सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 7

Always accept new good changes

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 7

दुस-या दिवशी सकाळी नेहा लवकर उठली ,पटापट आवरल्ं ,मग बाबा तिला बस स्टॉप वर बसवायला गेले, तेव्हा नेहाला बोलले , तू आनंदी रहावसं एवढीच आमची अपेक्षा आहे.

नेहाला बस मिळाल्यावर बाबा परत घरी आले,आणि नेहाच्या आईला सांगितल की नेहाला  बस मिळाली. 

नेहा बस मधून उतरली आणि घरी जाण्यासाठी रिक्षात बसली ,तितक्यात बाबांचा फोन आला, तिने उचलला आणि सांगितल आत्ताच पोहोचली,मी करणारच होते फोन घरी गेल्यावर,आता मी रिक्षात आहे ,एवढं बोलुन तिने फोन ठेवून दिला.

परत फोन वाजला , रमेशचा होता ,कुठे पोहोचलीस , नेहाने उत्तर दिले,रिक्षात आहे ,पाच मिनिटात पोहोचेल,ठीक आहे म्हणत त्याने ठेवला. 

तिला वाटलं तो ऑफीसला असेल ,पण त्याने आज दांडी मारली होती आणि घरीच होता तिला सरप्राईस देण्यासाठी, घर छान आवरून ठेवलं होतं, मस्त पैकी दोघांसाठी आल्याचा चहा ठेवला होता,बाहेर रीमझिमं पाऊस पडत होता,मातीचा सुगंध आसमंतात दरवळत होता,म्हणून त्याने स्वत:च्या हाताने गरम गरम भजी काढले होते, रिक्षा दारासमोर येऊन उभी राहिली,पण तरीही तो दार उघडायला गेला नाही कारण त्याला तिला सरप्राईस द्यायचे होते, तिने स्वत:च्या चावीने दार उघडलं,तर तिला भजीचा छान वास आला, टेबलवर भजी आणि वाफाळणारा चहा होता, ती जवळ जाऊन हे सगळं खरेच आहे का हे पहात होती ,तितक्यात रमेशने मागून येऊन तिच्या कंबरेला आपल्या हातांचा विळखा घालत विचारले ,कसे वाटले सरप्राईस,ती मागे वळून बघत म्हणाली ,खूप छान.

परंतु तू मला सांगितलं नाही की तू सुट्टि घेतलीय.

रमेश-"मग मला तुझ्या चेह-यावर असा आनंद पहायला मिळाला नसता ना, तू रात्री किती तरी दिवसांनी I love you म्हणाली , मग मलाही अस तुझ्यासाठी सरप्राईस प्लान करावं लागलं ".

तिला ते पाहून मन खूपच भरुन आलं आणि म्हणाली-"किती प्रेम करतो तू माझ्यावर "

रमेश-"मी तुला आनंदी पहाण्यासाठी काहीही करु शकतो, तू माझी राणी आहेस ना , चल ग पटकन नाही तर हे सगळं थंड होऊन जाईल "

असं म्हणून दोघेही गप्पा मारता मारता चहा आणि भजीचा आस्वाद घेतात.

"मग राणी सरकार आज कुठे फिरायला जायचे आज सुट्टी घेतली आहे "- रमेश

नेहा-"तू नेशील तिथे"

रमेश-" ते पण एक सर प्राईस असेल तुझ्यासाठी ,मी आलोच तयार होवून ,तू तर तयारच आहेस."

असं म्हणून तो तयार व्हायला जातो. तो येईपर्यंत ती टेबल वरच सगळं व्यवस्थित आवरून ठेवते,तितक्यात तो येतो आणि म्हणतो,"चल निघूया,मी गाडी काढ्तो ,तोवर तू सगळं ठीक आहे पाहून लॉक करून ये"

तो गाडी घेऊन येइस्तोवर ही पण दार बंद करुन येते,गाडीत बसते.

नेहा,"आज माझं काही खरं नाही सरप्राईसच सरप्राईस"

गाडीत तो दोघांच आवडीचं गाण लावतो , हमने तुमको देखा,तुमने हमको देखा ऐसे ,आणि दोघे एकमेकांकडे पाहत हसतात, त्यात त्यांच्या आधीच्या आठ्वणींची डोळ्यांत एक चमक असते.

गाडी एका गेट्समोर येऊन थांबते, ती पाटी वाचते त्यावर लिहिलेले असते"वास्त्यल्य "

तो गाडीतून उतरतो ,दोघेही आत जातात, वॉचमनला ऑफिस बद्दल विचारून त्या दिशेने जातात,समोरच एक गृहस्थ बसलेले असतात ,ते उठून उभे राहतात आणि विचारतात -"तुम्ही मि. रमेश ना"

रमेश-"हो"

गृहस्थ-"मी विनायक रानडे, याआश्रमाचे मैनेजर,तुमच्या मित्राचा फोन आला होता,त्यांनी मला तुम्ही आज येणार आहे याची कल्पना दिली होती,या ना बसा"

रमेश-"तुम्हांला माहित आहे की आम्ही इथे का आलोय,ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ,त्याबद्दल सांगा,म्हणजे काय काय कागदपत्रे लागतील"

विनायकने त्या दोघांना सगळी माहिती व्यवस्थित समजून सांगितली,त्यांच्या मनात जे प्रश्न होते त्याचीही उत्तरे दिली.

विनायक-"चला,मी तुम्हांला आमचा आश्रम दाखवतो"

विनायकने सर्व आश्रम त्यांना फिरुन दाखवला, त्या आश्रमात फ़िरतांना बाहेर बागेत मूलं खेळत होती,त्यात एक मुलगी एका बाजुला बसून फक्त सगळ्यांना बघत होती. नेहा त्या मुली जवळ जाऊन बसली ,तिला विचारलं-"बाळ,नाव काय तुझं?"

ती काहिच बोलली नाही, विनायक म्हणाले ,ती जास्त बोलत नाही,पण खूप गोड आणि प्रेमळ आहे. परत नेहाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तरीही ती न बोलता तिथून निघून गेली. नेहाने विनायक कडे पहिलं,तो म्हणाला मागे तुमच्या सारखाच्ं एक जोडपं दत्तक घेण्यासाठी म्हणून आले होते,त्यांनी जुईला तसं सांगितलं होतं,ते नेहमी तिला भेटायला ही यायचे,नंतर कळाल्ं की त्यांची बायको गरोदर आहे,मग त्यांनी जुईला दत्तक नाही घेतलं,तेव्हा पासून ती कुणी ही आलं तरी त्यांच्याशी जास्त बोलत नाही , लहान मुलांना ही समजतं हो,निरागस असतात ती.

नेहाने मनातल्या मनातच ठरवलं,की आपण हिलाच दत्तक घेऊ,पण तसं तिने बोलून नाही दाखवलं.

प्रत्यक्षात जेव्हा घेऊ तेव्हाच बोलू. सगळा परिसर त्यांनी फिरुन बघितला,विनायकला म्हणाले ,"आम्ही सगळी कागदपत्रे आणि विचार विनिमय करुन महिनाभरात येऊ,तुमच्या  सहकार्याबद्दल धन्यवाद ."

विनायक-"अहो धन्यवाद कशाबद्दल,माझं तर कामचं आहे हे,पण तुमच्या सारखी लोक येऊन जेव्हा मुलांना दत्तक घेतात ना तेव्हा खरचं आपण जे करतोय त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं,तुम्हांला मुलांच प्रेम मिळतं आणि निराधार मुलांना हक्काचं घर मिळत ".

रमेश-"चला ,येतो आम्ही"

दोघेही गाडीत बसतात ,कुणीच कुणाशी काही बोलत नाही ,थोड्या वेळाने नेहा रमेशला बोलली,आपण जुईलाच दत्तक घेऊ,त्यावर रमेश तिला म्हणाला,तू अगदी माझ्या मनातले बोलली.

दोघेही आज एकदम खुष होते , थोडसं बागेत जाऊन बसले,जुई बद्दल थोडी स्वप्ने पाहिली आणि मग बाहेरच जेवून घरी गेले. नेहाने दुस-या दिवशी सकाळी आईवडीलांना फोन करून सांगितलं की रमेशनी तिला काय सरप्राईस दिले ते, तिला आनंदात बघून त्यांनाही बरं वाटल्ं पण मनात तरी थोडी भितीही होती ,मनातल्या मनात,देवा आमच्या मुलीला असचं आनंदात ठेव अशी प्रार्थना केली.

नेहा निघून गेल्यावर तिच्या सासुबाईंचा फोन आला होता,त्यांनी विचारलं,झालं का तुमच्ं नेहाशी बोलणं,काय म्हणाली ती, त्यांनी जे झालं ते सगळं व्यवस्थित सांगितल, त्यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या आता मीच तिच्याशी बोलते,बघू काय म्हणते,त्याचच्ं नेहाच्या आईवडिलांना टेन्शन आलं होतं ,की आता काय होणार,पण त्यांनी नेहाला आनंदात बघितल्यावर त्याबद्दल काही बोलले नाही,बघू पुढचं पुढं असा विचार केला.

रात्री नेहाच्या फोनवर एक फोन आलेला,ती बराच वेळ त्या फोनवर बोलत होती,फोनवर बोलताना तिच्या चेह-यावरचे रंग बदलत होते, ती बोलायचा प्रयत्न करत होती पण पुढची व्यक्ती तिला काही बोलूच देत नव्हती, ती फोन वर बोलत असताना रमेशच्ं ऑफिसच काम चालू होते त्यामुळे त्याला फक्त ती फोन वर बोलतीये येवढच कळल. फोन झाल्यावर ती रूममध्ये आल्यावर त्याने विचारलं तर ती म्हणाली, अरे मैत्रिणीचा होता ,ब-याच दिवसांनी केलेला ,म्हणून जास्त वेळ लागला,जाऊ दे ,दमलोय झोपू आता,असं म्हणून ते झोपले.

दमलेले असल्याने रमेशला झोप पटकन लागली,पण त्या फोनने नेहाची झोप मात्र उडाली होती, ती ऊठून बाल्कनीत जाऊन विचार करत बसली ,नंतर कंटाळा आल्यावर बेड वर येऊन पडली ,विचार करता करता पहाटे तिला कधी झोप लागली हे कळलच नाही .

कोणाचा असेल बरं फोन पाहुया पुढच्या भागात.....

(किती छान विचार आहेत दोघांचे ज्यांना मूल होऊ शकत नाही त्यांनी जर एखादं मूल दत्तक घेतले तर त्या मुलाला हक्काच घर मिळत आणि जोडप्याला मूलाचं  सुख,आता विचार बदलायची गरज आहे. नाही तर काही पुरुषांचा पुरुषत्व सिध्द करण्यासाठी हट्ट असतो ,की मला माझच्ं मुल पाहिजे , काहीजण तर मूल होत नाही म्हणून डीप्रेशन मध्ये पण जातात त्या ऐवजी सकारात्मक विचार करून,की माझ्या हातून एका अनाथ मुलाचं भविष्य घडत आहे आणि आयुष्य आनंदात घालवावे)

थोडसं ऑफिसच काम असल्यामूळे पुढील भाग दोन दिवसांनी

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all