डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 9)
“माझी स्वतःची अडचण आहे..समजून घ्या सर...” ती केअर टेकर म्हणाली.
"मान्य आहे की असेल तुमची अडचण..
पण म्हणून हे असं इतक्या शॉर्ट नोटीस वर सांगणं..
ही कुठल्या कामाची पद्धत आहे..?? किमान एक महिना आधी सांगणं अपेक्षित आहे तुम्ही आम्हाला..." संभव चिडून म्हणाला.
"सर घरी खरच फार अडचण निर्माण झाली आहे.. तरीपण दुसरी बाई मिळेपर्यंत मी आठ दिवस काम करायला तयार आहे.. आरव बाबा साठी वाईट वाटतयं पण काय करू..?
खरंच शक्य नाही मला...!!"
ती हात जोडत म्हणाली.
संभवला आता कुठलाही इमोशनल ड्रामा नको होता..
त्याने.. "ठीक आहे" म्हणत हाताने त्या केअरटेकरला जाण्याची खूण केली आणि फाईल बंद करून पीएलाही बाहेर जायला सांगितलं... काळजी युक्त चेहऱ्याने त्याने संजीवनी ताईंकडे पाहिलं तेव्हा त्याही त्याच्याकडेच बघत होत्या.
आधीच एकतर आरव खूप हट्टी मुलगा होता.. त्याला कधी आईचं प्रेम मिळालंच नव्हतं.. त्यामुळे तसा झाला होता तो.. कुठल्याच केअर टेकर सोबत पटवून घ्यायचा नाही.. पण आता या बाईं सोबत चांगलं जमलं होतं त्याचं... थोडा सुधारायला लागला होता की, पुन्हा गाडी झिरोवर येणार होती त्याची...
"आई.. आता..??"
“मी आधीच सांगत होते… पैसे देऊन आई मिळत नाही... त्याला आईची गरज आहे..म्हणून तर इतकी मागे लागले आहे मी तुझ्या लग्नाच्या...”
"आई अगं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे लग्न कसं असेल..??"
संभव वैतागत म्हणाला.
"पण सध्या आपल्या समोर जो प्रश्न उभा राहिला आहे त्याचं उत्तर तरी लग्न हेच आहे..!!"
"आई तुला माझा मुद्दा कळत नाहीये गं..
दुसरं लग्न करूनही आरवला आईची माया मिळेल याची काही शाश्वती आहे का..?"
"ज्या मुलीला तू विवाह मंडळामध्ये भेटलास ना.. ती नक्की देईल आरवला आईचे प्रेम..!! अरे खूप छान मुलगी आहे.. तसही मी तिला शॉर्टलिस्ट केलं होतच..
योगायोगाने तुमची भेट ही झाली.. देऊन टाक होकार..
सगळेच प्रश्न मिटतील..."
संभव शांत बसला.. लगेच प्रतिउत्तर दिल नाही त्यानं आईला.. तसही त्याने आणि शर्वरीने नकार द्यायचं ठरवलं होतचं... त्यामुळे ते टेंशन नव्हतं..पण ही सगळी जबरदस्तीचं वाटतं होती त्याला..
"सध्या तो विषय नको आई...!!"
"अरे, पण विवाह मंडळामधून मला फोन आला तर काय उत्तर देऊ..??"
"नकार सांग...!!"
संजीवनी ते उत्तर ऐकून हिरमुसल्या.. पण त्याचा चिंताग्रस्त चेहरा बघून जास्त काही बोलता येईना त्यांना.
एकीकडे वेगाने वाढणारा बिझनेस..
दुसरीकडे मुलगा…आणि आता हा नवा प्रश्न.
‘आरवचं काय..?’
आणि नकळतच…शहरातल्या दोन वेगवेगळ्या घरांमध्ये
एकाच वेळी अतिशय किचकट प्रश्न उभे राहिले होते.
एक शर्वरीसमोर...तर एक संभवसमोर.
आणि उत्तर…दोघांनाही अजून माहीत नव्हतं…
पण ते उत्तर दोघांनी एकमेकांना स्वीकारण्यात दडलेलं होतं... तरीही दोघांन ते मान्य नव्हतं...!!
एकाच वेळी अतिशय किचकट प्रश्न उभे राहिले होते.
एक शर्वरीसमोर...तर एक संभवसमोर.
आणि उत्तर…दोघांनाही अजून माहीत नव्हतं…
पण ते उत्तर दोघांनी एकमेकांना स्वीकारण्यात दडलेलं होतं... तरीही दोघांन ते मान्य नव्हतं...!!
**********
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
