डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
"शर्वरी..!! आता पुरे झालं गं...
किती वेळा एकच नकार घंटा वाजवणार आहेस..."
आईचा आवाज कानावर पडला तेव्हा शर्वरीने हातातली पॉलिश केलेली बांगडी हळूच ट्रेमध्ये ठेवली.
सोन्याच्या दुकानात दिवसभर चकाकणाऱ्या दागिन्यांमध्ये काम करताना तिला स्वतःचं आयुष्य मात्र कायम फिकचं वाटायचं...
सोन्याच्या दुकानात दिवसभर चकाकणाऱ्या दागिन्यांमध्ये काम करताना तिला स्वतःचं आयुष्य मात्र कायम फिकचं वाटायचं...
आता आज आईच्या बांगड्या घरीच पॉलिश करून ठेवल्या तिने आणि तोवर आईने पुन्हा तोच विषय काढला... आज शुक्रवार होता.. तिचा विकली ऑफ...
"एकदा फक्त बघून घे...
लग्न करायलाच पाहिजे असं नाहीये..."
आई पुन्हा म्हणाली आणि शर्वरी भकास हसली.. कारण बळजबरीचं हसू होतं फक्त ते.. पण मनात मात्र काळोखचं दाटलेला होता..
आणि आईचं ते वाक्य ही वर वर म्हटलेलं होतं..
कारण आई लग्न करण्यासाठी अगदी हात धुवून मागे लागली होती तिच्या.
"आई, मला आता कोणी नकोय गं...!!"
ती म्हणाली खरं… पण दोघींनाही माहिती होतं... हा नकार तिच्या भीतीतून आलेला होता...घटस्फोटानंतर तीन वर्षं झाली होती....काळाने पुढे जायचं ठरवलं होतं पण शर्वरीचं मन अजूनही तिथेच अडकलेलं होतं... त्या भयानक भूतकाळामध्ये...
पण तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा एकचं आधार होता सध्या.... जुई.... सहा वर्षांची..
सतत प्रश्न विचारणारी.. आईची लाडकी..
"शर्वरी..!! आज माझा वाढदिवस आहे..
हे एकच गिफ्ट दे बाई मला... कविता ताईंनी दोन- तीन स्थळं शॉर्टलिस्ट करून ठेवली आहेत.. त्या विवाह मंडळात जा.. आणि स्वतः एकदा सगळं बोल कविता ताईंसोबत.. बाकी माहिती मी तुला पाठवली आहे पण तू बघतचं नाहीस.. कारण तुझा विश्वास नाही आता कुणावर...म्हणून म्हणतेय प्रत्यक्षात जाऊन बोल त्यांच्याशी.. त्या सगळं नीट सांगतिलं तुला कारण सगळी स्थळं त्यांच्या माहिती मधली आहेत..."
"ह्म्म.. भाजी घेऊन येताना जाईन मी.."
आईचं मन आणखी मोडावं वाटेना म्हणून शर्वरीने होकार दिला शेवटी.
***************
त्याच वेळी, शहराच्या दुसऱ्या टोकाला…
“संभव, आता तरी हा हट्ट सोड...”
आईचा आवाज चिडलेला नव्हता पण थकलेला होता.
संभव मात्र खिडकीतून बाहेर बघत उभा होता. स्वतःची फॅक्टरी, भरभराटीचा व्यवसाय, सधन कुटुंब… सगळं असूनही घरात एक पोकळी होती, जी कुणालाही भरता येत नव्हती...
ती पोकळी होती पत्नीची.. आणि त्याच्या मुलाच्या आईची...!!!!
"आई, मला अजून वेळ हवा आहे.."संभव शांतपणे म्हणाला.
"आरव मोठा होतोय...त्याला आई हवी... आणि तुला… सोबत ही..”
आईचं वाक्य अर्धंच राहिलं.. कारण संभवने चिडून तिच्याकडे पाहिलं होतं.
संभवला माहीत होतं..आईच्या त्या वाक्यात ‘प्रेम’ नव्हतं.. फक्त ‘गरज’ होती...
आरव...आठ वर्षांचा होता..जो तिथेच मोबाईलमध्ये गेम खेळत बसलेला होता... त्याच्याकडे एक क्षण बघून संभवने पुन्हा खिडकीबाहेर नजर वळवली... नक्की काय कराव या द्विधा मनस्थिती मध्ये अडकला होता तो..
*************
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा