Login

सावली कोणाची? (भाग:-२)

सावली मागे लागलेल्या शांतनूची कथा
जलद लेखन स्पर्धा- २०२५

विषय:- झपाटलेला

शीर्षक:- सावली

भाग:-२

मागील भागात:-

शांतनूला विचित्र स्वप्न पडत असतात. त्यामुळे तो झोपायला घाबरत असतो. त्याचे कारण तो गुगलवर शोधण्याचा विचार करतो.

आता पुढे:-

दुसऱ्या दिवशी उठल्यावर शांतनू गुगलवरून त्याबद्दल माहिती मिळवतो. तेव्हा त्याला कळते की ती सगळी लक्षणे स्लीप पॅरालायसिस म्हणजे झोपेचा अर्धांग वायू आहेत. त्याबद्दल त्याने आणखी बरीच माहिती मिळवली. हे तर सर्वसामान्य आहे, घाबरण्यासारखे काही नव्हते म्हणून त्यांना हायसे वाटले. तरीही एकदा खात्री करून घेण्यासाठी तो त्याच्या मित्राने सुचवलेल्या डॉक्टरकडे गेला, जो एक चांगला सायक्रेटिस होता.‌

तिथे गेल्यावर त्याला आणखीन बरीच माहिती कळली. डॉक्टरने त्यांना सांगितले की स्लिप पॅरालिसीस हा असा आजार आहे ज्यामध्ये तुम्ही झोपेतून जागे तर झालेला असता पण तरीही तुमच्यामध्ये उठण्याची, बोलण्याची क्षमता राहत नाही. झोपणे आणि जागे होणे त्यातील देवाण-घेवाणाची एक अवस्था असते. ज्यात शरीरा आर एम रेपीटआय मोमेंट स्थितीमध्ये असल्याने माणूस झोपेच्या अधीन जातो. त्याच्या मांसपेशी ह्या सामान्यपणे रिलॅक्स असतात. मेंदू मात्र जागाच असतो. स्लीप पॅरालायसिसमध्ये सामान्यता रोग्याला मतीभ्रम म्हणजेच हिलुसिरेशन असते. जसे की एखाद्या रूममध्ये कोणीतरी असल्याचा भास होणे, छातीवरती दबाव जाणवणे, कुणीतरी गळा दाबत असल्यासारखे वाटणे अशा गोष्टी घडत असतात.

तणाव किंवा अनियमित झोप किंवा झोपेच्या आणखीन दुसऱ्या डीसऑर्डरमुळे पण हे होऊ  यामुळे होऊ शकते. त्याने डॉक्टरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व तो घरी आला. डॉक्टरांच्या सांगण्याने कदाचित त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने रात्रीच्या सगळ्या घटना पद्माला सांगायचे ठरवले.

त्याने रात्रीच्या सर्व घटना पद्माच्या कानावर घातल्या. त्या घटना ऐकल्यावर पद्माला त्याच्या लहानपणीची घटना आठवली. तेव्हा तो दहा वर्षाचा होता. तेव्हाही रात्री त्याला स्वप्नात एक सावली दिसायची जी खूप भयंकर होती असे त्यांनी सांगितले होते. ती सावली कधी त्याच्या एकदम जवळ दिसायची तर कधी एकदम त्याच्या पाठीमागच्या बाजूला बसलेली, तर कधी कपाटाच्या कोपऱ्यातून त्याला एकटक रोखून पाहत असलेली दिसायची. तो खूप घाबरून जायचा. तेव्हा तिने त्याला एका मांत्रिकाकडे नेऊन त्याच्यावर उपचार केले होते. तेव्हा सगळे ठीक झाले होते.

ही गोष्ट पद्माने त्याच्यापासून लपवली होती कारण तो घाबरून जाऊ नये. जर कळले तर त्याचे कुठल्या कामात लक्ष लागणार नाही असे तिला वाटले.

झोप म्हणजे त्याच्यासाठी परीक्षा होतं गेली. त्याला झोपल्यावर असे वाटायचे की त्याचा आत्मा कोणीतरी ओढून त्याला दुसऱ्या दुनियेत येत आहे आणि तो हवेत तरंगत आहे.

ज्यावेळेस पण त्याला स्लिप पॅरालिसीस व्हायचं,  त्यावेळेस त्याला पंखा फिरल्याचा, दरवाजा अर्धवट उघडा राहिलेला, त्यातून प्रकाश येत असलेला हे सगळं त्याला कळायचं ; पण त्याचं पूर्ण शरीर फ्रीज झालेलं असायचं. त्याला ना उठता येत होतं ना बोलता यायचं.‌ ओरडण्याचा खूप प्रयत्न करायचा पण घशातून त्याचा आवाजच निघत नव्हता. त्याला असं वाटत होतं की कोणीतरी त्याचा गळा जोरात आवळतोय.

एकदा तर त्याला असं वाटत की त्याचे आईवडील समोर आहेत. त्यांना वाटलं की तो झोपला आहे ; पण त्याची तडफड मात्र त्यांना दिसतच नव्हती. सगळं काही पाहू शकत होता तो ; पण करू मात्र काहीच शकत नव्हता. जसे की तो उघड्या डोळ्यांनी कुठलेतरी वाईट स्वप्न पाहत होता‌ आणि स्वतःला वाचवण्यासाठी फक्त तो पाहत राहण्याचे काम करत होता. प्रत्येक वेळी त्याला वाटायचं आता तर  तो नाही उठलो तर कधीच उठू शकणार नाही म्हणून तो पूर्ण ताकदीनिशी उठण्याचा प्रयत्न करायचा ; परंतु असफल व्हायचा.

शांतनुला स्लीप पॅरालायसिस रोज होत नव्हता.‌ कधीतरीच काही दिवसांच्या अंतराने त्याला हा त्रास होत होता. कधी तीन, कधी पंधरा दिवसांनी, तर तीन चार आठवड्याने ;  पण जेव्हा कधी तो व्हायचा, त्यावेळेस मात्र त्याल अगोदर पेक्षाही अधिक भयानक व‌ त्रासदायक अनुभव यायचा.

तो डायरीत लिहून ठेवू लागला," ती सावली आता दूर नाही तर माझ्याजवळ असल्यासारखी मला वाटते, पण ती कोण आहे ? तिला काय पाहिजे?  याची मात्र मला कल्पना नाही. ती एकदम माझ्या श्वासाजवळ आली आणि आता ती सावली एका बाईच्या रूपात येत होती जिला डोळे नव्हते. तो चेहरा मात्र ओळखीचा वाटत होता. जणू माझ्यासोबत पूर्वजन्मीेचे काहीतरी नातं असल्यासारखे."

शंतनूला ती सावली आता फक्त त्याच्या रूममध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी दिसू लागली. त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या आजूबाजूला, सगळीकडे.

समजा कधी तो जर एखाद्या नातेवाईकाकडे मुक्कामाला गेला तरी देखील ती सावली त्याचा पिच्छा सोडत नव्हती. त्याला वाटायचं ती तेथेही त्याच्या मागे मागे आली.

एकदा त्याच्या कंपनीच्या ट्रीपकडून तो एका हिल स्टेशनला गेला. तेव्हा तिथल्या रूममध्ये झोपल्यावर त्याला असे वाटले की तो एका जुन्या रूममध्ये अडकला असून‌ इथून त्याला बाहेरच पडता येत नाही. प्रत्येक खिडकी जवळ गेले की त्याला सगळीकडे अंधकार आणि अंधकार दिसत होता. ती जागा बदलली तर ती नाही दिसणार हा सगळा त्याचा भ्रम होता. ती सावली तर त्याला प्रत्येक ठिकाणी दिसत होती जसे की ती त्याच्या शरीराच्या आत रूतून बसलीय.

एक दिवस त्याने स्वप्नात पाहिले की तो एका सामसूम रेल्वे ट्रॅकच्या कड्यावर पडलेलाय आणि समोरून एक‌ बाई चालत त्याच्याजवळ येतेय. तिचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला, चेहऱ्यावर ठीकठिकाणी ओरखडे असून त्यातून रक्त वाहत होतं. ती हळूहळू पावले टाकत त्याच्या दिशेने येत होती.

त्याच्या कानाजवळ येत ती बाई विक्राळ स्वरात कुजबली," तू मला सोडून पुन्हा कुठे पळणार?"

ह्या स्वप्नातून तो एकदम खडबडून जागा झाला. त्याचे पूर्ण अंग जखडल्यासारखे झाले. त्याचे अंग घामाने डबडबले. तो खूप घाबरून जोर जोराने श्वास घेऊ‌ लागला. ती त्याची प्रेयसी मीनल तर नसेल ना, तो विचारात पडला.

आता रात्र झाली की तो झोपायला घाबरू लागला.  त्याला भीती वाटत होती की काय माहिती आज पुन्हा काहीतरी भयानक स्वप्न पडायचे आणि त्यात पण तो अडकून जाईल.

शांतनूच जीवन असं तर फारच साधं सरळ दिसत होतं ; परंतु त्याच्या जीवनामध्येही काहीतरी झालं होतं.

क्रमशः

काय झालं होतं का शांतनूच्या जीवनात? मीनल त्याची प्रेयसी होती तर आता कुठे आहे ती? त्याला खरंच स्लिप पॅरालिसीस आहे का की आणखी दुसरे काही?

जाणून घेण्यासाठी वाचत रहा, पुढच्या भागात -

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all