Login

सावञ भाग -३

सावञ नात्यांमधील आपलेपणा
..
"अहो...तीला अशक्तपणा जाणवू लागला ,डोक दुखण व छोट्यामोठ्या व्याधी सुरू झाल्या आधीच पहिली पत्नी वारलेली व ही पण आजारी म्हणुन सुमेधचे वडिल आता चिडचीड करू लागले..मुलाची जबाबदारी स्विकारत माहेरचा विरोध पत्कारलेली ती कोणालाच काही सांगू शकत नव्हती हो...आईला सांगायचा प्रयत्न केला तर तीनेही दुर्लक्ष केल...व एका दिवशी अचानक ती बेशुध्दच पडली ...दवाखान्यात नेल तर बोन काॅन्सरच निदान झालं हो...".

"बापरे किती भयानक हे..".

"हो ना ..पण अजूनही तो पुर्ण शरिरात भिनलेला नव्हता ,तीचे बरे होण्याचे ५०% होप्स होते .घाबरलेले सुमेधचे वडिल आता तीला वाचवण्यासाठी धडपडू लागले ,पण जगाला सगळच सागण शक्य नव्हत ना?तोही अभागी पहिली पत्नी गेली व दुसरीसही चार वर्षात दुर्धर आजार मग काय?त्यानेच कंबर कसली व सुमेधसोबत तीला बरच करायच हा पण उचलला ..त्यासाठी तो सगळच शिकला.‌‌..जगासाठी नाही तर त्याच्या मुलासाठी त्याची दुसरी आई तरी देवाला नेऊ द्यायची नाही ह्यासाठी तो प्रयत्न करू लागला...केमो सुरू झाले...हेवी औषधांचा डोस व होणार्या ञासाने ती बेडवरच पडून राहू लागली...पण खचली मुळीच नाही ...आता ती बर्यापैकी दुरूस्त होण्याच्या मार्गावर आहे...पण शरिर कामाला तितकेसे साथ देत नाही.घरात सुमेधचे बाबाच आवरतात अजुन ...नातलग दुरावलेत कारण त्यांना सुमेधचे वडिलच कुठेतरी चुकत असावेत म्हणून बायका आजारी पडतात अस वाटत बघा.‌..काय?करतील हो ते तरी.."

"सावंतबाई ..खुपच भयानक परिस्थिती हो..ही कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी ,बिचारा अभागी माणुस तो..".

"हो ना खरच हो ..स्वताचा ञास सहन करून माञ त्या बाईने मुलाचा कधीच राग राग केला नाही हो पोटच्या पोराला माणुस हिडिस फिडिस करत अशावेळी पण तीचा ञास सहन करत ती त्या परिस्थितीतही त्याला कावेतच घेऊन बसायची बघा ...""

"ओह...किती गोड हो ती..,कशाला म्हणेल हो मग तो सावञ ,फक्त जन्म देण काम नसत ना?आईच तर जो जीव लागतो तोही रक्ताहून मोठा ना?...काही सख्ख्या आया मुलांशी दुपटी वागतात पण हिने तर किती त्याग केला हो ..त्यात गुंतलेल्या जीवामुळे नरक यातनाही भोगल्यात हो..!..सुमेध तीच स्वप्न पुर्ण करेल बघा .त्या मायलेकरांच प्रेम समाजापुढे आदर्श ठराव असेच असेल हो..."

"हो बाई..ती पण तेच म्हणते ,माझ कर्म देवाने बघितलं ..लोकांना बोलू द्या काहीही ,पण मी माझ्या सुमेधला काहीही कमी पडू देणार नाही व तोही मोठा होऊन माझे उपकार विसरणार नाही मला दुरावणार नाही...".


"व्वा ..!...

किती विश्वास हो तीला ,ह्या समाज्यातील विकृत वृतीचा खरच येथे अंत व्हावा बघा...एक निर्मळ नात कस विदारक कराव असा असतो समाज ...लोकांना ञास देण व नको ते गैरसमज पसरवत वितृष्ट आणणारे चांगल कधीच दिसत नाही का?हो ह्या लोकांना..."

"नाही ना?बाई..हा समाज आहे ,चांगल नजरेत खुपत ह्यांच्या .‌"

"खरच हो ..जाऊ द्या मी लक्ष देईल आता सुमेधकडे ,पण त्याच्या आईला भेटायला आवडेल मला..."

"हो बाई . ..तुमच माझ्याकडे येण झाल की जाऊ ना?आपण .."

"हो नक्कीच.. त्या जन्म न दिलेल्या पण मातृत्वाने परिपुर्ण मातेला माझ शतश:नमन हो..".

अस म्हणत दोघीही मधली सुट्टी संपल्याने आपल्या वर्गांवर चालत्या झाल्या ..

बाई माञ सुमेध व त्याच्या आईच्या त्या पविञ नात्यात माञ हरवून गेल्या...सुमेधच्या गोड शब्दांचा," ती माझी सावञ आई नाही "चा स्वर मनाला तृप्तता देऊन गेला...