सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 6

Thoughts of young generation

सवत- एक सामजिक व्यथा- भाग 6

सकाळी नेहाला जाग आली ती फोनच्या आवाजाने,तिने बघीतलं तर रमेशचा फोन होता, तिने फोन उचलला.

रमेश-"गुड मॉर्निंग मैडम, झाली का झोप, आम्हांला तर झोपच नाही आली कुणी नव्हते तर"

नेहा-"तुझ्या फोननी जागी झाले,रात्री सर्व गप्पा मारत बसलो तर उशीर झाला होता,झाला का चहा पिऊन,अरे आजचा दिवस उद्या मी दुपार पर्यंत आपल्या घरात".

थोडसं इकडचं तिकडचं बोलून ती फोन ठेवते,घड्याळाकडे बघते तर आठ वाजलेले असतात,ती उठते ,बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन किचन मध्ये जाते ,तर आई नाश्त्याची तयारी करत असते.

नेहा-"मला उठवायच्ं ना आई"

आई-"तुला छान झोप लागली होती म्हणून नाही उठवलं आणि तसही रात्री आपण उशिराच झोपलो होतो ".

सकाळचा चहा नाश्ता करून होतो,नंतर आई विचारते, दुपारच्या जेवणात तुला काय खायला आवडेल.

नेहा-"तुला हवं ते कर , तोवर मी सरोज कडे जाऊन येते , परत उद्या सकाळी लवकर निघणार आहे जाता नाही येणार तिच्या कडे"

असं बोलून ती निघून जाते. आई तिच्या पाठमो-या आकृती कडे पहात दुपारच्या जेवणाची तयारी चालू करते. नेहा आल्यावर सगळे हसत खेळत जेवतात, जेवल्यानंतर बाबा तिला म्हणतात ,आम्हांला तुझ्याशी काही बोलायचं आहे.

नेहा-" बोला ना,बाबा"

बाबा-"तुला रमेश गावाला जे झाले त्याबद्दल काही बोलले का?"

नेहा-"नाही,गावाला काही झालं का?"

बाबा-" तुझ्या सासुबाईंनी रमेशला बोलवले होते,आम्हांलाही बोलवले होते"

नेहा-"पण इतक्या दिवसांत ना तुम्ही मला फोनवर काही बोलले नाही आणि रमेश ही काहीच बोलला नाही, असे काय झालं की मला कुणीही काहीच सांगितलं नाही "

बाबा-"फोनवर सांगण्यासारखे नव्हतं,आणि रमेशनी नाही सांगितलं तर आम्ही कसं सांगणार"

नेहा-"आता तरी सांगा"

बाबा-"हो सांगतो, पण तू तुला त्रास न करून घेता शांत चित्ताने ऐकून घे, त्याचा नीट विचार कर आणि मग तुला जो हवा तो निर्णय घे , आम्ही तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या बरोबर आहोत".

नेहा-"जास्त वेळ वाया न घालवता मला सांगा लवकर,मला आताच टेन्शन आलं आहे "

बाबा-"अगं, टेन्शन घेऊ नकोस,सांगतो सगळं, रमेशला त्याच्या आईने गावाला बोलवले तेव्हा आधीच आम्हांला ही फोन करून बोलावले, रमेश येण्याच्या आधीच आम्हांला सांगितले, की प्रोब्लेम तुमच्या मुलीमध्ये आहे तर आमच्या मूलानी का त्याग करावा,त्याला तर मूल होऊ शकते मग त्याचं दुसरं लग्न लावून देऊ , आणि नेहाला आम्ही काहीही कमी पडून देणार नाही,सगळया गोष्टी तिच्याच हातात असतील, आणि आम्हांला हे ही म्हणाले तुम्ही तुमच्या ओळखीतली एखादी मुलगी बघा"

नेहा-" तरीच मला ट्रिटमेंट झाल्यापासून त्यांनी एकही फोन केला नाही, मग रमेश काय म्हणाला बाबा ,त्याने यावर काय उत्तर दिले "

बाबा-" ते जेव्हा आमच्याशी बोलले तेव्हा रमेश आलेला नव्हता,जेव्हा तो आला तेव्हा आम्हांला तिथे बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला पण त्याच्या आईवडिलांसमोर जास्त बोलला नाही "

नेहा-"म्हणजे रमेशला बोलावून घेण्यासाठी त्यांच नाटक होतं तर , बाबा मी जे होईल त्याचा धीराने सामना करीन , तुमची मुलगी आहे, जर रमेशला दुसरं लग्न करायचं असेल तर त्याच्या आयुष्यातून कायमची निघुन येईल,कारण मी त्याला दुस-या कोणा बरोबर नाही पाहू शकत आणि एक स्त्री म्हणून विचार केला तर जिच्याशी तो लग्न करेल तिचीही संसारा बद्दल काही स्वप्न असतीलच की , आणि मी तिथे राहिली तर दोघींना ही रमेश न्याय नाही देऊ शकत, माझ्या आजारा बद्दल जेव्हा आम्हांला कळालं तेव्हा एका क्षणाचाही  विचार न करता त्याने लगेच ट्रिटमेंट करायची हे उत्तर दिल , त्याच्या सुखासाठी मीही त्याला सोडून देईन , आता पर्यंतच्या सगळ्या आठवणी मला पुरेशा आहेत पूर्ण आयुष्य घालवण्यासाठी ,माझ्या या निर्णयात द्याल ना माझी साथ"

बाबा-"अगं,आम्ही नेहमीच तुझ्या बरोबर आहोत , तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही पूर्णपणे तुझ्या पाठीशी आहोत,पण त्या आधी रमेश काय बोलला हे पूर्ण ऐकून तरी घे, रमेशने स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार दिला आणि म्हणाला की आम्ही एखादं मूल दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करु, खरचं तू खूप नशीबवान आहेस की,तुला असा जीवनसाथी मिळाला "

नेहा-"खरचं बाबा रमेश असं बोलला,मला पण तो म्हणाला होता की आपण एखादं मूल दत्तक घेऊन त्याला सांभाळू,तो गावावरून आल्या नंतर मनमोकळेपणाने राहू लागला कारण त्याने घरच्यांना ठाम पणे नकार दिला होता, आता एक एका गोष्टीचा उलगडा होत आहे, पण तो मला या संदर्भांत काहीही बोलला नाही "

बाबा-"अगं त्याला तूझं मन नसेल दुखवायचं , त्यानी नाही म्हटल्यावर तुझ्या सासू सास-यांनी आम्हांला बोलवून घेतले,आणि सांगितलं की आता आम्हांला नातवंडाच सुख मिळ्ण पूर्णपणे तुमच्या हातात आहे, तुझी सासू तर अगदी हात जोडून म्हणाली की आता यात तुम्हीच काही तरी करु शकता ,तुमच्या मुलीने आमच्या मुलावर इतकी जादू केली आहे की ,तो आमचं आता काहीही ऐकून घेणार नाही,तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगून रमेशला दुस-या लग्नासाठी तयार करायला सांगा,तो तिचेच ऐकेल,दुसरं कुणाचही ऐकणार नाही,

यावर आम्ही त्यांना म्हणालो आम्ही आमच्या मुलीला असं कसं सांगू शकतो, त्यावर तुझी सासू म्हणाली , त्याने तिच्यासाठी त्याग केला तसचं आता तिची वेळ आहे. हवं तर दुसरी मुलगीही तुम्हीच पहा ,जी नेहा बरोबर व्यवस्थित राहिल आणि सगळ्या गोष्टी नेहाच्याच हातात राहतील ,शिवाय तिला आईचं सुखही मिळेल "

नेहा-"ते असा विचारच कसा करु शकतात की मी तयार करावं ,कोणी स्वत:हून स्वत:साठी सवत आणेल का?, मला तर या काळात अशा विचाराची लोक आहेत याचचं आश्चर्य वाटते ".

बाबा-"तुझं सगळं म्हणणं खरं आहे पण ती गावाकडची माणसं

अजूनही तसाच विचार करतात,आणि तू समाजात पाहशील तर अजुनही ह्या रुढी चालू आहे,यात त्यांचा दोष नाही ,ते ज्या वातावरणात वाढले त्याचा परिणाम आहे,जाऊ दे तू या गोष्टींचा जास्त विचार करु नको".

नेहा-"असे कोणते आईवडील तरी असतील की जे आपल्या मुलीला पहिली बायको जिवंत असताना दुसरी बायको म्हणून आपल्या मुलीचं लग्न लावून देतील"

बाबा-"आम्हांला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे, त्यासाठी आम्ही तुला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणार

नाही,जो काही निर्णय आहे तो तू स्वत: नीट विचार करून घे"

नेहा-"बाबा असं कोड्यात का बोलताय जे आहे ते स्पष्ट बोला"

बाबा-"तुझ्या गावावरून आल्यावर सरोजचे बाबा देवळात भेटले होते, त्यांनी मला तुझी खुशाली विचारल्यावर,मी त्यांना सगळं सांगितलं"

सरोजचे बाबा-"तुमची मुलीच सगळं व्यवस्थित झालं हे पाहून खूप बरं वाटलं होतं,आणि सगळं असं कसं अचानक झालं,

आमच्या सरोजशी तर ती अशी असल्यामूळे लग्न करायलाही कुणी तयार होत नाही,आम्ही आहे तो पर्यंत ठिक आहे,पण नंतर तिचं कसं होणार याची नेहमीच चिंता लागून रहाते,खूप भोळी आहे ती, तिचा कुणीही गैर फ़ायदा घेऊ शकतं,म्हणून आम्हांला खूप जपावंही लागतं तिला"

बाबा-"हो ना , आलिया भोगासी असावे सादर,असे मी त्यांना म्हणालो खरं,पण रस्त्यावरून येताना विचार करत होतो की,प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी असतेच"

नेहा-"माझाही जीव तिच्या साठी तुटतो , पण त्या व्यतिरिक्त आपण काही करु शकत नाही "

बाबा-"मी जे सांगतो तुला ते पटलं तर बघ,त्यादिवशी घरी आल्या नंतर तुझ्या आईला आमचं झालेल बोलण मी सांगितल",

तेव्हा तुझी आई म्हणाली, "एका मुलीला मूल होऊ शकत नाही आणि तिथ त्या सरोजला मूल होऊ शकते पण तिच्याशी कोणी लग्न करणार नाही,काय देवाची एवढी पुजा करुन सुध्दा त्याला कशी दया येत नाही"

बाबा-"तिच्या तोंडातून हे वाक्य ऐकून माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरु झाले, दुस-या दिवशी मंदिरात सरोजचे बाबा भेटले,तर मी त्यांना म्हणालो खरं तर कसं बोलू ते कळत नाही,तुम्हांला तुमच्या नंतर सरोजची काळजी आहे,आणि आम्हांला नेहाला मूल होऊ शकत नाही याची,तिच्या सासुने आम्हांला आमच्या पसंतीने मुलगी पहायला सांगितली आहे,तुम्हांला तर माहितच आहे नेहा आणि सरोज मध्ये एकमेकीं विषयी किती प्रेम आहे, नेहा सरोजला छोट्या बहिणी सारखी पहाते आणि सरोज कोणाच ऐकत नाही परंतु नेहाच्ं मात्र ऐकते,तुमची जर हरकत नसेल तर रमेश बरोबर सरोजच लग्न करून दिले तर नेहाच्या सासू सास-याना नातवंड मिळेल आणि तुम्हांला जी सरोज बद्दल काळजी वाटते ती ही दूर होईल. तुम्ही विचार करा आणि मग मला सांगा,तुम्हांला हे मान्य असेल तरच मी नेहाशी बोलेन.त्या नंतर दोन दिवसांनी त्यांनी मला होकार दिला,असही तुला सुध्दा सरोजची काळजी असतेच की, तू  जर तिला आधार दिला तर दोघींचाही प्रोब्लेम सुटेल, असही तिच्या आईवडीलांचा पहिल्या पासूनच विश्वास आहे,आणि तुलाही मुलाचं सुख मिळेल,तिला आधार आणि ती तुझ्या शब्दाबाहेर नाही"

नेहा-"बाबा तुम्ही बोलताय हे सगळं,मी माझ्या सुखासाठी तिचा वापर करावा ही गोष्ट मला पटत नाही,आणि तुम्हांला सांगू का जर वेळ आली ना तर मी तिला माझ्या लहान बहीणी सारखी अशीच सांभाळू शकते ,त्यासाठी हे सगळं करण्याची काही गरज नाही आणि रमेश सुध्दा मला त्याबाबत काही बोलणार नाही"

बाबा-" मला जे वाटलं ते मी बोललो आणि सरोजच्या वडिलांनाही ही गोष्ट मान्य आहे,मी तुला कोणत्याही प्रकारचा आग्रह करणार नाही,तू तुझा निर्णय घे"

आई-"आता बसं झालं ,मी चहा केलाय तो घ्या सर्वांनी "

सगळ्यांनी चहा पिऊन झाल्यावर नेहा आणि तिची आई जेवणाच्या तयारीला लागले.

जेवण बनवता बनवता नेहाने आईला सहजच विचारलं ,"आई तुझ्या आयुष्यात अशी काही गोष्ट घडली असती तर काय केलं असतंस तू"

आई-"पहिली गोष्ट आमच्या वेळी आमचं मत कुणी विचारातच घेत नव्हतं,जे मोठ्या माणसांना योग्य वाटेल ते करायचे,माझं लग्न ठरलं तेव्हा मी तुझ्या बाबांना नीट पाहिलं ही नव्हतं आणि लग्न ठरलं, कुणीही मला विचारलं नाही की मला मुलगा पसंत आहे की नाही,आता निदान तुम्हांला निर्णय घेण्याचा तरी अधिकार आहे,आणि माझं तर तुझ्या आजी समोर काहिचं चालत नव्हतं,तुझे बाबाही आई बद्दल काहीच ऐकून घेत नसतं, आता ते काळानुरुप त्यांनी स्वत:त बदल केले आहे म्हणून ते माझ्या बरोबर काही गोष्टींचे मत तरी विचारतात, सगळचं माझं ऐकतात असं काही नाही,पण मी यात समाधानी आहे की ,निदान त्यांनी तुला तरी ते स्वातंत्र्य दिले आहे "

नेहा-" कशी राहिलीस ग, तू आई अशा परिस्थितीत "

आई-"देव देतो सामर्थ्य, तुझ्या बाबांवर जीव जडला होता ना त्या प्रेमासाठी आणि नंतर तुझ्याकडे पाहून, पण आता काळानुरुप त्यांच्यात इतका बदल झाला आहे की हेच का ते असा प्रश्न पडतो कधी कधी,तू व्हायच्या आधी खूप रागीट होते"

जेवण झाल्यावर सगळे थोड्या वेळाने इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले ,नंतर नेहा बोलली ,मी जाते झोपायला परत उद्या सकाळी लवकर निघायचं आहे,असं बोलून ती झोपायला जाते. आई बाबांना विचारते, काय निर्णय घेईल नेहा,बाबा बोलतात,जो घेईल त्यात आपण तिला साथ देऊ, आपल्याला तिला फक्त आनंदात बघायचं आहे .

इकडे नेहा झोपायला जाते,झोपण्याआधी ती रमेशला फोन करते ,सांगते की मी उद्या सकाळी निघेल,तो म्हणतो, व्यवस्थित ये, ती त्याला , I love you बोलून गुड नाईट बोलून फोन ठेवते आणि झोपायचा प्रयत्न करू लागते, बाबांकडून रमेशबद्दल ऐकल्यानंतर तिच्या मनातला रमेशचा आदर खूप वाढला होता

आता कधी एकदा त्याला पाहते असं तिला झालं होतं.

हा विचार करता करता ती झोपेच्या कधी आधीन झाली हे तिला सुध्दा कळलं नाही.

पुढ काय झालं हे पाहुया पुढच्या भागात....

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all