Login

सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 17)

Story Of Sambhav And Sharvari
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा


सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 17)



"आरव बाबा तूम्ही गेम बंद करा बरं...!!साहेब आले तर आपल्या दोघांनाही रागवतील.. तुमचे डॅडी घरातच आहेत आज..."

केअरटेकर रूम मध्ये आरवला समजावत होती पण तो काही ऐकत नव्हता..


"नो...!!
मला गेम खेळायचा आहे... मला डिस्टर्ब करू नका तूम्ही..."


शर्वरी आणि संजीवनी ताई आरवच्या रूम बाहेर पोहोचल्या तेव्हा त्यांच्या कानावर हे संभाषण पडलं.

आरवच्या त्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून तो किती हट्टी मुलगा असेल हे जाणवलं शर्वरीला.

संजीवनी ताईंनी दरवाजा नॉक केल्यावर त्या केअरटेकरचं लक्ष गेलं.. आणि ती पटकन त्यांच्यापाशी आली..


"मॅडम, काय झालं..??
मला बोलावलं असतं तर मी आले असते.."


"काही नाही..या दुसऱ्या मॅडम आल्या आहेत या जॉब साठी.. त्यांची आणि आरवची भेट घडवून द्यायची होती म्हणून मी स्वतःच घेऊन आले.."


"बरं..!!
ताई, आरव बाबा थोडे रागात आहेत आत्ता..
त्यांच्या ट्युशनच्या टीचर येऊन गेल्या थोड्या वेळापूर्वी.. आणि त्या रागावल्या म्हणून चिडले आहेत ते सध्या...
गेम खेळायचा हाच हट्ट धरून बसले आहेत..काही ऐकायला तयार नाहीत.."

ती केअरटेकर शर्वरीला माहिती पुरवत म्हणाली...

एवढा वेळ आरव कडे आपण काही लक्ष द्यायचं नाही.. त्याला आपण आवडलोच नाही पाहिजे...
असा विचार करून इथपर्यंत आलेल्या शर्वरीला आता मात्र आत मध्ये बसलेल्या त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघून तसा कुठलाच विचार आला नाही..
उलट आईविना हे लेकरू कस राहत असेल.. याचं वाईट वाटलं तिला...आणि नकळत तिची पावलं आतल्या दिशेला वळली.


संजीवनी ताई तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतच होत्या..


खरं सांगायचं तर त्या आधी आत मध्ये जाऊन आरवला थोडी कल्पना देणार होत्या.. जेणेकरून आरवने तिला सिलेक्ट करावं.. पण आता शर्वरी ज्या ओढीने आत मध्ये गेली होती ते पाहता आपल्याला काही बोलायची गरज नाही.. हे लक्षात आलं संजीवनी ताईंच्या.


"हाय आरव...!!"


शर्वरी त्याच्या शेजारी जाऊन उभी राहत म्हणाली आणि त्याने स्क्रीनवरची नजर काही सेकंदांसाठी हटवून तिच्याकडे बघितलं.


"हाय, बट हू आर यु..??
डॅडींनी आता माझ्यासाठी आणखी कुठली नवीन टीचर अपॉइंट केली का..??"
तो पुन्हा स्क्रीन कडे बघत म्हणाला.. आधीची केअरटेकर जॉब सोडणार आहे हे काही माहिती नव्हतं त्याला.


"नाही रे..!! मी शर्वरी आहे.. तुझी कोणतीच टीचर नाहीये..
मी तर तुझ्या आजीची फ्रेंड आहे.. "


"अरे, पण तू तर खूप यंग आहे.. माझी आजी ओल्ड आहे.. तुम्ही फ्रेंड कशा..??"


"अरे यंग आणि ओल्ड असं काही नसतं फ्रेंडशिप मध्ये..
आणि तुझी आजी सारखं तुझ्याबद्दल छान छान सांगत असते.. आरव खूप स्ट्रॉंग बॉय आहे.. तो अजिबात स्क्रीन बघत नाही..तो खूप छान स्टडी करतो.. तो सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतो.. "


स्वतःबद्दल इतकं छान ऐकून आता मात्र आरवने पुन्हा शर्वरी कडे बघितलं.. असं प्रेमाने आणि कौतुकाने बोलण्या ऐवजी सगळे त्याला फक्त सूचना करायचे.. आणि मग तो हट्टी बनत गेला होता.. शर्वरीच्या बोलण्यात मात्र त्याला आपुलकी वाटली.


"असं म्हणाली आजी..??"


"हो..!! आणि मग मी तुझ्या आजीला असं म्हणाले की, माझी मुलगी आहे ना.. जुई.. ती खूप स्क्रीन बघते.. मला तिला आरव दादा कसा गुड बॉय आहे हे दाखवावं लागेल.. आणि मग त्यासाठी आधी मला आरवला भेटावं लागेल.. म्हणून मी तुला भेटायला आले होते.. पण इथे तू तर स्क्रीनच बघतो आहेस.. आता कसं बरं सांगणार मी जुईला तू गुड बॉय आहेस ते..."


" नो नो..!!
आय एम अ गुड बॉय... हे तर मी जस्ट फाईव्ह मिनिट्स लावलं होतं...आत्ता बंद करतो मी हा गेम..."


असं म्हणत आरवने पटकन पळत जाऊन गेम बंदही केला.. आणि शर्वरी समोर येऊन तिच्याकडे बघत उभा राहिला.. काय झालं माहिती नाही पण त्या पहिल्या नजरेत शर्वरी मात्र त्याला भयंकर आवडली..


"आता तू सांगशील ना जुईला.. मी गुड बॉय आहे ते..."


"हो हो..!! नक्की सांगेन.." शर्वरी त्याच्या केसातून मायेने हात फिरवत म्हणाली.


"मी काय म्हणू तुला..?? तुझं नाव काय आहे..??"


"शर्वरी नाव आहे माझं.."


"ओके..! सो मी तुला शर्वरी ऑंटी म्हणतो.."


"चालेल... तू खूप गोड आहेस आरव.. आता मला जावं लागेल माझ्या घरी.. बाय बेटा..."


"लगेच निघालीस तू ऑंटी..?? आणखी थोडावेळ थांब ना आपण काहीतरी खेळूया.."


"नाही बेटा, आता निघावं लागेल.."


"तू माझ्या आजीची फ्रेंड आहेस ना..
मग तू परत कधी येशील..??"


"अं.." काही उत्तर द्याव सुचलंच नाही शर्वरीला.


"येईन.. म्हणजे..बघते.."


"ओके... पण मग मी माझ्या आजीकडून तुझा नंबर घेईन.. तुला कॉल केला तर चालेल...??"


काही मिनिटांची ती भेट पण आरव मात्र खूप अटॅचमेंट असल्यासारखं प्रश्न विचारत होता तिला.. आणि त्या निरागस मुलाला काय उत्तर द्यावं हे तिला कळत नव्हतं.


"हो चालेल.." त्याचं मन राखण्यासाठी म्हणाली ती.


दरवाजा बाहेर किंचित आडोशाला उभा राहून संजीवनी ताई सगळं पाहत होत्या.. इतका हट्टी आरव..
पण शर्वरीने बरोबर हँडल केलं होतं त्याला अगदी पहिल्या भेटीत..!! खरंच ही परफेक्ट मुलगी आहे या घरासाठी.. लवकरात लवकर सगळं व्यवस्थित जुळून येऊ दे देवा.. असं म्हणत त्यांनी डोळे मिटून घेतले.


******


लेखिका: अस्मिता कुलकर्णी

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all