Login

सावत्र नाही ती तर आपलीच भाग 5

सावत्र नाही ती तर खुप प्रेमळ आहे
सावत्र नाही ती तर आपलीच भाग 5

©️®️शिल्पा सुतार

सकाळी प्रियांका किचन मधे होती. मुल शाळेत जायची तयारी करत होते. दोघ डायनिंग टेबल वर येवुन बसले. तिने दोघांसाठी नाश्ता आणला, दूध आणल. त्यांचे डबे समोर ठेवले. दोघ मुल आश्चर्याने बघत होते.

अनिकेत कांडावल्या सारखा झाला होता.

"आई कोणती भाजी आहे?"

"निधी तुझी बटाट्याची आणि अनिकेत साठी उसळ."

तो बघत राहिला. दोघांची आवडती भाजी होती. रोज डबा नसायचा. स्वयंपाकावाल्या मावशी उशिरा यायच्या. त्यांना कॅन्टीन मध्ये खाव लागायच.

लंच ब्रेक मधे त्याचा डबा बघून बरेच मुल आश्चर्य चकित झाले होते. भाजी ही खूप छान झाली होती. तो विचार करत होता आई चांगली आहे.

संध्याकाळी प्रियांका सासुबाईंना पुस्तक वाचून दाखवत होती. बाजूला निधी बसुन अभ्यास करत होती. अनिकेत आला. "आजी मी मित्राकडे जावु का गणित येत नाही."

"मी बघू का?"

तो काही म्हटला नाही. वही घेवून आला. प्रियांकाने पटकन सोडवून दिल. पुढचे एक्सरसाईज कशी करायची ते ही शिकवल. त्याने शांत पणे समजून घेतल. तो ही तिथे बसुन गणित करत होता.

रघुवीर आत आले. दोघ मुल प्रियांका जवळ छान रमले होते. ते समाधानी होते.

अनिकेत नीट वागतो आहे. ते खुश होते.

आज सासुबाई हळूहळू बाहेर जेवायला येवून बसल्या. प्रियांकाने त्यांना जेवायला वाढलं. मुलांसाठी पुरी भाजी केली होती. दोघ खुश होते.

"उद्या डब्यात काय देवू? " तिने विचारल.

दोघ मुल काय हव ते सांगत होते. "आई मला आज सारखी गोल गोल फुगलेली पुरी हवी." निधी म्हणाली.

"आई मला भेंडी कर." अनिकेतने ही आज हक्काने सांगितल.

मुल शाळेत गेले. रघुवीर प्रियांका नाश्ता करत होते. आजकाल ते तिच्या आजुबाजूला असायचे. प्रेमाने वागायचे बोलायचे. तिला काही सुचत नव्हतं. मूल घरी असतात तर बर वाटत. अस मला घाबरायला होत. पण केव्हा ना केव्हा सोबत रहाव लागेल. ते आत आवरायला निघून गेली. आईचा फोन आला होता. ती फोन वर बोलत होती

"प्रियांका आत ये." त्यांनी आवाज दिला.

"आई मी नंतर फोन करते." काय करू. ती आत गेली.

" माझ्या आईचा फोन आला होता. ती भेटायला बोलवते आहे. मी आज आईकडे जावू का?" तिने विचारल.

" हो."

"निधी अनिकेतला घेवून जाईल." ती खुश होती.

"रात्री वापस या. माझा कधी विचार करणार? झाले ना लग्नाला आता दहा दिवस . " ते हळूच म्हणाले.

ती काही म्हटली नाही. त्यांनी तिला मिठीत घेतल. "काय म्हणतो आहे मी समजल ना . आता आईकडे जावून ये . मग बोलू आपण. "

हो.

" तू तयार झाली की सांग मी कार पाठवतो. आईकडे मिठाई फरसाण घेवून जा. "

हो.

ते ऑफिसला गेले.

प्रियांका आवरत होती. रघुवीर चांगले आहेत ती त्यांचा विचार करत होती. आज दिवसभर ती आईकडे जावून आली. रात्री तिकडून जेवून आली. मुल खूप खुश होते. आजी आवडली होती.

दुसर्‍या दिवशी नेहमी प्रमाणे मुल शाळेत गेले. प्रियांका तीच आवरत होती. आज ती आणि रघुवीर बर्‍याच वेळ बोलत बसले होते. ते ऑफिसला गेले. तिला खूप छान वाटत होत.

शाळेतून फोन आला. " प्रिन्सिपलने बोलावलं आहे. अनिकेतने तुमचा नंबर दिला."

" हो मी येते." प्रियांका शाळेत गेली.

अनिकेत तिला येवून भेटला. "आई मी काहीही केल नाही. त्या मुलांनी आधी माझ नाव घेतल."

काय झालं तिने समजून घेतल. "काळजी करू नकोस अनिकेत. मी आली ना." तिने त्याला विश्वास दिला.

ते आत गेले.

अनिकेत आणि वर्गातल्या दोन मुलांच भांडण झाल होत. मारामाऱ्या झाल्या होत्या. एकाचा शर्ट फाटला होता. सगळ्यांना शिक्षा झाली होती. टीचर खूप रागवत होती.

"या मुलांच ही तेवढाच दोष आहे. अनिकेत मारामारी करण्यारा मुलगा नाही. मला खात्री आहे. माझा मुलगा एकदम साधा चांगला आहे. तो या पुढे अस करणार नाही." तिने आश्वासन दिल.

अनिकेत बेटा माफी माग. तिने त्या मुलाला शाळेचा ड्रेस घेवून दिला. ते प्रकरण मिटल. ती त्याला घेवून घरी निघाली.

" आई सॉरी. बाबांना समजल तर. "तो घाबरला होता.

" काही हरकत नाही बेटा. काळजी करायची नाही मी बघते. पण शाळेत फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायच प्रॉमीस कर ."

"प्रॉमीस आई. "

ते घरी आले. अनिकेत रूम मधे होता. संध्याकाळी रघुवीर घरी आले.

"अहो दोन मिनिट आपल्या रूम मधे या ना. मला तुम्हाला काही तरी सांगायच आहे."

ते रूम मधे आले. प्रियांका आली. दरवाजा लोटून घेतला. ती अनिकेत बद्दल सांगत होती. शाळेत बोलवलं ते.

त्यांनी शांत पणे ऐकुन घेतल. "काही हरकत नाही. झाला ना प्रॉब्लेम ठीक."

हो. अहो तुम्ही त्याला ओरडू नका."

"ठीक आहे प्रियांका तू म्हणशील तस. तू खूप छान पद्धतीने घरातल्यांना सगळ्यांना आपलस केल आहेस."