डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 5)
शर्वरी तर मान खाली घालूनच बसली होती.. हातात असलेल्या घड्याळाच्या डायल वर उगीच गोल गोल बोट फिरवत होती ती.. आता इतक्या वर्षानंतर पुन्हा असा प्रसंग आल्यावर काय रिऍक्ट करावं समजत नव्हतं तिला.. संभवची ही तशीच अवस्था होती थोडीफार..
ही जर ऑफिस मीटिंग असती तर परफेक्ट हँडल केली ही असती त्याने.. पण ही मीटिंग वेगळीच होती..
त्याने एक नजर खाली मान घालून बसलेल्या शर्वरी कडे पाहिलं आणि आता आपल्यालाच बोलायची सुरुवात केली पाहिजे एवढं तर लक्षात आलं त्याच्या.
"हाय.." संभव
"हॅलो.." शर्वरी
आत्ता कुठे तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितलं.. काही वेळापूर्वी त्याचं वय ऐकल्यानंतर तिला असं वाटलं होतं की, एखादा पोक्त दिसणारा वगैरे व्यक्ती असेल की काय संभव... पण आता त्याच्याकडे बघून तिचा तो भ्रम तुटला होता.
गव्हाळ रंगाचा असला तरी अतिशय आकर्षक पर्सनॅलिटी होती त्याची.. त्यात त्याने आज व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट आणि डार्क ब्लू कलर ब्लेझर घातला होता त्यामुळे आणखी उठवदार दिसत होता तो.. नजर आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तर वेगळाच होता.. एकंदरीत ती भारावून गेली होती त्याच्याकडे बघून..
काही सेकंदांनंतर मात्र तिच्या मनात असा दुसरा विचार आला की, एवढा रुबाबदार आणि श्रीमंत असा हा व्यक्ती काही आपल्याला पसंत करणार नाही.. त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही.
“तुम्ही… जॉब करता?”
काहीतरी सुरुवात करावी म्हणून संभवने औपचारिकपणे विचारलं.
“हो....ज्वेलरी शॉपमध्ये.."
त्याला उत्तर देऊन नजर मात्र दुसरीकडे वळवली तिने कारण जास्त वेळ त्याच्याकडे बघून बोलणं शक्य नव्हतं तिला.
“हं… गुड..!! स्त्रियांनी ही स्वतःच्या पायावर उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजेच.. जे जमेल.. शक्य असेल.. आणि आवडेल.. त्या क्षेत्रात काम करावं.."
तो मात्र तिच्याकडे बघतच बोलत होता.
"बरोबर आहे तुमचं पण माझ्यासारख्या काही स्त्रिया असतात ज्यांच्याकडे स्वतःच्या पायावर उभारल्याशिवाय दुसरा ऑप्शनही नसतो.. आवड म्हणून नाही तर गरज म्हणून जॉब करावा लागतो..."
ती त्याच्याकडे बघून उदास स्वरात म्हणाली आणि तिच्या म्हणण्याचा अर्थ त्याला कळून चुकला.. पण या सगळ्यात तो तरी काय करू शकणार होता.
"हं..
आज इथे ज्यासाठी एकत्र भेटलो आहे त्या विषयावर स्पष्टपणे आपण बोललो तर बरं होईल असं वाटतं मला..." संभवने आता मुद्द्याचं बोलायला सुरुवात केली.
"हो.."
तिला हे माहिती नव्हतं की, संभव स्वतःहून तिला भेटायला आलाय की त्याच्यावरही घरच्यांनी जबरदस्ती केली आहे.. त्यामुळे पटकन काय रिएक्शन द्यावी हेच कळत नव्हतं तिला.
"मिस शर्वरी, एक गोष्ट क्लिअर करायची होती मला.."
"हं.. बोला ना..."
"तुम्ही कदाचित वेगळ्या अपेक्षेने इथे आला असाल.. परंतु मला मात्र घरच्यांच्या दबावामुळे यावं लागलं आहे.. आणि तुम्ही लग्नासाठी मला भेटायचं या हेतूने आला असाल परंतु तुमचा भ्रमनिरास केल्याबद्दल मी मनापासून तुमची माफी ही मागतो..."
संभवच्या या स्टेटमेंट नंतर मात्र तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.. अक्षरशः उठून उडी मारावी की काय असं वाटायला लागलं तिला.
"नाही मिस्टर कर्णिक, तुम्ही अजिबात माफी मागू नका..
आपण दोघे एकाच बोटीतले प्रवासी आहोत कदाचित..
माझ्याही घरच्यांनी आज मला जबरदस्ती इथे पाठवलं होतं.. माझाही दुसऱ्या लग्नाचा विचार नाही.. आता पुन्हा त्या सगळ्यात गुंतायला नको वाटत आहे.."
तिचं बोलणं ऐकून संभवच्या ही मनावरचं ओझ हलकं झालं...
"ग्रेट..!! बऱ्याच वेळा पासून खूप टेन्शन आलं होतं मला सिच्युएशन कशी हँडल करावी याचं... पण आता मात्र रिलॅक्स वाटत आहे.."
संभव ही मोकळ्या स्वरात म्हणाला आणि दोघे एकमेकांकडे बघून मंद हसले.
"मग आता बाकी काही बोलण्याचा प्रश्नचं उरत नाही..
जाऊया बाहेर..??" संभव
जाऊया बाहेर..??" संभव
"हो.. पण घरच्यांना काहीतरी सांगावं लागेल आपल्याला..." शर्वरी घरी गेल्यानंतरचा आईचा चेहरा आठवून म्हणाली.
"अं.. राईट...!!
आपण एकमेकांना नकार देऊ सरळ..
पसंत नाही असं तुम्ही तुमच्या घरी सांगा आणि मी माझ्या घरी सांगेन..
चालेल..??"
"हो.. चालेल..."
दोघेही रिलॅक्स चेहऱ्याने बाहेर आले आणि बाहेरच फोनवर बोलत उभ्या असलेल्या कविताताईंनी त्या दोघांकडे बघितलं... आणि त्या दोघांचे चेहरे बघून यांची पसंती आहे की काय असा गैरसमज झाला कविता ताईंचा.
"झालं आमचं बोलणं.. येतो मी.."
संभव कविता ताईंना म्हणाला.
"बरं..."
पण निघताना एक नजर त्याने कविताताईंच्या शेजारी उभ्या असलेल्या शर्वरी कडे पाहिलं आणि तिच्याकडे बघत स्माईल करून निघून गेला.. वेटिंग एरिया मध्ये बसलेला त्याचा पीए ही त्याच्या मागोमाग पळाला.
बाहेर ड्रायव्हर त्याची वाट बघत उभा होताच... संभव कार मध्ये बसल्यानंतर काही क्षणात ती कार धुळ उडवत निघून गेली आणि एवढा वेळ तिकडेच बघत असलेल्या कविताताई आणि शर्वरीने एकमेकींकडे पाहिलं.
बाहेर ड्रायव्हर त्याची वाट बघत उभा होताच... संभव कार मध्ये बसल्यानंतर काही क्षणात ती कार धुळ उडवत निघून गेली आणि एवढा वेळ तिकडेच बघत असलेल्या कविताताई आणि शर्वरीने एकमेकींकडे पाहिलं.
"काय मग...??"
"नंतर बोलूया ना काकू.. म्हणजे आई करेल तुम्हाला फोन.. बरीच काम आहेत..येऊ का मी..?? अंधार झाला की भाजी घ्यायला नको वाटतं..."
"हो हो... ये तू.."
कविता ताईंना वाटले की ती सांगायला लागते आहे की काय..पण मनोमन त्या खुश होत्या.
शर्वरी ही त्यांचा निरोप घेऊन निघून गेली आणि कविताताईंनी मात्र अतिउत्साहात संजीवनी कर्णिकांना फोन लावला.
शर्वरी ही त्यांचा निरोप घेऊन निघून गेली आणि कविताताईंनी मात्र अतिउत्साहात संजीवनी कर्णिकांना फोन लावला.
******************
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
*******************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा