डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 14)
संजीवनी ताईंनी देखील काही मुली शॉर्टलिस्ट केल्या होत्याच की, आणि त्यातलीच एक जी खूप त्यांच्या मनात भरली होती.. ती शर्वरी होती..!!
आता प्रत्यक्षात तिला बघितलं नसल्यामुळे चटकन लक्षात आलं नव्हतं त्यांच्या.. पण नाव सांगितल्यावर मात्र ओळखलं त्यांनी..
सरलाने मोबाईल आणून दिल्यावर त्यांनी आधी शॉर्टलिस्ट केलेल्या मुलींमध्ये चेक केलं तर शर्वरी तीच आहे हे लक्षात आलं त्यांच्या.. आणि मग पुन्हा त्यांनी तिच्याकडे बघितलं तेव्हा ती मान खाली घालून बसली होती.. आता मात्र तिच्याकडे बघण्याची नजरच बदलली त्यांची..
'अरे वा, खरंच विलक्षण योगायोग आहे या दोघांच्या बाबतीत.. आपोआप विवाह मंडळामध्ये त्यांची भेट ही घडली.. आणि आता आरवच्या केअर टेकर जॉब साठी ही इथे यावी.. वा..!!
तिच्या कदाचित लक्षात आलं नसेल ती कुठे आली आहे.. कारण ऍडव्हर्टाइज मध्ये कुठेही नावाचा उल्लेख करायचा नाही अशा सूचना दिल्या होत्या संभवने विनयला.. नंबरही विनायचाचं होता..
संभवने ही काही फार चौकशी केली नसेल कोण येणार आहे वगैरे... नाहीतर कदाचित हिला इथे येऊचं दिलं नसतं त्याने....परस्पर काहीतरी कारण देऊन कटवलं असतं विनयमार्फत..
पण आता संभव आणि शर्वरी दोघेही अनभिज्ञ आहेत बरं..!!
पण आता संभव आणि शर्वरी दोघेही अनभिज्ञ आहेत बरं..!!
दोघ एकमेकांसमोर आल्यावर काय प्रतिक्रिया देतात हे बघायची आता मलाच उत्सुकता लागली आहे..
आणि जॉब तर मी शर्वरीलाच देणार आहे...
जॉब काय.. मी तर तिला या घराची सून होण्याचा मान द्यायलाही तयार आहे.. पण हा संभव आडमुठेपणा सोडायला तयार नाही ना...'
संजीवनी चेहरा किंचित खाली घेऊन चष्म्यातून शर्वरी कडे बघत आणि गालात हसत विचार करत होत्या..
आणि जॉब तर मी शर्वरीलाच देणार आहे...
जॉब काय.. मी तर तिला या घराची सून होण्याचा मान द्यायलाही तयार आहे.. पण हा संभव आडमुठेपणा सोडायला तयार नाही ना...'
संजीवनी चेहरा किंचित खाली घेऊन चष्म्यातून शर्वरी कडे बघत आणि गालात हसत विचार करत होत्या..
अधे मध्ये मान वर करून त्यांच्याकडे बघणाऱ्या शर्वरीला मात्र खूपच ऑकवर्ड वाटायला लागलं..
'या मॅडम अशा काय बघताहेत माझ्याकडे..? आणि माझ्याकडे बघून हसत देखील आहेत.. मी विचित्र दिसते आहे का..?
जॉब संदर्भातही काही प्रश्न विचारत नाहीयेत..
नक्की ह्या जॉब देणार आहेत की, आणखी कोणी भेटणार आहे मला..?'
जॉब संदर्भातही काही प्रश्न विचारत नाहीयेत..
नक्की ह्या जॉब देणार आहेत की, आणखी कोणी भेटणार आहे मला..?'
शर्वरी पुन्हा मान खाली घालून विचार करत होती..
तोपर्यंत शर्टच्या स्लीव्हज फोल्ड करत संभव झपाझप पावलं टाकत जिन्याच्या पायऱ्या उतरत खाली येत होता..
आणि त्याची नजर समोरच मान खाली घालून बसलेल्या शर्वरी कडे गेली.. आता मात्र त्याच्या पावलांचा वेग किंचित मंदावला..
'अरे, एवढ्या यंग मुलीला बोलवलं आहे विनयने..??
हिला जमेल आरवला सांभाळायला..??'
विचार करत करतच तो तिच्या समोरच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसला.. आणि चाहूल लागल्यावर तिने नजर वर केली.. तो ही तिच्याकडेच बघत होता..
दोघांची नजरा नजर झाली आणि दोघांनाही धक्का बसला.. शर्वरी पटकन उठून उभी राहिली..
दोघांची नजरा नजर झाली आणि दोघांनाही धक्का बसला.. शर्वरी पटकन उठून उभी राहिली..
'अरे बापरे..!! हे तर तेच कर्णिक आहेत..
नको..!! हा जॉबच नको मला..
रोज मी यांना फेस नाही करू शकत...' शर्वरी त्याच्याकडे बघत विचार करत होती.
संभवला ही काय रिएक्शन द्यावी काही कळेना..
'ही तर विवाह मंडळा मध्ये भेटली होती मला.. आता या जॉब साठी बरोबर हिलाच इथे यायचं होतं का..
नाही.. मी नाही म्हणून सांगेन..!!
दुसरी कोणीतरी भेटेलच..' तो ही बसून तिच्याकडेच बघत विचार करत होता.
नाही.. मी नाही म्हणून सांगेन..!!
दुसरी कोणीतरी भेटेलच..' तो ही बसून तिच्याकडेच बघत विचार करत होता.
इकडे संजीवनी ताई मात्र दोघांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग एन्जॉय करत होत्या...
*******
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
*******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा