डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
सेकंड चान्स: लग्नाचा की प्रेमाचा (भाग 2)
संध्याकाळचे साडेपाच झाले होते...
विवाह मंडळाच्या ऑफिसमध्ये फारशी गर्दी नव्हती पण अगदी शांतताही नव्हती...
या विवाह मंडळाच्या सर्वेसर्वा कविता ताई होत्या ज्या शर्वरीच्या आईच्या म्हणजेच मनीषा ताईंच्या अगदी खास ओळखीच्या होत्या.
या विवाह मंडळाच्या सर्वेसर्वा कविता ताई होत्या ज्या शर्वरीच्या आईच्या म्हणजेच मनीषा ताईंच्या अगदी खास ओळखीच्या होत्या.
कविताही शर्वरीला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होत्या आणि म्हणूनच आता तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं म्हणून त्या स्वतःही प्रयत्न करत होत्या.
शर्वरीच्या आईने म्हणजे मनीषा ताईंनी सगळी स्थळं शर्वरीच्या मोबाईलवर पाठवली होती पण तिने काहीच डाऊनलोड करून बघितलं नव्हतं...
शेवटी मनीषा ताईंनी आता कसं बसं समजावून शर्वरीला आज विवाह मंडळात जायला भाग पाडलं होतं आणि म्हणूनच आत्ता शर्वरी विवाह मंडळात आली होती.
वेटिंग एरिया मध्ये बसून शर्वरी इकडे तिकडे बघत होती.. फक्त पाच वर्षात कविता ताईंचं हे विवाह मंडळ चांगलंच मोठं झालं होतं.. अगदी स्टाफ ही अपॉइंट केला होता त्यांनी..
शर्वरी घरातून डायरेक्ट इथेच आली होती.. इथून भेटून झालं की, मग भाजी आणि छोटासा केक घेऊन घरी जायचं.. असा प्लॅन होता तिचा कारण आईचा वाढदिवस होता..
जेव्हापासून ती घटस्फोट घेऊन इथे आई-बाबांकडे राहायला आली होती तेव्हापासून दादा आणि वहिनीचं बदललेलं वागणं जाणवत होतं तिला.. आईवरही बऱ्याचदा चिडचिड करायचा दादा.. त्यामुळे तो आणि वहिनी आज केक आणतील अशी काही अपेक्षा नव्हतीच शर्वरीची..
पण सध्या पर्यायही नव्हता तिच्याकडे..
काहीतरी पैसे गाठीला असल्याशिवाय एकटं राहण्याचा निर्णय घेऊ शकत नव्हती ती...
शरीराने इथे बसली असली तरी शर्वरीचं मन मात्र इथे नव्हतंच...
‘एकदा कविता काकूंना भेटून झालं की विषय संपेल…’
तिने स्वतःलाच पुन्हा एकदा समजावलं.
तेवढ्यात मुख्य दरवाजातून काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या कविता ताई आल्या.
“शर्वरी..चलं..!! माझ्या केबिनमध्ये बसून बोलू... ”
त्या हसत म्हणाल्या.
“हो...”
ती पटकन उभी राहिली आणि कविताताईंच्या मागे गेली.
“बरं…! मी जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलणार नाही शर्वरी..!! तुझ्यासाठी उत्तम वाटणारी अशी तीन स्थळं शॉर्टलिस्ट केली आहेत मी स्वतः
मनीषा आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी झालो आहोत या तीन-चार वर्षात.. आणि आमच्या दोघींची मनापासून इच्छा आहे की, खरचं आता तुझं आयुष्य मार्गी लागावं.. लग्न वाईट नसतं बेटा.. तुला पहिल्यांदा तसा अनुभव आला म्हणून कदाचित तू घाबरते आहेस..."
कविता ताईंनी प्रेमाने समजावलं आणि शर्वरीला मात्र त्यांना नाही म्हणणं अवघड गेलं.
"हं.. हो काकू... पण तरीही..."
"आता पण वगैरे काही काढू नकोस शर्वरी..
योगायोग असा झाला आहे की… मी शॉर्टलिस्ट केलेल्या स्थळांपैकी एक जण आत्ताच येत आहेत..
त्यांचा आणि माझा फोन झाला.. पोहचतील ते काही वेळात.. सोन्यासारखं स्थळ आहे शर्वरी.. अगदी सधन कुटुंब आहे.. कर्णिक इंडस्ट्रीज हे मोठं नाव आहे आपल्या शहरामध्ये... त्यांचाही घटस्फोट झाला आहे आणि त्यांना एक आठ वर्षाचा मुलगा आहे...
जर ते येतचं आहेत तर तुम्ही दोघं आजच इथे मीटिंग रूम मध्ये एकमेकांना भेटून घ्या... तुमच्या पत्रिका ही उत्तम जुळत आहेत.. आणि कदाचित योग ही आहे.. त्याशिवाय इतक्या पटकन भेट झालीच नसती.."
इतकं सगळं बोलून कविताताई शांत झाल्या आणि शर्वरीला मात्र घामच फुटला..
'फक्त कविता काकूंना समजावून सध्या स्थळं बघायला थांबवायची विनंती करायची..' असा विचार करून ती आली होती की, इथे येऊन डायरेक्ट स्थळचं बघावं लागत होतं तिला...
खाली मान घालून एकदा स्वतःच्या अवताराकडे बघितलं तिने.. अगदी साधासा ड्रेस घालून आली होती ती..
मान्य आहे की, लग्न करायला नकारच देणार होती परंतु निदान समोरच्याला आपण व्यवस्थित दिसलो तरी पाहिजे असं वाटलं तिला..
'अरे देवा, हे काय होऊन बसलं.. एरवी शॉप मध्ये जायचं असतं त्यामुळे किती व्यवस्थित तयार होऊन जाते मी..
आणि आज मात्र मी मेकअप वगैरे न करता तशीच बाहेर पडले.. आता या काकू म्हणत आहेत की, ते खूप मोठे इंडस्ट्रियालिस्ट आहेत.. असतीलही..!! मी नाही नाव ऐकलं त्यांच्या इंडस्ट्रीच.. पण अर्थात व्यवस्थित प्रेझेंटेबल राहत असणार ते.. काय इम्प्रेशन पडेल माझं त्यांच्यावर.. लग्नाला होकार द्यायचा नसला तरी किमान माणूस म्हणून तरी आपण नीट वाटावं ना समोरच्याला...'
शर्वरीने विचार करत करत समोरच्या टेबलवरील ग्लास उचलून दोन घोट पाणी पिलं.. कविता ताईंना तिची घालमेल लक्षात येत होती.
"शर्वरी, जास्त टेन्शन घेऊ नको.. तू वॉशरूम मध्ये जा.. थोडी फ्रेश हो.. ते आले की मी तुला पुन्हा बोलावते..."
कविताताईंनी असा सल्ला दिल्यावर ती हो.. म्हणून सरळ उठून बाहेर वॉशरूमच्या दिशेने गेली.. आणि तिथे जाऊन तोंडावर सपासप पाणी मारलं तिने..
'ही आई पण ना, सगळं ठरलं असणार आहे तिचं आणि कविता काकूचं.. म्हणूनच गोड गोड बोलून.. वाढदिवसाचं गिफ्ट दे म्हणून... तिने पाठवलं मला इथे..
एवढा योगायोग थोडीच असतो की, ते जे कोणी आहेत ते ही नेमके आत्ता या वेळेला इथे येतील...?
आणि पत्रिका जुळायचं काय सांगत आहेत कविता काकू.. मागच्यावेळी ही पत्रिका चांगलीच जुळली होती.. शेवटी काय झालं...??
आता माझ्या मुलीला व्यवस्थित वाढवता यावं यासाठी मी प्रयत्न करते आहे.. पण ते नाही..!!
लग्न करं म्हणून मागे लागायचं आणि पुन्हा मला या सगळ्या चक्रात अडकवायचं..! असा कसा विचार करू शकतात आई-बाबा हेच कळत नाहीये मला....
आणि जरी मी दुसरं लग्न केलं.. तरी तो दुसरा व्यक्ती माझ्या जुईला वडिलांचं प्रेम खरच देऊ शकेल का...??
आणि जरी मी दुसरं लग्न केलं.. तरी तो दुसरा व्यक्ती माझ्या जुईला वडिलांचं प्रेम खरच देऊ शकेल का...??
खूप अवघड आहे हे सगळं...'
एवढा सगळा विचार करता करता शर्वरी कधी रेडी झाली तिचं तिलाच कळलं नाही.
*****************
लेखिका: अस्मिता कुलकर्णी
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
*******************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा