मधुरा आज खूप आनंदात होती. मधुरा पार्लरमध्ये जाऊन हेअर कट, हेअर डाय व फेशियल करुन आली होती. मधुराने आपली मैत्रिण शोभाकडून ऑनलाईन जिन्स व टॉप मागवले होते. जिन्स व टॉप घालून मधुरा मोबाईलमध्ये सेल्फी घेत, मी माझ्या रुपाची राणी ग. हे गाण गात होती.
तेवढयात तिथे मधुराचा नवरा सागर आला आणि तो मधुरावर जोरात ओरडला, “मधुरा हे काय कपडे घातले आहेस? काढ आधी ते कपडे आणि साडी नेस. तुला ह्या वयात हे शोभत का? प्रशांत आणि अनिताने हे बघीतले तर काय म्हणतील?”
“काहीही म्हणणार नाही? मला हवं तसं मी आता जगणार आहे. तुम्ही तुमची सेकंड इनिंग एन्जॉय करता, मग मी का करु नये?” असं म्हणून मधुरा हॉलमध्ये गेली. तिच्या मागे सागरही गेला.
मधुरानी घातलेली जीन्स आणि टॉप बघून त्यांचा मुलगा प्रशांत आणि सुन अनिता त्यांच्याकडे बघतच राहिले.
मधुरा सर्वांकडे बघून म्हणाल्या, “मी परवा माझ्या मैत्रिणींसोबत आठ दिवसासाठी गोव्याला फिरायला जाणार आहे. त्यासाठी हि जीन्स आणि टॉपची खरेदी केली आहे. कशी दिसत आहे मी?”
हे ऐकल्यावर प्रशांत मधुराकडे बघून म्हणाला, “आई ह्या आधी तुला अशा कपडयात मी बघीतले नाही. त्यामुळे थोडं अवघडल्यासारखे होत आहे. आई तू एकटी जाणार आहेस गोव्याला. बाबा तुम्ही नाही जाणार आई सोबत आणि फक्त गोव्याला जाण्यासाठी हे कपडे घेतलेस तू. आता नाही वाटत का तुला तू फालतू खर्च केला आहेस कपड्यांवर. आम्हाला नेहमी ओरडत असतेस कपड्यांवर किती पैसे खर्च करता?”
“हो मी एकटी आपल्या सोसायटीमधल्या मैत्रिणींबरोबर गोव्याला जाणार आहे.”
तेवढ्यात अनिता त्यांची सुन म्हणाली, “हे कधी ठरल आई आणि कसे जाणार आहात तुम्ही?”
“आठ दिवस झाले आणि आम्ही फ्लाईटने जाणार आहे.
हे ऐकल्यावर सागर चिडून मधुराला म्हणाला, “आठ दिवस झाले आणि आज तू आम्हांला सांगत आहेस आणि फ्लाईटने गोव्याला जाणार आहात तुम्ही. किती खर्च आला असेल त्यासाठी?
“आधी सांगितल असत तर तुम्ही गोव्याला न जाण्याची हजार कारण दिली असती तुम्ही सर्वांनी मला.”
प्रशांत आईला म्हणाला, “आई तू अचानक गोव्याला कशी काय चालली? ते पण सोसायटीतील मैत्रिणींसोबत. तू ह्या आधी कधी एकटीने प्रवास केला आहेस का? तुला माहित आहे का बाहेरच्या जगात किती फसवेगिरी आहे?”
अहो आई, “तुम्ही असा कसा अचानक तुमचा कार्यक्रम ठरवला? आमची किती धावपळ होईल? पिंकीला कोण बघणार? बाबा तुम्ही कशी परवानगी दिली आईला एकटीला जायची?”
“मला पण आताच कळत आहे अनिता. मधुरा हे तू चुकीचे वागलीस. मला तरी सांगायच. आपण दोघे गेलो असतो गोव्याला फिरायला. त्यासाठीच मागच्या आठवड्यात तू बॅंकेतुन पैसे काढलेस. त्यावेळी पण तू मला एक शब्दांनी बोलली नाहीस गोवा सहली बद्द्ल.”
मधुरा सागरकडे बघुन म्हणाली, “किती सहजपणे म्हणाला तुम्ही माझ चुकल? मला पण आवड निवड आहे हे मी आणि तुम्ही विसरूनच गेला आहात. प्रशांत आज मी पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी खरेदी केले. मी पहिल्यांदा बाहेर मैत्रिणींसोबत फिरायला जात आहे त्याचा आनंद नाही झाला तुला. तुमच्यापैकी एकही जण पण मला म्हणाला नाही? जाऊन ये तू मजा कर”
“अहो मुलांचे जाऊ दे. तुम्ही तरी मला सपोर्ट करायला हवा गोव्याला जाण्यासाठी. तुम्ही तुमची पहिली इनिंग तुमच्या आवडीनुसार जगला आणि आता दुसरी इनिंग पण तुमच्या आवडीनुसार जगत आहात पण माझे काय? तीस वर्षांचा संसार आपला पण तो फक्त तुमच्या मर्जीने चालवला मी. माझी आवडनिवड सगळी बाजूला ठेवून पण आता नाही. माझी पहिली इनिंग मी तुमच्या सोबत तुमच्या आवडीनुसार जगले पण आता माझ्या आयुष्यातील दुसरी इनिंग मी माझ्या आवडीनुसार जगणार आहे. माझी राहिलेली स्वप्ने पूर्ण करणार आहे.”
“अग पण त्यासाठी मैत्रिणी कशाला हव्या आहेत? माझ्या सोबत तू तुझी स्वप्न पूर्ण करु शकतेस की. तू मैत्रिणींसोबत गोव्याला गेलीस तर मी तुझ्याशिवाय एकटा नाही राहू शकत ग.”
“अहो आठ दिवसांचा तर प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पंधरा, पंधरा दिवस फिरायला जाता तेव्हा मी राहते ना एकटी. आता तुम्ही राहून बघा आणि प्रशांत मी लग्नाच्या आधी एकटी सगळीकडे प्रवास करायची पण सासरी आल्यावर तुझे आजीआजोबा, बाबा आणि तू माझे विश्व होता. तुमच्या आवडीनिवडी माझ्या झाल्या. त्यामध्ये मी एवढी गुंतले व रमले की माझे स्वतःचे विश्व, आवडीनिवडी आहेत हेच विसरुन गेले.”
“अनिता तू आणि प्रशांत अचानक ऑफिसमधून आल्यावर मला सांगता आम्ही मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला जाणार आहोत. तुम्ही पिंकीला सांभाळा. तेव्हा कधी माझा विचार करता का? नाही कारण त्याची गरजच नसते. आई काय घरीच असते. तिला कुठे जायचे असते? हे सगळ बोलून मधुरा आपल्या रुममध्ये गेली. सागर तिच्या पाठोपाठ खोलीत गेला आणि डोळे मिटुन कॉटवर झोपला.”
मधुरा सागरला म्हणाली, “एवढ काही चिडायला नको आहे आणि ह्यावेळी तुम्ही माझ्याशी अबोला धरला तरी मी माझा निर्णय बदलणार नाही आहे.”
“नाही ग मधुरा मी नाही चिडलो तुझ्यावर आणि अबोला पण नाही धरणार तुझ्यावर. खरचं मी आपली पहिली इनिंग माझ्या मर्जीने जगलो. माझ्या इच्छेनुसार तुला जगायला भाग पाडले. तुला पण काही इच्छा, आवडीनिवडी असतील ह्याचा कधी विचारच केला नाही. मला माफ कर पण तू मला सोडून गोव्याला जाणार हे ऐकून मी अस्वस्थ झालो आहे. तुझ्याशिवाय मी कस राहणार ह्याचा विचार करतो आहे पण आता तू मैत्रिणींसोबत गोव्याला जायचा निर्णय घेतला आहेस ना तर तू जा. मजा कर. आता ह्यापुढे तुझी सेकंड इनिंग तू तुझ्या आवडीनुसार जग. मी आहे तुझ्यासोबत.”
हे ऐकून मधुरा हसत सागरला म्हणाली, “धन्यवाद मंडळ तुमचे आभारी आहे.”