डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 3)
"वेलकम मिस्टर कर्णिक.. माझ्यासोबत या..
मी तुम्हाला मॅमचं केबिन दाखवते..!!"
मी तुम्हाला मॅमचं केबिन दाखवते..!!"
सुहास्य वदनाने रिसेप्शनिस्टने संभवचं स्वागत केलं.. आणि तिचं अभिवादन स्वीकारून संभव तिच्या मागोमाग कविता ताईंच्या केबिनपर्यंत गेला.
त्याची तरी कुठे इच्छा होती आज इथे येण्याची.. पण आज आईने खूपच आग्रह केला होता म्हणून त्याने येण्याचा निर्णय घेतला होता..
दुसरी गोष्ट म्हणजे त्यानेही हाच विचार केला होता की, एकदाचं प्रत्यक्षात भेटून या विवाह मंडळाच्या ओनर ना आपण सांगू की, काही दिवस माझ्या आईला कोणतीही स्थळं सुचवू नका..
कामाचा व्याप प्रचंड होता त्याच्यामागे.. त्यात आईची भुणभुण होतीच.. आईचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजत नव्हता अशातला भाग नव्हता पण पुन्हा एकदा कुठल्या रिलेशनशिप साठी त्याचं मन तयार नव्हतं..
बरं आता वयाच्या या टप्प्यावर ती मॅच्युरिटीची एक लेव्हल प्रत्येकाला आलेली असते..
पण खरंच एका प्रचंड मोठ्या योगायोगाने आज शर्वरी आणि तो एकाच वेळेला नेमके या विवाह मंडळात पोहोचले होते.
"गुड इव्हिनिंग मिस्टर संभव कर्णिक..
प्लीज.. बसा ना.."
कविताताई अदबीने म्हणाल्या.
"नमस्ते..!! गुड इव्हिनिंग...!"
ब्लेझरची बटनं सैल करत संभव कविता ताईंच्या समोर बसला.
"मघाशीच तुमच्या आईं सोबत माझा फोन झाला..
आम्ही जी स्थळं शॉर्टलिस्ट केली होती.. त्यामधली...."
"एक मिनिट मॅडम, सॉरी तुम्हाला मधेच थांबवण्यासाठी..
परंतु हेच तुम्हाला प्रत्यक्षात सांगायला मी आलो होतो की, सध्या काही दिवस माझ्या आईला नवीन स्थळ आपण सुचवू नये.. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला..."
"हो.. पण आता झालं असं आहे की, तुमच्यासाठी तुमच्या आईंनी जी स्थळं शॉर्टलिस्ट केली होती.. त्यापैकी एक मुलगी आता या विवाह मंडळामध्ये आलेली आहे.. आणि तुमच्या आईंची हीच इच्छा आहे की, तुम्ही आज त्या मुलीला भेटून घ्यावं..."
"काय...??" धक्काच होता हा संभवच्या दृष्टीने.
"असं कसं शक्य आहे मॅडम की, अचानक ती मुलगी इथे आली आहे.. नक्कीच हे सगळं प्रि प्लॅन असणार..."
आता मात्र किंचित चढ्या आवाजात संभव हे म्हणाला..
त्याला हा सगळा त्याच्या आईचा आणि ह्या विवाह मंडळामधील मॅडमचा प्लॅन वाटत होता.. आणि म्हणूनच आईने इथे येण्यासाठी आज इतका आग्रह केला हे लक्षात आलं त्याच्या.
त्याला हा सगळा त्याच्या आईचा आणि ह्या विवाह मंडळामधील मॅडमचा प्लॅन वाटत होता.. आणि म्हणूनच आईने इथे येण्यासाठी आज इतका आग्रह केला हे लक्षात आलं त्याच्या.
"माझ्यावर विश्वास ठेवा मिस्टर कर्णिक... खरंच योगायोगाने ती मुलगी याच वेळेला इथे आली आहे.."
'या लोकांना योगायोग हा सोयीस्कर शब्द कुठून सापडला आहे देव जाणे..? म्हणजे इतरांच्या बाबतीत खरंच तसं होत असेलही.. पण आजचं सगळं तर मला प्लॅनिंगचं वाटतय... आणि आता आईला हे सगळं माहिती आहे.. म्हणजे आता त्या लेडीला मला भेटावचं लागेल...' संभव मनातच म्हणाला.
"ठीक आहे मॅडम, मला लगेच निघायचं आहे..
माझी एक अर्जंट मीटिंग आहे.. सध्या तरी आम्ही अगदी दहा मिनिटांसाठी भेटू शकतो.. जर त्या ज्या कोणी आहेत त्यांनाही वेळ असेल तर..."
"हो.. हो.. ती तयार आहे तुम्हाला भेटायला...
शर्वरी दीक्षित नाव आहे तिचं... तिचं प्रोफाईल मी तुमच्या नंबरला सेंड..."
"हं.. पाठवू शकता तुम्ही.."
कविता ताईंचं वाक्य पूर्ण होण्याआधीच म्हणाला तो.
आता तिला भेटायचचं होतं तर तो असं ब्लाइंडली भेटू शकत नव्हता तिला..तिच्या बद्दल किमान जुजबी माहिती तरी आपल्याला असली पाहिजे एवढाच एक उद्देश होता आणि म्हणून तो कविताताईंना प्रोफाइल सेंड करा म्हणाला.
क्षणाचा ही विलंब न लावता कविताताईंनी लगेच शर्वरीचं प्रोफाइल संभवला सेंड केलं...
तसं तर त्याच्या आईने आधीच पाहिलं होतं ते प्रोफाइल..
पण जसं शर्वरीने पाहिलं नव्हतं तसं संभवनेही पाहिलं नसणारच याची कविता ताईंना खात्री होती.. आणि शर्वरी साठी तो खूपच मनात बसला असल्यामुळे त्यांनी संभवचा नंबरही सेव्ह करून ठेवला होता.
त्याच्या ऑफिस नंबर वर कविताताईंचा मेसेज आला आणि त्याने एक सुस्कारा सोडत शर्वरीचं प्रोफाइल ओपन केलं.
******************
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
*******************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा