Login

सावित्रीबाई फुले भाषण

सावित्रीबाई फुले भाषण
पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मित्रिणींनो मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.आज आपण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत या निमित्ताने आपण सारे एकत्र जमलेलो आहोत.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव जिल्हा सातारा येथे अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते.ते गावचे पाटील होते.इ.स.१८४० साली सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्लग्नाच्यावेळी सावित्रीबाई यांचे वय ९ वर्षे तर ज्योतिबा यांचे वय १३ एव्हढे होते.सावित्रीबाई यांचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर,परंतु पेशव्यानी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्यात येऊन राहिले.व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.त्यावेळी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता.तेव्हा स्त्रीयांना व मुलींना शिक्षणाची कसली सोय उपलब्ध नव्हती. मुलींना शाळेत कोणीही पाठवत नसत अशा काळात या महान स्त्री चा जन्म झाला होता.त्या काळातील मुलींच्या नशिबात फक्त चूल आणि मूल हेच होते.
सावित्रीबाईंना लग्नापूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट म्हणून दिले होते.आणि ते पुस्तक सावित्रीबाई सासरी येताना घेऊन आल्या होत्या.त्यावरुन ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला.त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाई यांना देखील शिकविले.ज्योतिबांचा सांभाळ त्यांच्या मावस आत्या सगुणाबई यांनीच केला होता.ज्योतिबांच्या आत्या सगुणाबाई ह्या त्यावेळी एका इंग्रज अधिकाऱ्याचा घरी दाई म्हणून काम करत होत्या. आणि त्यांच्या मुलाचा सांभाळ करत होत्या.त्यामुळे त्यांना इंग्रजी समजत होते.व थोडेफार इंग्रजी त्यांना बोलता देखील येत होते.सावित्रीबाई आणि सगुणाबाई या रोज दुपारी ज्योतिबांना त्यांच्या शेतात जेवण घेऊन जात असत.त्यावेळी ज्योतिबांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीचा पेन करत आणि मातीवर त्या दोघींना इंग्रजी अक्षरांची ओळख करून देत आणि
शिकवत.अशाप्रकारे याच जमिनीच्या धुळीतून शिक्षणाची तेजस्वी अग्नि जन्माला आली.पुढे सावित्रीबाई आणि ज्योतिबा या दोघांनीही रीतसर शिक्षण घेतले ज्यावेळी ज्योतिबा सावित्रीबाई यांना शिकवत होते तेव्हा त्यांना समाजातील अशिक्षित लोक खूप टोमणे मारायचे त्यांची चेष्टा करायचे,थट्टा करायचे.परंतु सावित्रीबाईंची मनापासून शिक्षण घेण्याची तयारी होती.त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली.ज्योतिबांनी सावित्रीबाईंना गणित आणि इंग्रजी देखील लिहायला आणि वाचायला शिकविले.सावित्रीबाई प्रमाणेच सर्व स्त्रियांना शिक्षण द्यावे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले असे ज्योतिबांना सतत वाटायचे.
काही काळानंतर एका ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी मिस्सेल यांनी इ.स.१८४० रोजी पुण्याच्या छबिलदास यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा चालू केली होती.सावित्रीबाई यांनी तेथेच पुढील शिक्षण घेतले.आणि याच मिस्सेल सावित्रीबाई यांच्या प्रेरणास्थान देखील बनल्या.शिक्षण घेत असताना सावित्रीबाई यांनी थॉमस क्लार्कसन यांचे जीवनचरित्र वाचले.थॉमस क्लार्कसन हे गुलामगिरी विरोधात काम करणारे होते.त्या जीवनचरित्रामध्ये आफ्रिकन गुलामांच्या संघर्षमय जीवनाचा लेखाजोखा छापलेला होता.हे पुस्तक वाचताना त्यांना असे समजले की संपूर्ण समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही.शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे उत्तम साधन आहे हे त्यांच्या लक्षात आले.आणि त्यामुळेच सावित्रीबाईंच्या मनात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ आणखीनच घट्ट रोवली गेली.त्यांनी समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.ज्योतिबांनी सावित्रीबाई यांच्या मनातील स्त्री शिक्षणाची व समाज परिवर्तनाबद्दलची आस्था लक्षात घेऊन पुढे त्यांनी १ मे इ.स.१८४७ रोजी सावित्रीबाई यांना सगुणाऊ येथे मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली.सावित्रीबाई तेथे आनंदाने आणि उत्साहाने शिकवू लागल्या.पुढे ही शाळा मध्येच बंद पडली.
जोतिबांनी नंतर १ जानेवारी इ.स.१८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.तेथील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंची निवड केली.आणि हीच शाळा भारतातील मुलींची पहिली शाळा ठरली.त्याकाळी त्या शाळेमध्ये एकूण ९ मुलींनी प्रवेश घेतला.त्याकाळातील लोक अडाणी आणि अज्ञानी होते. सावित्रीबाई त्यावेळी समाजातील मुलींना दिलेले बोधवाक्य म्हणजे “विनाकारण वेळ व्यर्थ घालवू नका जा आणि शिक्षण प्राप्त करा.” जसेजसे मुलींना आणि स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटत गेले.तसेतसे शाळेतील मुलींची संख्या ही वाढू लागली.त्यात अभिमानास्पद बाब ही की दलित समाजातील मुलींची संख्या ही जास्त होती.पण समाजाने ही गोष्ट स्वीकारली नव्हती.
पुढे जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरातून निघायच्या तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे,दगड-माती आणि चिखल फेकायचे.बऱ्याचवेळी त्यांचे कपडे खराब व्हायचे.परंतु त्या घाबरत नव्हत्या.काही उणमत्तानी तर त्यांच्यावर हात टाकायची देखील भाषा केली.आपले स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी अविरतपणे चालू ठेवले. आणि अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरवली. आजच्या काळात जर कुठल्या व्यक्तीने शिक्षकांवर दगडफेक केली केव्हा शेण फेकले तर काय होणार याची जाणीव तुम्हा सर्वांना आहे.शेतकऱ्यांनच्या मुलांना आणि मुलींना दिवसा वेळ भेटत नव्हता म्हणून त्यांच्यासाठी सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा चालवली. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी एकूण ४०-४५ शाळा काढल्या.त्यातील १८ शाळा या मुलींसाठी होत्या.या यशस्वी शाळांचे स्वागत सनातनी आणि उच्चवर्णीयांनी “धर्म बुडाला… जग बुडणार…कली आला” असे सांगून केले आणि त्यांचा विरोध केला.पुढे काही दिवसांनी इ.स.१८४९ रोजी पुण्यातील मुस्लिम महिलांना शिक्षित करण्यासाठी एका मुस्लिम माणसाच्या घरी म्हणजेच उस्मान शेख यांच्या घरी सावित्रीबाई यांनी शाळा सुरू केली.त्यांचे हे शिक्षणातील योगदान पाहून १६ नोव्हेंबर इ.स.१८५२ रोजी त्यांना ब्रिटिश शासनातर्फे गौरविण्यात आले. इ.स.१८६४ रोजी त्यांनी अनाथांसाठी बालआश्रमसुरू केले.त्यांच्या या महान कार्याचे ब्रिटिश सरकारने सुध्दा स्वागत केले.
बालविवाहामुळे त्या काळात मुलगी आणि मुलांच्या वयात बरीच तफावत होती.त्यामुळे लहान वयातच मुली विधवा होत असत.बालविधवांना त्यांचे मुंडन करण्यास भाग पाडले जात होते आणि त्यांचे लैंगिक शोषणही होत होते.सावित्रीबाई यांनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पती-पत्नी दोघांनीही विधवांच्या मदतीसाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातच केअर सेंटर सुरू केले होते. उघडले.आणि गरोदर विधवांना सनातनी समाजापासून वाचविण्यासाठी अथक परीश्रम घेतले. त्या काळात अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दृष्टकृत्यांमुळे अनेक स्त्रियांना आपला जीव द्यावा लागत होता.सावित्रीबाईंनी महिलांसाठी स्वतंत्र विहिरही खोदली.
सावित्रीबाई फुले यांच्या अभ्यासाबद्दल सांगायचे झाले तर सावित्रीबाई फुले मुलींवरील भेदभावांच्या विरोधात कविता लिहीत असत.इ.स.१८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांची बावन्नकशी,सुबोधरत्नाकर ही देखील काव्यपुस्तके होती. जी जगभर प्रसिद्ध झाली. त्यांच्या कित्येक कवितांमध्ये निसर्गाची मनोरम वर्णननही आलेली आहेत.शिक्षणाप्रसाराचा उपक्रम चालू असताना सावित्रीबाई आणि ज्योतिबांना अनेक संघर्ष करावे लागले. स्वतःचे घर सोडवे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.पुढे मात्र सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.पण हे सर्व सावित्रीबाई पतीच्या पावलांवर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या,तर त्यांचीपण त्या कार्यावर खूप निष्ठा होती.
पुढे २८ नोव्हेंबर १८९० ला पुण्यामाधील प्लेगच्या साथीने ज्योतिबांचा मृत्यू झाला. प्लेगच्या साथीमुळे अनेक लोकांचे हाल होत होते.त्यावेळी सावित्रीबाईंनी या पीडित रुग्णांची सेवा केली.त्यावेळी त्यांनी त्यांचे पुत्र यशवंतराव यांच्या साथीने प्लेग रुग्णांनसाठी दवाखाना उघडला.रुग्णाची सेवा करत असतानाच त्यांनादेखील प्लेगची लागण झाली.दिनांक १० मार्च इ. स.१९८७ रोजी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला. समाजासाठी आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अशा स्त्रीला विनम्र अभिवादन.ऐवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपविते.
जय हिंद!जय भारत!!!.