डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 10)
शर्वरी घरी आली तेच अगदी उदास होऊन..
काय निर्णय घ्यावा समजतच नव्हतं.. त्यात शॉप मध्ये वर्किंग अवर खूप जास्त होते.. परक्या शहरात जुईला घेऊन राहणं.. फार अवघड होत..
पोळी भाजत विचार करत असतानाच एकदम तव्याचा चटका बसला आणि ती भानावर आली..
"आई गं...!!" हात झटकत ती ओरडली अणि बाहेरच्या खोलीत भाजी निवडत बसलेल्या मनीषा पटकन आतमधे आल्या.
"काय झालं..??"
"काही नाही.. चटका बसला.." ती हातावर फुंकर घालत म्हणाली.
"सरक..!! करते मी.. तू बस इथे..."
"ह्म्म.." शर्वरी तिथेच असलेल्या खुर्ची मध्ये बसली.. पुन्हा हातावर फुंकर घालत विचार चक्र चालू होतच तिचं.
"काय झालयं तुला नक्की..? आल्यापासून बघतेय.. काहीतरी बिनसलं आहे तुझ.." मनीषा पोळ्या करता करता तिच्याकडे बघत म्हणाल्या.
"आई..!!"
तिला एकदम हुंदकाच दाटून आला आणि ती रडत असलेलं बघून मनीषा हात धुऊन पटकन तिच्याजवळ आल्या.
"काय गं.. रडतेस का बाळा..??"
"आई माझी ट्रान्सफर झाली गं.. पुण्याला..!!
पुढच्या सोमवारी हजर व्हायचं आहे.. "
"अरे देवा.. आता गं..??"
"आता काय..?? जॉब तर सोडावा लागणार.."
शर्वरी उदास आवाजात डोळे पुसत म्हणाली आणि नेमकं ते शेवटचं वाक्य नुकत्याच घरात आलेल्या शौनक आणि माधुरीने ऐकलं.. माधुरीने चिडून शौनक कडे बघितलं..
म्हणजे आता हिने जॉब सोडला तर पुन्हा तिचा आणि जुईचा थोडाफार खर्च वाढणार होताच... त्यामुळे घर खर्चाचा लोड येणार हे माधुरीचं लॉजिक...
तिच्या रागीट नजरेमध्ये शौनकला समजून गेलं तिला काय म्हणायचं आहे ते पण तरीही त्याने तिला शांत रहा अशी खूण केली.. नक्की काय झालं हे माहिती नव्हतं त्यालाही...
ते दोघेही काही न बोलता तसेच शांत उभे राहिले बाहेरच्या हॉलमध्ये..
"अशी कशी गं ट्रान्सफर केल त्यांनी तुझी..?"
"आई दोन वर्षातून करतातच आमच्या इथे..
मागच्या वेळी मी मॅनेजर सरांना खूप रिक्वेस्ट केली होती.. तेव्हा तर जुई आणखी लहान होती.. तेव्हा त्यांनी हेड ब्रांच मध्ये बोलून माझी ट्रान्सफर थांबवली होती पण आता यावेळी नाही थांबवता आलं त्यांना..."
"हम्म... सगळा प्रश्न निर्माण झालाय बाई..!!
आता पुणे म्हणजे काय जवळ आहे होय इथून..? जाऊ दे.. दुसरा जॉब बघ सरळ..!!"
त्या दोघींच संभाषण ऐकून काय झालं आहे हे शौनक आणि माधुरीला लक्षात आलं.. माधुरीला या फॅमिली ड्रामा मध्ये काही इंटरेस्ट नव्हता.. त्यामुळे ती सरळ फ्रेश व्हायला वरती निघून गेली आणि शौनक स्वयंपाक घरात आला.
"रडू नको.. शर्वरी..!! तुला दुसरा जॉब मिळून जाईल.."
" दादा तुला कसं समजलं..??"
"आम्ही जस्ट आलो तेव्हा कानावर पडल आमच्या..."
"जॉब मिळेल रे... पण दुसऱ्या दुकानांमध्ये इतकं चांगलं पेमेंट मिळणं अवघड आहे.. आत्ता मी जिथे जॉब करते तो एक मोठा ब्रँड असल्यामुळे सगळं व्यवस्थित होतं..." शर्वरी
"बघूयात करू काहीतरी..." शौनक
तोवर तिचे बाबा ही दोन्ही नातवंडांना बाहेर फिरवून घरी घेऊन आले होते.. त्यांनाही समजलं काय झालं आहे ते...
सगळेच तिला सर्वतोपरी समजावून आपापल्या कामांना निघून गेले... ती मात्र आता पुढे काय करायचं याचा विचार करत बराच वेळ तशीच बसून राहिली.
****************
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा