासरची मंडळी मात्र तिला एकदाही बघायला आली नव्हती, हे तिला मनात कुठं तरी खटकतं होतं, तिने ते रमेशलाही बोलून दाखवलं, तर तो तिला म्हणाला,तू तुझी काळजी घे, या गोष्टिंमध्ये लक्ष देऊ नको.

डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या सूचना तिनी पाळल्या , आणि आता ती स्वत: सगळं करायला लागली, पण या सगळ्यात ती रमेशला खुप मिस करत होती,तो मात्र तिला टाळत होता,जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये काम आहे म्हणून घालवत होता, त्याच्या मनात काय चालले आहे हे मात्र कळत नव्हतं.काय असेल त्याच्या मनात हे पाहुया आपण पुढील भागात.....

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all