वृक्षासम गुलमोहर
ऋणानुबंधाचा फुलला
मायेची छाया देऊन
हर्षाचा बहर खुलला
ऋणानुबंधाचा फुलला
मायेची छाया देऊन
हर्षाचा बहर खुलला
ग्रीष्माच्या तडाख्यात
उभा तटस्थ आहे
आपुलकीच्या वर्षावाने
हास्याचे पाणी वाहे
उभा तटस्थ आहे
आपुलकीच्या वर्षावाने
हास्याचे पाणी वाहे
संकटाची अतिवृष्टी
संयमाने तडीस नेतो
स्वतः विरहाचा काळ
प्रेमासाठी शोषून घेतो
संयमाने तडीस नेतो
स्वतः विरहाचा काळ
प्रेमासाठी शोषून घेतो
थंडीची चाहूल लागता
माणुसकीची उब देई
आश्वस्त स्पर्शाने कैकदा
आशेच्या गावी नेई
माणुसकीची उब देई
आश्वस्त स्पर्शाने कैकदा
आशेच्या गावी नेई
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे राखीव आहेत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा