जलद लेखन स्पर्धा - २०२५
विषय:- झपाटलेला
शीर्षक:- सावली कोणाची?
भाग:-३ अंतिम
मागील भागात:-
शांतनूचं जीवन असं तर फारच साधं सरळ दिसत होतं ; परंतु त्याच्या जीवनामध्येही काहीतरी झालं होतं.
आता पुढे:-
शांतनू मुंबईत त्याचे आईवडील अरूण आणि पद्मा सोबत राहत होता. तो आधीपासूनच एकलकोंडा, खूप गंभीर स्वभावाचा होता. त्याला खेळण्यापेक्षा जास्त पुस्तक वाचायला आवडायची. तो जास्त मिसळत असल्याने त्याला मित्र नव्हते. शाळेतला त्याचा एकमेव मित्र विनय शिवाय. जो लहानपणी त्याचा मित्र होता. त्याच्यासोबत त्याचे चांगले जमायचे. पण त्याच्या वडिलांची बदली झाल्यामुळे तोही त्याच्यापासून दुरावला.
शांतनू एकटा पडला. त्याच्या गंभीर स्वभावामुळे तो फारसा कोणाशी मिसळत नव्हता. त्यामुळे सगळी मुले त्याला चिडवायची, त्याची चेष्टा करायची. ही गोष्ट त्याला फार मनाला लागली. त्यामुळे तो आणखी शांत, गंभीर होत गेला. त्याचा परिणाम त्याच्या झोपेवर झाला. रात्रीचे त्याला नीट झोपत लागत नसायची. मधूनच घाबरून दचकून उठून बसायचा. तो मोठा होत गेला पण अरूण, पद्मा यांनी त्याच्या या आजाराकडे दुर्लक्ष केले.
एकदा तो रात्रीचे बडबड करत असताना त्याच्या पद्माने ऐकले. त्याला डॉक्टरांकडे न नेता भूतबाधा झाली असे समजून तिने एका मांत्रिकाकडून ताईत आणून त्याच्या गळ्यात घातला. जो की नंतर ते कपाटाच्या कोपऱ्यात पडून राहिला. त्याला असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने त्याने तो काढून ठेवला.
भूतकाळात:-
कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. तिथेच त्याला मीनल भेटली. मीनलचा स्वभाव त्याच्या अगदी विरुद्ध होता. ती खूप बडबडी, देखणी, हुशार, जिद्दी आणि हट्टी होती. हेच त्यांना एकमेकांना आकर्षित करणारी गोष्ट ठरली. तिची आणि त्याची मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर पुन्हा प्रेमात झाले.
शांतनूच्या आयुष्यात मीनल आल्यावर त्याचे आयुष्य बदलून गेले. आयुष्य एवढे रंगीत सुद्धा याची त्याला कल्पना नव्हती. तिने त्याच्या आयुष्यात सगळे रंग भरले होते. त्याचे आयुष्य चैतन्यमय झाले. ते दोघे खूप खुश असायचे.
काही दिवसांनी शांतनूवर करिअरचा दबाव आणि मीनलचा हळवा स्वभाव त्यांच्या प्रेमात आडवा आला.
हळूहळू त्या दोघांचं बोलणं कमी झालं नंतर नंतर तर बंदच झालं. शांतनू स्वतःहून विनाकारण तिच्यापासून दूर राहू लागला. तिने जरी फोन केला तरी तो तिचा फोन उचलत नसे.
एकदा एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची भेट झाली होती. तेव्हा ती भावनिक होत त्याला म्हणाली," शानू, तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना, रे."
तेव्हाही तो तिला जास्त गंभीरतेने न घेता फक्त हसला. तिला उत्तर देण्याचे मात्र त्याने टाळले.
हळूहळू त्याने तिचे फोन बंद घेणेही बंद केले. काही कारण नसताना त्याने विनाकारणच तिच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. तिने खूप वेळा त्याला भेटण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला ; पण त्याने मात्र तिच्याकडे एकदाही मागे वळून पाहिले नाही.
या गोष्टीने ती खूपच दुखावून मनातून पूर्णपणे तुटून गेली.
काही दिवसांनी बातमी आली की तिने आत्महत्या केली. त्यावेळेस ही शांतनूने स्वतःला दोषी न मानता तीच कमकुवत होती असे समजून त्याने त्याकडे कानाडोळा केला. तिच्या सगळ्या आठवणी एका बॉक्समध्ये घालून त्याने त्यास कायमचा पूर्णविराम दिला.
वर्तमान:-
जेव्हा कधी ती सावली त्याच्या छातीवर बसायची तेव्हा त्याला असं वाटायचं की तीच आहे त्याची मीनल. जी परत त्याला भेटायला आली आहे. त्याला सोबत नेण्यासाठी. त्याचा भूतकाळ परत आला होता. तिला जेवढ्या वेदना झाल्या होत्या त्याच वेदनात आता त्याला होत होत्या. तेच दुःख त्याच्या वाटेला आले होते. त्याच्या चुकीचा हिशोब ती त्याला मागत जाब विचारत होती.
त्याला तो अनुभव आणखीनच भयानक, भीतीदायक वाटत होता. आधी काही अंतराने घडणाऱ्या गोष्टी आता त्याच्यासोबत रोजच होऊ लागल्या. झोपल्यावर त्याचा जीव गुदमरू लागला. त्याला असं वाटू लागले की त्याचा आत्मा कुणीतरी ओढून नेऊन शरीर आतमधून कोणीतरी पोखरून काढतोय. तो आता सामान्य जीवन जगू शकत नव्हता.
आता तो ऑफिसचं काम तर सोडाच ; पण जेवण करणे पण सोडून दिलं. ना कुणाशी बोलायचा, ना भेटायचा.
त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागली. त्याच्या स्वभाव खूपच चिडचिडा झाला. त्याच्या काळजीने अरूण व पद्मा यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. त्यांना त्याची खूप चिंता वाटू लागली. त्यांनी त्याला खूप वेगवेगळ्या डॉक्टरकडे नेले.
न्यूरोलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्टकडे ही नेले. प्रत्येक वेळेस रिपोर्ट एकदम नॉर्मल आले.
न्यूरोलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्टकडे ही नेले. प्रत्येक वेळेस रिपोर्ट एकदम नॉर्मल आले.
मांत्रिक, बाबा, मंदिर, मस्जिद, वैद्य, हकीम झाले. पूजा, होम हवन, ताईत, गंडेदोरे सगळे उपाय केले ; सगळे काही फोल ठरून पदरी निराशाच आली. त्याच्यात कोणती सुधारणा झाली ना कुठलाही फरक पडला.
त्याला आता प्रत्येक सावलीमध्ये भीती वाटू लागली. प्रत्येक ठिकाणी आता त्याला ती सावली दिसू लागली. कधी बाथरूमच्या आरशात तर कधी बाल्कनीच्या कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी त्याला ती विचित्र सावली दिसू लागली. तो स्वतःला सावरण्याचा, त्यातून उठण्याचा प्रयत्न करत होता. स्वतःला झोपू न देण्याचे ट्रेनिंग देत होता ; पण त्यामध्ये त्याला यश येत नव्हते.
त्याची अशी अवस्था पाहून त्याच्या आईवडिलांना आणखी चिंता वाटू लागली. त्यांनी सर्वोपरी प्रयत्न केले. त्याने काहीच फरक पडलि नाही तेव्हा शेवटी प्रयत्ना पुढे त्यांनीही गुडघे टेकले.
शांतनूची बिकट अवस्था पाहून ते आता देवाला एकच प्रार्थना करू लागले की लवकरात लवकर त्याला या सगळ्या त्रासातून मुक्ती मिळावी.
त्याची झोप म्हणजे त्याच्यासाठी त्रासदायक ठरू लागली. त्यांना वेगळीच भीती वाटू लागली.
आता त्याला वाटायला लागलं की आतापर्यंत जी सावली दिसत होती ती सावली म्हणजेच मीनल आहे. जेव्हा कधी पण त्याला तिची सावली दिसायची तेव्हा तेव्हा मात्र त्याला ते कॉलेजचे सगळे दिवस आठवायचे. ते सुंदर क्षण त्याच्या डोळ्यांसमोर तरळून जायचे.
त्या प्रेम भावना आता त्याच्या मनी जागृत झाल्या होत्या. त्याला फार उशीर झाला होता. ही भावना त्याने आतापर्यंत दाबून ठेवली होती. ती कोणासमोर त्याने मोकळी केली नव्हती.
आता त्याला मीनलचे प्रेम खरं वाटत होतं. तिला झालेला त्रास आता तो अनुभव होता. त्याला या गोष्टीचा वाईट वाटू लागलं. स्वतःलाच दोष देऊ लागला. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. तो स्वतःच्याच दुनियेत गर्क राहून लागला.
दिवसभर स्वतःला एकाच खोलीमध्ये कोंडून घेऊन एकटाच भिंतीशी बोलू लागला.
दिवसभर स्वतःला एकाच खोलीमध्ये कोंडून घेऊन एकटाच भिंतीशी बोलू लागला.
कुठलीही सावली दिसली की तो एकदम घाबरून दाबून बसायचा. तो सावलीने झपाटलेला होता.
कित्येक वेळा तो रात्रीचा हात जोडून अगतिक होतं बडबडायचा," मी ..मी म्हटलं ना, माझ्याकडून चूक झाली. मी माफी मागितली ना. का माझा पिच्छा सोडत नाहीस?"
आई वडील त्याला सावरण्याचा प्रयत्न करायचे ; पण तो त्यांना जुमानत नव्हता.
त्याला नेमकं काय झाले? हे त्यांनाही कळलं नाही. शांतून आता पहिल्यासारखा राहिलाच नाही. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरून गेला. शरीर कृश बनले. डोळे एकदम खोल खोल शून्यात हरवून कोणाची तरी वाट पाहत असल्यासारखे, कोणीतरी येऊन त्याला घेऊन जाणार असे सांगत होते.
शांततूने आता खाणे पिणे वर्ज्य केले. अंथरूणावर खिळून पडलेले शरीर पुन्हा उठलेच नाही. विचार करून करून त्याचा मेंदू आणि शरीर थकून गेले.
त्याचवेळी त्याचे कॉलेजचे व ऑफिसचे मित्र त्याला भेटायला आले. त्याची व त्याच्या आई-वडिलांची बिकट अवस्था पाहून ते ही खूप हळहळ करू लागले.
काळजी घ्या असे सांगून ते भेटून गेल्यानंतर तीन दिवसांनी शांतनूने रूममधल्या सगळ्या लाईटी बंद करून स्वतःला खोलीत बंद करून घेतले. अरूण आणि पद्मा यांनी खूप वेळ दार ठोटावले; परंतु त्याने दार उघडले नाही. ते हताश होत झोपायला गेले.
मध्यरात्री अचानकच काही जळत असल्यासारखा घाणेरडा वास आल्याने अरुण उठले. तो वास शांतनूच्या रूममधून येत होता. त्यांनी त्याला आवाज देत दार उघडण्याचा प्रयत्न केला. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तेव्हा त्यांनी खिडकी जोर लावून उघडून डोकावून पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
शांतनू वाकडातिकडा बेडवर पडलेला त्यांना दिसला. असं वाटत होती की कोणीतरी त्याची मान मोडली. त्याचे पूर्ण शरीर जळल्यासारखे काळे पडले होते आणि डोळे सताड उघडे होते. ते पाहून ते धाय कोलमडून रडू लागले. त्या आवाजाने पद्माही तिथे आली. त्याला तसे पाहून ती तर जागेवर कोसळली.
त्याच्या मृतदेहाजवळचं त्याची डायरी उघडी पडली होती. त्यावर लिहिलं होतं- "मला माहिती होतं मी आजारी नव्हतो. तिची सोबत करायला चाललो."
समाप्त -
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा