Login

सावञ भाग -२

सावञ नात्यांमधील आपलेपणा

कालचा प्रसंग ताजाच होता .आज मधल्या सुट्टीत बाईंनी सुमेधला माझ्यासाठी जेवायला थांब म्हणुन सांगितल्याने तो दरवाज्यात बाईंची वाट बघत उभा होता...व बाहेर काही मुलं परत त्याच्यावर हसत होती...

आज बाई व सावंतबाई सोबत असल्याने सावंतबाईच्याही ते नजरेस पडलं...

"त्या सहजच पुटपुटल्या ....स्ञीच काही खर नसत बघा बाई...लोक घोड्यावरही बसू देत नाहीत व गाड्यावरही बसू देत नाहित..."

"म्हणजे काय?मला नाही समजलं हो सावंतबाई...".

"अहो ..ह्या मुलाबद्दल बोलते मी ,त्याच्या आईची दशा हो..".

"म्हणजे तुम्ही सुमेधच्या आईला ओळखता,सावञ आई आहे म्हणे त्याला ...काल मुल चिडवत होती..रोज फक्त लोंच पोळी असते म्हणे डब्यात पण ,मुख्याधापिका बाईंना तर आईच फार कौतुक सांगत होता हो...काय?खर व काय खोट मला तर कळतच नाही बघा...".

"म्हणजे ?"

"अहो मुल चिडवतात सावञ आई आहे व तो ते मान्यच करत नाही ".

"कसा करेल हो ...तीने कधी त्याला जाणवू दिल नाही ना?सहा महिन्याच बाळ कुशीत घेऊन संसार थाटला ,पण संकट काही सुटेनात बिचारीचे...".

"म्हणजे हो बाई.. मला जाणुन घ्यायच हो...त्यासाठीच मी त्याला माझ्यासोबत जेवायला थांबल आहे हो..."

"हो का?,मग त्याच जेवण झाल की बोलू आपण चालेल ना?नहाक त्याच्यासमोर विषय नको वाटतो ना?

"अगदीच हो..."

दोघीही सुमेधला जवळ घेऊन जेवल्यात आज डब्यात पोळीसोबत भेंडीची भाजी होती...

सुमेध म्हणाला,"बाई मला भेंडीची भाजी आवडते ना?म्हणुन आईने आज शेजारच्या काकूकडून करून घेतली ...बाबा बाहेर गावाला गेलेत ना?...बाबा असले कि आईला रागावतात कोणाला कामाला बोलवल का?

"हो का?तुला आवडते मग मी आणत जाईल हं...तुझ्यासाठी जास्त "सावंतबाई म्हणाल्या.

"नको बाई ..आज भरपुर खाली मी घरीही आहे अजून ".

सुभेध पटापटा आनंदाने डबा संपवत ,"बाई मी जाऊ का?"विचारून निघून गेला...

दोघीही फक्त त्या लहानग्या जीवाकडे बघत बसल्या...

मधल्या सुट्टीला तसा बराच आवधी असल्याने सावंतबाई ...बोलू लागल्या..

"अहो बाई ..सुमेधची ही दुसरी आई बघा,पहिली आई व वडिलांच लव्ह माॅरेज हो...त्यामुळे सुमेधच्या बाबांच्या घरून विरोध होता म्हणून ते बाजूला रहात त्यातच दिवस गेले व दोन वर्षात सुमेध झाला ...कमी वय व अजारपण त्यामुळे शारिरीक कमजोरीने बाळांतपणात आजार पाठिशी लागला व सहा महिन्यात ती सई देवाघरी गेली हो..."


"बाई ...गं.."

बाईंच्या अंगावर शहाराच आला ...

"मग हो ..सहा महिन्याच बाळ मध्यमवर्गिय जिवन व घरच्यांचा विरोध सारच बघत सुमेधच्या बाबाने मुलाची काळजी घ्यायला सुरवात केली...तशी महिनाभर लाजम काजम त्यांची आई होती जवळ पण घरी असलेल्या सुनांनी सुमेधला गावाकडे आणुन आमच्या हिश्यात वाटेकरी नको अस बजावल्याने काळजावर दगड ठेवून त्या परत गेल्या...
लहानग बाळ व सुमेधच्या बाबाची कसरत तशी आजूबाजूचे बघून होते ..त्यातच मेघा म्हणजे सुमेधची आताची आई ही त्यांच्याच शेजारी रहात होती...चार बहिणी व हातावर जगणार्या कुटुंबात रहाणारी मेघा सुमेधला अनाथ म्हणुन सांभाळू लगली....तसे घरातले सगळेच सुमेधला जीव लावू लागले...

सुमेधला सांभाळता सांभाळता ती कधी त्याच्यासोबत बाबांच्याही प्रेमात पडली समजलच नाही...मेघा सुमेधमध्ये खुपच गुंतली .पण एका विधूराशी लग्न लावण्यासाठी घरचे विरोध करू लागले...सुमेधच्या वडिलांना तसही सुमेधसाठी आई हवी होती ...मेघाला स्विकारण त्याला लवकर जमणार नव्हत पण तोही मुलासाठी स्वार्थी निघाला...मिञपरिवाराच्या दबावाने व पुढाकाराने दोघांच्या घरच्यांना मनवून मेघाच लग्न सुमेधच्या बाबाशी झाल व मेघा आता त्याची हक्काची आई झाली...".

"बापरे..म्हणजे फसलीच हो ..ती"

"हो ना ,सुमेधच्या वडिलांमध्ये व तिच्या वयात बरच अंतर बरं..पण तरीही सुमेधशी ती आईच्या मायेने गुंतली होती म्हणुन लग्नाचा हट्ट धरून बसली व घरच्यांचाही नाईलाज झाला बघा .पण खरी कहाणी तर तेथून पुढे सुरू झाली...".

"म्हणजे हो ..‌"

"अहो बाई तीने लग्न केल व संकटांची साकळीच सुरू झाली बघा.‌‌..सहा महिन्याचा सुमेध तीने आपला समजून छातीशी कवटाळला ,आईची माया दिली पण देव निष्ठुर हो ,तीलाच ग्रहण लागलं..सुमेधचा वाढदिवस तीने थाटामाटात केला..हळूहळू सुमेधच्या नातलगांनाही आपलस केलं.सगळ छान छान होत होत ...तिघांचा संसार व सारच सुरळीत होत ..सुमेध तीन वर्षाचा झाला व हळूहळू तीची तब्बेत खालावू लागली हो ..आता सुमेध मोठा झाला .ती सगळ्यांची लाडकी झाली म्हणुन तीने नाटक सुरू केले असच शेजारी पाजारी व नातलग बोलु लागले..."

"बाई गं...काय?ना जग "

"हो ना.. "

"काय..झालं आहे पण बिचारीला..."