Login

सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 12)

Story Of Sambhav And Sharvari
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 12)



सकाळी नेहमीप्रमाणे सगळं आवरल्यानंतर शर्वरीने पुन्हा एकदा तो मेसेज व्यवस्थित वाचला.. त्यात कुठेही जाहिरात कोणी दिली आहे त्याचा उल्लेख नव्हता.. त्यामुळे नाव लक्षात आलं नाही तिच्या..
पण दिव्याने खात्रीने सांगितलं होतं त्यामुळे कुठलाही फ्रॉड नसेल एवढा मात्र विश्वास होता तिला..


आज तर रविवार होता.. बाकीच्यांना भलेही सुट्टी असेल पण तिच्या शॉप मध्ये मात्र रविवारी भयंकर लोड असायचा..


थोड्या वेळात आपण त्या नंबरला फोन करायचा असं तिने मघाशी ठरवलं होतं..
जर ते भेटायला या म्हणाले तर आजच्या दिवस शॉप वर जायचं नाही असं ठरवून रिकामी झाली ती... कारण तसंही नोकरी सोडायचा निर्णय पक्का होता तिचा..


'एक दिवस न सांगता गैरहजर राहिले तर जास्तीत जास्त काय करतील..??ओरडतील ना..?? ओरडू देत..!! इतकं मनापासून काम करून ही शेवटी नोकरी सोडायचीच तर वेळ आली...'

मनातल्या मनात बडबड करत तिने पुन्हा एकदा घड्याळाकडे नजर टाकली.. तर सकाळचे नऊ वाजले होते..


आता ही फोन करण्याची तिला योग्य वेळ वाटली.. म्हणून देवाचं नाव घेऊन धडधड त्या काळजाने दिलेला नंबर वर फोन लावला तिने..


"हॅलो..."


"बोला... काय काम होतं..??" तिकडून कुणीतरी जेन्ट्स बोलत होते.


"नमस्कार, मी शर्वरी दीक्षित बोलते आहे...
तुमचा केअरटेकरच्या जॉब संदर्भातला मेसेज वाचला होता..
मी इंटरेस्टेड आहे त्या जॉब साठी म्हणून फोन केला आहे..."


"ओह.. अच्छा..!! ठीक आहे मॅडम.. पण तुम्ही अटी नीट वाचल्या आहेत ना..??"


"हो मी वाचल्या आहेत...
मला एक सहा वर्षांची मुलगी आहे..."


"ओके.. मग तुम्ही आज भेटायला येऊ शकता..??"


"ह.. हो.. नक्की..!!"


"मी या नंबर वर तुम्हाला डिटेल्ड ऍड्रेस पाठवतो..
तिथे साधारण अकरा वाजेपर्यंत पोहोचा तुम्ही..."


"ओके सर..!! येईन मी.. थँक्यू सो मच..!!"


निदान सुरुवात तरी चांगली झाली या खुशीत तिने फोन कट केला आणि तयार व्हायला पळाली..


फॉर्मल वाटेल आणि आपण व्यवस्थित दिसू अशी एक साधारण फिकट गुलाबी रंगाची साडी निवडली तिने.. आज केसांचा अंबाडा न बांधता... छानशी वेणी घातली... नेहमीप्रमाणे हलका मेकअप करून शर्वरी तयार झाली..


रविवार असल्यामुळे दादा वहिनी तर अजून उठून खाली आले नव्हते.. बाबा आणि जुई दोघे मंदिरात गेले होते.. त्यामुळे देवाचा आणि आईचा आशीर्वाद घेऊन बाहेर आल्यावर तिने पायात सॅंडल अडकवली आणि पुन्हा एकदा पर्स मधून मोबाईल बाहेर काढला..


"देवा..!! पत्ता बघायचाच राहून गेला या सगळ्या गोंधळात...!!"

असं म्हणत तिने मघासच्या नंबर वरून आलेला मेसेज चेक केला.. लोकेशन तर थोडं आऊटसाईडला होतं..
पण बंगल्याचं नाव वाचून तिने कपाळाला हात लावला..


"कर्णिक व्हिला..??"


'अरे ह्या अलीकडच्या दिवसांमध्ये हे.. कर्णिक आडनाव झपाटल्यासारखं माझ्या मागे का लागल आहे..??
आधी लग्नासाठी म्हणून आणि आता जॉब साठी...!!
पण हे तेचं कर्णिक नसतील ना..??
नाही..!! सगळी कर्णिक आडनावाची माणसं सारखी थोडीचं असतात... होप सो..की हे वेगळे असतील...

रिक्षाने जायचं म्हणजे थोडे पैसे खर्च होतील पण बसने गेले आणि साडी वगैरे चुरगळली...वेळेत पोहोचले नाही. चुकून.. तर काय करू..?? जाऊ देत एक दिवस पैसे... जातेचं रिक्षाने..!! येताना बसने येईन....'


मनोमन असा विचार करून शर्वरी निघाली कर्णिक व्हिला कडे...!!


****************



लेखिका: अस्मिता कुलकर्णी

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"