शोधतो प्रेमिका
मी भावनेच्या भरात
प्रेम व्यक्त केले
तू शब्दात न मांडता
डोळ्यातून व्यक्त केले
माझी प्रेमकविता
तू पूर्ण ऐकलीस
हसून मोगऱ्या परी
लाजून चूर झालीस
तू पूर्ण ऐकलीस
हसून मोगऱ्या परी
लाजून चूर झालीस
ओळख आपुली
चार दिसांची
तरी भासे जणू
जन्म जन्मांतरीची
चार दिसांची
तरी भासे जणू
जन्म जन्मांतरीची
मी तुझाच दास झालो
काय करू मी तुझ्याच साठी
तू म्हणे नको चंद्र सूर्य तारे
राखून ठेव थोडे पुढच्या भेटीसाठी
काय करू मी तुझ्याच साठी
तू म्हणे नको चंद्र सूर्य तारे
राखून ठेव थोडे पुढच्या भेटीसाठी
पुन्हा कधी ती भेटलीच नाही
वाटते तिला मी पटलोच नाही
आता दुसरी मिळेल का?
रस्तो ररस्ती गल्लोगल्ली
मन माझे प्रेमिका शोधीत राही
......... योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा