डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 8)
शनिवारी सकाळी शर्वरी नेहमीसारखी कामावर पोहोचली.. कामाला सुरुवात करण्यापूर्वीच तिला मॅनेजरने बोलवून घेतलं.. ती भलेही प्रसन्न चेहऱ्याने आत मध्ये गेली पण आज मात्र मॅनेजरचा चेहरा वेगळाच होता.
“शर्वरी, बस..!!
एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे”
"काय सर..??" ती काळजीने म्हणाली.
"तुला तर माहिती आहे साधारण दोन वर्षातून एकदा आपल्या ज्वेलरी ब्रँडच्या ब्रांचेस मध्ये ट्रान्सफर होतात..
आणि ते इंटरनल ट्रान्सफर आपल्या टॉप मॅनेजमेंट कडून होतात.. सगळ्या ऑर्डर या मुंबईतून येतात.."
"ह.. हो..सर..."
सरांची एवढी लांबलचक प्रस्तावना ऐकून खरं तर धाकधूक व्हायला लागली होती तिला.
“तर तुझी ट्रान्सफर झाली आहे.”
“कुठे?”तिने पटकन विचारलं.
“आपल्या शॉप च्या पुणे ब्रांचला….”
क्षणभर तिला काही सुचलचं नाही.. क्षणार्धात डोळ्यापुढे सगळी गणितं फिरायला लागली..
ती कोल्हापुरात राहत होती आणि तिथून पुण्याला ट्रान्सफर..!! अशक्य गोष्ट होती तिच्यासाठी तिकडे जाण ही..
एकटी असती तर काहीतरी मॅनेज केलं असतं तिने पण जुईला घेऊन तिकडे कसं जाणार..? आणि जुईला सोडून तरी कसं राहणार..?
“सर, ते मला शक्य नाही.. तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे..माझी छोटी मुलगी आहे… घरची परिस्थिती अशी..
मला तिकडे जाऊन जॉब करणं परवडणार नाहीये सर..
मोठ्या सिटी मध्ये खर्चही तेवढेच होतात आणि मुलीला कोण सांभाळणार..?”
“मला सगळं माहीत आहे..पण मी तुला मगाशी सांगितलं..
हा निर्णय वरून आलाय... त्यात मी काहीच करू शकत नाही...पुढच्या सोमवारी जॉईन करायचं आहे तुला तिकडे..."
"ह्म्म.. ओके सर..."
बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं त्यामुळे सरांना ओके म्हणून ती केबिनच्या बाहेर आली आणि एका कोपऱ्यातल्या स्टुलावर सुन्न चेहऱ्याने बसून राहिली.
डोळ्यांसमोर अंधार दाटला होता..
‘आता दुसरा जॉब शोधावा लागेल… पण इथे चांगलं पेमेंट मिळत होत मला.. पुन्हा एखाद्या छोट्या शॉप मध्ये तेवढं मिळेल का..?? आहे त्या ठिकाणी जॉब नाही कंटिन्यू करू शकत मी...
आठ दिवसात कुठे मिळेल चांगला जॉब आता मला...’
उद्विग्न अवस्थेत विचार करत काही क्षण तशीच बसून राहिली होती ती...
***************
संजीवनी कर्णिक काठीच्या आधाराने खांद्यावरची शाल व्यवस्थित करत त्यांच्या भव्य खुर्चीत बसल्या..
समोरच्या सोफ्यावर संभव काही फाईल चेक करत बसला होता.. ऑफिस साठी तयार झाला होता त्यामुळे ब्लेझर मध्ये होता तो... आरव स्कूलला गेला होता.
काल संजीवनी ताईंना त्याच्याशी बोलायचं होतं पण बरीच शब्दांची जुळवा जुळव करूनही त्याच्यापुढे विषय काढणं काही शक्य झालं नव्हतं त्यांना..
म्हणून मग उद्या बोलू असा विचार त्यांनी केला होता..
पण तो त्या मुलीला भेटला ही सुद्धा मोठी गोष्ट वाटत होती त्यांना.
संभवचा पर्सनल असिस्टंट असलेला विनय त्याच्या शेजारीच उभा होता.. संजीवनी संभव कडे बघत विचार करत होत्या की, आत्ताच त्याच्याशी बोलून घ्यावं का..?
पण तोपर्यंत आरवला सांभाळणारी केअरटेकर त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि संजीवनी ताईंच्या विचारांना ब्रेक लागला.
समोर कोणीतरी येऊन उभारल्याचं जाणवल्यावर संभवने मान वर करून बघितलं..
"बोला..." असं म्हणत त्याने पुन्हा नजर फाईल कडे वळवली.
“सर, पुढच्या आठवड्यापासून मी येऊ शकणार नाही..”
आरवची केअरटेकर म्हणाली.. आणि फाईलवर सही करणारी संभवची बोटं तशीच थांबली..
संजीवनी ताईंनाही ते ऐकून धक्का बसला..
आत्ता कुठे आरव थोडा रुळावर यायला लागला होता.. तोवर केअर टेकर सोडून जायचं म्हणत होती.. संभव आणि संजीवनी ताई दोघांनाही एकदम टेन्शन आलं ते ऐकून....
“का?” त्याने वैतागून विचारलं.
*************
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
