डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 18)
जेव्हा शर्वरी आणि संजीवनी ताई दोघी आरवच्या रूम कडे निघून गेल्या होत्या.. तेव्हा संभव मात्र विचार करत तिथेच बसून राहिला होता..
त्याने आरवच्या रूममध्ये सेफ्टीसाठी एक हिडन कॅमेरा बसवून घेतला होता.. आणि आता मनाने कितीही नको असं म्हटलं असलं तरी सध्या त्या रूममध्ये काय चाललं असेल याची प्रचंड उत्सुकता लागली होती..
म्हणजे एकीकडे शर्वरीला जॉब द्यायचा नव्हताचं.. पण तरीही आरव आणि तिच्यामध्ये काय बोलणं होतं हे पाहायचं होतं त्याला.. शेवटी हो नाही म्हणत त्याने मोबाईल मध्ये फुटेज ऑन केलचं..
शर्वरीने ज्या प्रकारे आरवला समजावून सांगितलं.. त्यावर आरव इतक्या पटकन आणि छान रिऍक्ट झाला..
हे सगळं बघून तर संभवला आश्चर्याचा धक्काच बसला.
'काय जादू केली हिने आरव वर...?? प्रचंड हट्टी आणि उद्धट झाला आहे तो आजकाल.. पण हिच्यासोबत मात्र लगेच ऍडजेस्ट झाला..'
संभव विचार करत असतानाच त्याला सगळे येण्याची चाहूल लागली आणि त्याने पटकन मोबाईल बंद करून खिशात सरकवला..
संजीवनी ताई आणि शर्वरी दोघी तर बाहेर आल्या होत्याच पण शर्वरीचं बोट धरून आरवही बाहेर आला होता..
तसं तर ते दृश्य बघायला खूप छान वाटत होत पण तरीही संभवने मात्र तिला जॉब द्यायचा नाही हेच मनाशी पक्क केलं होतं.
"अं.. मॅडम मी निघते आता..." शर्वरी संजीवनी ताईंना म्हणाली.
"थांब ना तू आंटी.."
"डॅडी तुम्ही सांगा ना आंटीला थांबायला.."
तो संभव कडे बघत म्हणाला आणि संभवला आता पेचात पडल्यासारखं झालं.
"आरव, इकडे ये बेटा.." संभव उठून उभा राहत म्हणाला आणि आरव पटकन पळत त्याच्याकडे गेला.
"ऑंटीला काम आहे त्यामुळे तिच्या घरी जावं लागेल ना..??"
"ओके..!!
पण मग ती परत कधी येईल विचारा ना तिला.."
या वाक्यावर मात्र संभव आणि शर्वरीने एकमेकांकडे पाहिलं.. संजीवनी ताई आपल्या उभा राहून या सगळ्या सीनची मजा घेत होत्या..
"अस आपण कुणाला फोर्स नाही करू शकत आरव.. ओके..?? जा तुझ्या रूममध्ये.... मागच्या पूर्ण वीक मध्ये तू काय काय के आहेस ते सगळं चेक करायचं आहे मला.. आपण नेहमीच करतो ना हे काम..?
पळ बरं पटकन..!! मी आलोच.."
"डॅडी.. पण..."
"आरव..!!"
संभव किंचित मोठ्या आवाजात आरव डोळे दाखवत म्हणाला आणि आरव मात्र पाय आपटत रूम कडे निघून गेला.. आता तो गेला म्हटल्यानंतर शर्वरीलाही पटकन निघायचं होतं तिथून..
"ओके मॅडम..!! मी येते आता.."
"बरं.. लवकर ये परत.." संजीवनी
परत एकद या वाक्यावर त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं.. काय चाललं होतं सगळं दोघांनाही समजेनासं झालं होतं..
"आई, त्यांना ऑफिसकडून तसा रीतसर कॉल केला जाईल..!!"
संभव पुन्हा एकदा म्हणाला आणि संजीवनी ताईंनी त्याच्याकडे बघून नाक मुरडलं.. शर्वरी निरोप घेऊन निघून गेली.. आणि संभव ही पटकन आरवच्या रूम कडे निघून गेला.. कारण सध्या तरी त्याला त्याच्या आईच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नव्हती.
सगळे निघून गेल्यावर संजीवनीताई मात्र त्यांच्या आवडत्या खुर्चीवर आरामात बसल्या.. आता पुढे काय होईल याची थोडीफार कल्पना त्यांना होतीच.. केस काही उगीच पांढरे झाले नव्हते ना त्यांचे..
शर्वरी आणि संभव दोघेही या जॉब साठी नाही म्हणणार..
जरी आपण प्रेशर करून संभवला तिला जॉब द्यायला लावला तरी आता ती करेल की, नाही याची खात्री नव्हती.. तिच्या बाजूने होकार आहे की, नकार हे अजून माहिती नसलं तरी तिच्या एकंदरीत वागण्यावरून तरी त्यांना तसचं वाटत होतं.
*******
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
म्हणूनच त्यांनी एक निर्णय घेतला आणि पटकन विवाह मंडळामधल्या कविता ताईंना फोन लावला...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा