Login

सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 4)

Story Of Sambhav And Sharvari
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 4)


संभवने प्रोफाइल ओपन केल्यावर सुरुवातीला तर त्याची नजर त्या छोट्या सर्कल मध्ये असलेल्या तिच्या फोटोवरचं गेली.. आणि आपसूक त्याच्याकडून त्या फोटोवर क्लिक केलं गेलं..
आणि स्क्रीनवर शर्वरीचा साडी मधला फोटो झळकला.


भलेही तिने साडी नेसली होती परंतु नक्कीच ती साडी एखाद्या ऑफिसचा युनिफॉर्म असणारं एवढं तर ओळखलं त्याने... आणि त्याचा गेस बरोबर होता..
कारण ती ज्या ज्वेलरी शॉप मध्ये जॉबला होती तिथे जसा लुक असायचा त्याचं लुक मधला फोटो अपलोड केला होता तिने...


केसांचा व्यवस्थित अंबाडा बांधला होता.. कपाळावर नाजूक टिकली होती.. तिच्या गोऱ्या रंगाला साजेचा मेकअप केलेला होता तिने.. एका हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात साध ब्रेसलेट दिसत होतं.. चेहऱ्यामध्ये मात्र विलक्षण गोडवा जाणवला त्याला..


फोटो बघून झाल्यानंतर त्याने खालील माहिती वाचायला सुरुवात केली..

शर्वरी प्रमोद दीक्षित..
वय: 31 वर्ष
अपत्य: सहा वर्षाची मुलगी
बाकी तिची फॅमिली इन्फॉर्मेशन आणि जॉब इन्फॉर्मेशन यावर त्याने एकदा नजर फिरवली आणि शेवटी पुन्हा एकदा एक नजर त्या शब्दाकडे गेलीचं... ज्या शब्दाची त्याला प्रचंड चीड होती..
'घटस्फोटीत'

आज फक्त या एका शब्दामुळे त्याच्या स्वतःच्या आयुष्यातही प्रचंड उलथापालथ झालेली होती..
आई असूनही त्याच्या मुलाला आई शिवाय राहायला लागत होतं.. सगळं वैभव आणि ऐश्वर्य देऊ शकत होता तो त्याच्या मुलाला पण जन्मदात्या आईची माया मात्र मिळवून देऊ शकत नव्हता..
आणि कदाचित शर्वरीच्या मुलीचीही तीच अवस्था असेल असं वाटलं त्याला.

शेवटी स्क्रीन ऑफ करून त्याने कविताताईंकडे बघितलं तेव्हा त्या खूप अपेक्षेने त्याच्याकडेच बघत होत्या..


"हां.. पाहिलं मी प्रोफाइल..
कुठे भेटू शकतो मी मिस. शर्वरींना..??"

बाकी काही न बोलता त्याने डायरेक्ट असाच प्रश्न विचारला कविता ताईंना.


"इथेच.. आपल्या मिटिंग रूम मध्ये भेटू शकता तुम्ही दोघे..
तुम्हाला माझी असिस्टंट मीटिंग रूम दाखवेल तोपर्यंत मी शर्वरीला पाठवतेचं तिथे..."

कविताताई टेबलवरचा रिसिव्हर हातात घेत म्हणाल्या.. आणि लगेच त्यांनी बाहेरून त्यांच्या असिस्टंटला बोलवून घेतलं.


"ओके.."


**************


संभव मीटिंग रूम मध्ये काही मेसेजला रिप्लाय करत होता तोपर्यंत कविताताई आणि शर्वरी दोघीही तिथे आल्या.. आणि मोबाईल बाजूला ठेवून तो उठून उभा राहिला.


"बसा तुम्ही मिस्टर कर्णिक..!!"


"शर्वरी, तू ही बस...!!"


त्या मीटिंग रूम मध्ये असलेल्या अंडाकृती टेबलच्या मुख्य चेअर वर जाऊन कविताताई बसल्या आणि त्या दोघांकडे बघत म्हणाल्या.

दोघेही समोरासमोर पण टेबलच्या अपोजिट बाजूला बसले होते...
शर्वरीला तर कधी एकदा या प्रसंगातून सुटका होईल असं झालं होतं... मीटिंग रूम मध्ये येण्याआधी कविता ताईंनी तिला संभव बद्दल माहिती सांगितली होती.


संभव कर्णिक हे खरंच शहरातील एक मोठं प्रस्थ होतं.. तो अगदी 23 वर्षांचा असतानाचं त्याचे वडील गेले होते आणि त्यानंतर त्यांचा पूर्वापार चालत आलेला बिझनेस त्याने स्वतःचं नावारूपाला आणला होता.. त्यात त्याला त्याच्या आईची म्हणजे संजीवनी कर्णिकांची मदत झाली होती... त्याच्यापेक्षा मोठ्या दोन बहिणी होत्या पण त्यांचं लग्न झालं होतं.

तसं तर संभवचं लव्ह मॅरेज झालेलं होतं.. पण तरीही शेवटी डिव्होर्स झाला होता. बराच पैसा खर्च करून आणि त्याच्या पहिल्या पत्नीच्या परवानगीनुसार कशीबशी त्याने आरवची कस्टडी मिळवली होती..

मुळात त्याच्या पहिल्या पत्नीला त्या मुलामध्ये म्हणजे आरवमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता त्यामुळे तिने स्वतःच कस्टडी घ्यायला नकार दिला होता... पण पोटगी म्हणून बरेच पैसे उकळले होते तिने संभव कडून.. आता मात्र तो छत्तीस वर्षांचा... एक यशस्वी उद्योजक होता.


सगळी कहाणी ऐकून काही क्षणांसाठी शर्वरीला ही वाईट वाटलं होतं.. पण ह्या मीटिंग रूममध्ये आल्यापासून तिने एकदाही नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं नव्हतं.


कविताताईंनी दोघांना एकमेकांची फॉर्मल ओळख करून दिली आणि तुम्ही बोला असं म्हणत त्या बाहेर निघून गेल्या.. आणि आता मात्र त्यात दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरली.


***************


लेखिका: अस्मिता कुलकर्णी

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"