सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 8

sometimes mind gets confused

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 8

मागच्या भागात आपण पाहिले की, नेहाला फोन येतो आणि ती रात्रभर जागून काढते, फोन तिच्या सासूने केलेला असतो,बरच्ं काही बोलते की आम्ही कमनशिबी म्हणून तू आमच्या पदरात पडली, काय काळी जादू केली आमच्या पोरावर की तो आमचं काही ऐकतच नाही,त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं,हिच्या बरोबर लग्न करू नको,पण तू तुझ्या प्रेमात इतकं वेडं केलं होतं की,पोरगं आमचं ऐकलच नाही,नंतर त्याच्या सुखासाठी आम्ही पण झुकलो, तुला सून म्हणून स्विकारलं, पण आम्हांला काय मिळालं ,ना नातवंडांच सुख ना पोराचं सुख,कुठे फ़ेड़शील हे पाप सुनबाई.

नेहा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, तो काही लहान नाही मी त्याचे कान भरायला ,त्याचं त्याला कळत सगळं. सासुबाई म्हणाल्या, तेच तर तो इतका मोठा झाला आहे की,आईवडील जे म्हणतात ते सगळचं चुकीचं बोलतात , असं त्याला वाटतं,ते जाऊ दे ,तू मला सांग तुमच्या एकमेकांच्या प्रेमा खातर जे काही त्याग करायचे ते माझ्या मुलानीच का , तुझं त्याच्या वर प्रेम नाही का ,तू त्याच्या साठी काही त्याग केला तर कुठं बिघडलं, आणि आम्ही असं तरी कुठे म्हणतोय ,की तू त्याच्या आयुष्यातून निघून जा, तुझ्या वडिलांनी जे स्थळ दाखवलं ते काय वाईट आहे, ती तुझी लाडकी सरोज आहे आणि तिच्याशी असही कुणी लग्न करणार नाही, तू तिला अशीही सांभाळायला तयार आहेसच ना ,मग तिला घेऊन ये पण नात्याला कधीही नाव असलेलं चांगलं, मूलं होइस्तोवर त्यांच नातं असेल,त्यानंतर ती तर मतिमंदच आहे,तिला मूल सांभाळणंही जमणार नाही ,तुला ही मातृ सुख भेटेल आणि तू तिला आयुष्यभर तुझ्या बरोबर सांभाळू शकते,आम्ही कोणीही काही बोलणार नाही. अजून एक गोष्ट मी तुझ्याशी जे काही बोलले ते रमेशला कळता कामा नये, तुलाच या गोष्टीसाठी रमेशला तयार करावं लागेल, नाहितर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल,त्याला जबाबदार तू असशील, मी तुला एक महिन्याचा वेळ देते.

नेहा म्हणाली-" तुम्ही एक बाई असून दुस-या बाईला का समजून घेत नाही,म्हणून तर आपला समाज इतका पाठिमागे आहे,ही गोष्ट मी नाही करु शकत "

सासूबाई-"मला समाज नाही ना नातवंडाच्ं सुख देऊ शकत, मला ज्ञान नका शिकवू, मी खूप हट्टी आहे,जे बोलते ते करुन दाखवते,मग नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ तुमची असेल ,आणि मी तर असं ऐकलं होतं की प्रेमासाठी तुम्ही आपला जीव देऊ शकता, मी जीव नाही मागितला , फक्त नातवंडांसाठी दुस-या लग्नाची मागणी करते ,ती पण अश्या मुलीशी जिच्या येण्याने तुमच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही ". एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला.

त्यांनी तर फोन ठेवला पण त्यानंतर तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते, खरचं मी इतकी स्वार्थी आहे का, पण माझ्यात शारीरिक दोष आहे यात माझी काय चूक,स्वत:च्या मुलासमोर काही चालतं नाही म्हणून मला धमकी देतात, मी आजारी होते तर साधं विचारलं सुध्दा नाही, एक स्त्री असून दुस-या स्त्रीच मन समजू शकत नाही, असं कोणत्या स्त्रीला वाटत की तिला मूल होऊ नये,मलाही खूप दु:ख झालं निर्णय घेताना ,एक अपराधी पणाची भावना आधी पासूनच होती, विचार केला तर खरचं माझ्या प्रेमा खातर रमेशनी लगेच निर्णय घेतला,मग मी का विचार करतेय ,काही समजत नाही काय करावे ते,उद्या आई बाबांशी बोलते.

विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं म्हणून ती बेडवर येऊन झोपली,पहाटे कधी तरी तिचा डोळा लागला. आताही सकाळी ती उठली ते फोनच्या आवाजाने,घड्याळाकडे लक्ष गेलं तर दहा वाजून गेले होते,तिने पटकन फोन उचलला, रमेशने विचारलं-"उठली का?"

नेहा-"आता तुझा फोन आला नसता तर अजून किती वेळ झोपली असती माहित नाही, बरं झालं तू फोन केला,अरे तुला डबा पण नाही दिला,नाश्ता तरी केला की नाही"

रमेश-"अगं हो, किती प्रश्न विचारशील ,मला जाग आली ,बघीतलं तर तू छान गाढ झोपेत होतीस,म्हणून नाही उठवलं,माझ आवरल्ं ,ब्रेड बटर खाल्ल आणि मग ऑफिसला आलो, तुला विचारण्यासाठी फोन केला की,बरं वाटतं का तुला ,नाही तर डॉक्टरकडे जाऊन ये".

नेहा-" अरे मला रात्री जरा उशीरा झोप लागली,म्हणून उशीर झाला आणि थोडसं डोकं दुखत होतं,पण आता झोप झाल्यावर बरं वाटतंय,तू काळजी नको करु आणि दुपारी काही तरी खा "

रमेश-"बाय".

नेहा आळस झटकून उठली, आंघोळ करुन फ्रेश झाली ,देवाला दिवा लावला आणि प्रार्थना केली की,मला योग्य निर्णय घेण्यात मदत कर.

नाश्ता केला आणि आईला फोन केला, तिकडून आईने फोन उचलला आणि विचारलं-"काय गं आज सकाळी सकाळी,सगळं ठीक आहे ना "

नेहा-"हो गं,मला ना तुझ्याशी काहितरी बोलयचं आहे"

आई-"बोल ना"

नेहा-"काल रात्री सासूबाईंचा फोन आला होता "

आई-"मग काय म्हणाल्या,आम्हांलाही केला होता, इमोशनली ब्लैकमेल करत होत्या ,जीव देईन असं बोलत होत्या."

नेहाने सविस्तर त्या काय काय बोलल्या हे सगळं सांगितलं आणि विचारलं-"आई खरचं मी इतकी स्वार्थी आहे का गं?"

आई -"नाही रे बाळा ,तुझ्या जागी कुणीही असतं तरी असच वागलं असतं "

नेहा-"मी काय करु ते मला समजत नाही,काय बरोबर काय चुकीचं तेही कळण बंद झालय,डोकं सून्न झालय,म्हणून तुला फोन केला,तेव्ह्ढ्च कमी की काय परत धमकी पण दिली,काय करावं सुचत नाही,तुच सांग काय करायचं ते ".

आई-"मी तुझं मन समजू शकते पण मलाही असं वाटतं की त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करावास,हवं तर तू तुझा वेळ घे आणि नीट विचार करून निर्णय घे, एक गोष्ट मात्र नक्की की रमेश तुझा शब्द नाही मोडणार आणि हं तू जर लग्न लावण्याचा निर्णय घेतला तर सरोजच्या बाबांच तिच्या लग्नाचं स्वप्न पूर्ण होईल आणि ती तुझ्या बरोबरच रहाणार आहे तर चिंता मुक्त होतील असे ते बाबांना म्हणाले होते आणि हेही नेहाला सांगा ,असं करून ती कोणत्याही प्रकारचा सरोजचा वापर न करता ,एका बापाची काळजी मिटवून टाकेल,म्हणजे मला समाधानाने मरता येईल"

नेहा-"आई बाबा कुठे गेले आणि ते काही बोलले का नंतर"

आई-" बाहेर गेले,येतील आता , पण ते म्हणाले की ,तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्या बरोबर असू , पण निर्णय घेताना तू रमेशचाही विचार कर". असे बोलून तिने फोन ठेवून दिला.

ती विचार करु लागली की,रमेशला न समजता आपण त्याच्या मनातलं कसं जाणून घेऊ शकतो. संध्याकाळी रमेश ऑफिस मधून आल्यावर तिने चहा केला,तिने त्याला आणि स्वत:लाही घेतला.चहा पिता पिता ती रमेशला म्हणाली,"मला आश्चर्य वाटते की आजही लोक असा विचार करतात याचा."

रमेश-"काय झालं ,कळेल का मला"

नेहा-" अरे माझी मैत्रिण आहे एक,तिला दहा वर्षे मूल झालं नाही म्हणून तिचा नवरा तिला न विचारता सरळ दुसरं लग्न करून आला,ती बिचारी इतकी रडत होती सगळं सांगताना ,तिने त्याला विचारलं की असं केलं तर तो म्हणाला त्याला त्याच स्वत:च मूल हवं आहे,बिचारी किती रडत होती"

रमेश-" जरी आपण म्हटलो की समाज बदलत चाललाय तरी लोकांचे विचार नाही बदलत ,प्रत्येकाचा एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो,तू नको विचार करु त्याचा जास्त"

मनातल्या मनात (" कसं सांगू तुला की माझ्या आई वडिलांच तेच मत आहे हे सांगायची सुध्दा लाज वाटते, तसही मी तसं काही करणाराच्ं नाही तर सांगून तुला कशाला त्रास देऊ , पहिलं आता मूल दत्तक घेण्याच्या अटींची पूर्तता करायच्या मागे लागले पाहिजे,म्हणजे तुझ्या मनातही असे काही विचार येणार नाही आणि घरचेही शांत बसतील.)

काय निर्णय घेईल नेहा हे पाहू आपण पुढच्या भागात.....

रुपाली थोरात

🎭 Series Post

View all