" फ्रेंड्स.... " असे म्हणून अद्वैत ने आपला हात तिच्यासमोर पकडला,
" फ्रेंड्स" असे म्हणून सुहानी ने पण हसूनच त्याच्या हातात हात मिळवला...... इथून त्या दोघांची मैत्री सुरू झाली.....ही मैत्री दिवसेंदिवस जास्तच दृढ होत गेली..... त्यांची मैत्री ही त्यांच्या पूर्ण शाळेमध्ये प्रसिद्ध झाली होती...........
अद्वैत एका श्रीमंत घरातला मुलगा होता त्यामुळे तो पाहिजे तसा राहू शकत होता, परंतु सुहानी मात्र एका साधारण घरातली मुलगी होती......... तिच्या घरी फक्त तिचे वडील होते....... तिला आई नसल्यामुळे तिचे वडीलही नावापुरताच तिचा सांभाळ करत होते............
********************
पाच वर्षानंतर.. . . ..
अद्वैत त्याच्या बारावीच्या परीक्षेमध्ये पूर्ण जिल्ह्यातून पहिला आला होता..... त्याच्या घरचे खूप खुश होते ......श्रीमंत घराणं असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याचं पुढचं शिक्षण बाहेरगावी करण्याचा निर्णय घेतला होता....... अद्वैत मध्ये पण पुढे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असल्यामुळे तोही या निर्णयासाठी तयार झाला होता......... हो पण त्याच्या मैत्रिणीसाठी त्याला थोडे वाईट वाटत होते....... तिला सोडून आपल्याला दूर जावे लागेल, हा विचार येताच त्याच्या मनात अनामिक दुःख निर्माण होऊ लागले........
पुढच्या काही दिवसात सुहानीचा ही दहावीचा रिझल्ट लागला......... ती पण चांगल्या मार्काने पास झाली होती....... अद्वैत तिचा रिझल्ट बघण्यासाठी तिच्या सोबतच गेला होता...... त्यानंतर तिच्या कॉलेजच्या ॲडमिशन ही सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आणि त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या ओळखीच्या शिक्षकांना सांगून तिचे ऍडमिशन करून घेतले...........
" या कॉलेजमध्ये तुझे ॲडमिशन झाले आहे .....आता इकडे तुझे पुढचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण करू शकते......मन लावून अभ्यास कर, तुला काही त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली आहे ......तरी माझा चांगला मित्र आहे प्रदीप, मी त्याचा नंबर तुला देतो, तू पण तर त्याला ओळखतेस ,तू त्याला फोन करून बोलू शकते..... " अद्वैत काळजीच्या सुरात बोलतो,
" तू पण या कॉलेजमध्ये असताना मला प्रदीप सोबत बोलायची काय गरज , मला जेव्हा पण काही गरज वाटेल मी तुलाच येऊन सांगेल ना....... " सुहानी त्याच्याकडे बघून हसतच बोलते........
" सुहानी तुला काहीतरी सांगायचं होतं? " बोलताना अद्वैतची जीभ जड होत असते, काय बोलावं ,ती कशी रिऍक्ट करेल ?हे सगळं समजून त्याला टेन्शन आलेले असते,
" काय झालं अद्वैत ?तुझा चेहरा असा का झाला आहे? " त्याच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव बघून सुहानी ला पण टेन्शन येते,
" मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी U.S ला जात आहे... " अद्वैत एका दमात बोलून श्वास मोकळा सोडतो,
सुहानी त्याचे बोलणे ऐकून आधी थोडी उदास होते परंतु नंतर त्याचा विचार करून आनंदाने त्याला बोलते,
" अद्वैत मला तर आजपर्यंत असे वाटत होते की, मी तुझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे....... " सुहानी नाराजीच्या स्वरात त्याच्याकडे बघून बोलते.......
" सुहानी तू अशी का बोलत आहेस ? " अद्वैत प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघून तिला विचारतो.......
" अरे मग एवढी आनंदाची गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस, मला सांगितले पण नाहीस...... " सुहानी त्याच्याकडे बघून मस्करीच्या स्वरात बोलते.......
" सॉरी सुहानी मलाही गोष्ट सगळ्यात आधी तुला सांगायची होती, पण मनामधून भीती वाटत होती की, तू हे ऐकल्यावर कशी रिऍक्ट करशील....... " अद्वैत पण आता रिलॅक्स होऊन बोलू लागतो.......
" अरे तुझी एवढी चांगली प्रगती होत आहे , हे ऐकल्यावर मला आनंद होणार आहे ना....... " सुहानी हसून त्याच्याकडे बघून बोलते....... खरंतर लहानपणापासूनच दोघांना एकमेकांची सवय झालेली असते ,परंतु त्याच्या भविष्यासाठी तिला स्वतःच्या चेहऱ्यावर आनंद ठेवणे गरजेचे वाटते.. . ...
असेच दिवस निघून जातात, अद्वैत ला एअरपोर्टवर सोडायला त्याच्या पेरेंट सोबत सुहानी , प्रदीप पण गेलेले असतात.....अद्वैत यूएस ला जातो.....तिथे त्याचे पुढचे शिक्षण चालू होते......सुहानी पण इकडे रेगुलर कॉलेजला जात असते....... जसा वेळ मिळेल तसे ते एकमेकांना कम्प्युटरवर मेल पाठवत असतात........ सुहानी आपल्या दिवसभरात झालेल्या सगळ्या गोष्टी त्याला रात्री मेसेज वर लिहून पाठवायची ........अद्वैत पण त्याला जसा वेळ मिळेल तसे तो मेसेज वाचून तिला रिप्लाय द्यायचा आणि तिकडच्या गोष्टीही सांगायचा ........
यादरम्यान कॉलेजमध्ये सुहानी ला अश्विनी नावाची नवीन फ्रेंड मिळाली......... त्या दोघींचे छान जुळत होते...... त्या दोघी एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतहोत्या ....... अद्वैत चा विषय निघाला की, सुहानी मात्र त्याच्याबद्दल भरभरून बोलायची, कधी कधी तर अश्विनीला पण तिच्या बोलण्यावर शंका येऊ लागली......... शेवटी एक दिवस न राहून अश्विनीने तिला विचारले तेव्हा सुहानीं ने आपल्या मनात असलेले प्रेम तिच्यापुढे व्यक्त केले होते........
***********************
आज अद्वैतला यूएस ला जाऊन पाच वर्षे पूर्ण झाले होते ....... त्याचे शिक्षण ही त्याने चांगल्या पद्धतीने कम्प्लीट केले होते...... तिकडच्या युनिव्हर्सिटी मध्ये पण त्याने स्वतः चें नाव झळकवले होतें....... या काही दिवसात तोही त्याच्या तिकडच्या लाईफ मध्ये इतका बिझी झाला होता की, त्याला सुहानी सोबत बोलण्यासाठी वेळच मिळत नव्हता......... लवकरच अद्वैत इंडियाला परत येणार होता परंतु त्याआधी त्याने त्याच्या तिकडच्या मित्रांसोबत एक मोठी ट्रिप प्लॅन केली होती........ दोन महिने तरी ते सगळे जगभरात फिरणार होते......... त्यानंतरच तो भारतामध्ये परत येणार होता........... या दोन महिन्यात तो फिरण्यामध्ये खूप बिझी झाल्यामुळे त्याचा भारतातील मित्रांसोबत काहीच कॉन्टॅक्ट झाला नव्हता.........
आज तो भारतात आला होता.....घरी जाऊन फ्रेश होऊन त्याने लगेच प्रदीप ला कॉल केला होता..... प्रदीप ने त्याला त्याच्या घरी भेटायला बोलावले.... त्याला सुहानी ला भेटायचे होते पण तिचा काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता....... प्रदीप कडे गेल्यावर आपल्याला तिच्याबद्दल माहिती मिळेल असा विचार करून तो घाई ने प्रदीप ला भेटायला आला.........
प्रदीप आणि अश्विनी कॉलेज पासूनच एकत्र होते...... प्रदीपने तिलाही अद्वैत घरी येण्याचे सांगितले होते..... दोघेही आतुरतेने त्यांच्या घरात अद्वैतची वाट पाहत होते.........
" काय! सुहानी च लग्न झालंय.......कधी आणि मला कशी कोणी खबर दिली नाही? " अद्वैतला तर मोठा धक्काच बसला...
" हो दोन दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले...... आम्ही तुला मेसेज केले होते ,पण तू तुझे मेल ओपन करूनच बघितले नसतील बहुतेक..... " अश्विनी शांतपणे बोलली,
" अरे पण इतकी घाई का होती ..... आता तर कुठे तिचे शिक्षण पूर्ण झाले होते....... अजून तिला पुढे जॉब करायचा होता...... स्वतःसाठी काहीतरी करायचं होते, मग असं अचानक कसे काय लग्न केले? " अद्वैत च मन अस्वस्थ होत होते, त्याला काय बोलावे ते समजत नव्हते.....
" तुला तर माहीतच आहे ना तिचे वडील कसे होते ..... तिची आई गेल्यानंतर त्यांनी आजपर्यंत तिला फक्त एक ओझं म्हणून सांभाळलं होतं....... कसं तरी शिक्षण पूर्ण होताच महिनाभरातच लग्न ठरवून मोकळे ही झाले...... तिला काय हवं आहे हे सुद्धा विचारले नाही? " प्रदीप ने शांतपणे बोलत अद्वैत च्या हातात सुहानीच्या लग्नाचा एक फोटो ठेवला.........
अद्वैत ला अस्वस्थ वाटू लागले तो खुर्चीवर बसतच शांतपणे त्या फोटोकडे पाहू लागला आणि त्या फोटोमधील आपल्या सुहानी ला निहाळू लागला.......... तिचे ते नवरीचे रूप त्याच्या मनात घर करून गेलं........
" सुहानीला हे लग्न करायचे नव्हते .....तिला तुला काहीतरी..... " अश्विनी बोलतच होती की प्रदीप ने तिचा हात दाबला आणि तिला नजरेने नाही असा इशारा केला, त्याचा इशारा समजून अश्विनी शांत झाली......
" काय झालं? " अश्विनी शांत झाली म्हणून अद्वैतने तिच्याकडे बघून तिला विचारले,
" काही नाही रे .... ते पुढे आता तुझा काय प्लान आहे ? ते विचारत होतो आम्ही..... " प्रदीप विषय बदलत बोलला,
सध्या अद्वैतचे मन त्याच्या ताब्यात नव्हते...... त्याला एकदम अस्वस्थ वाटू लागले होते........ कशातच मन लागत नव्हते, त्याचे त्यांच्या बोलण्याकडे ही नीट लक्ष नव्हते ,तो आपल्याच विचारात होता, विचार करताच तो प्रदीप ला बोलला.....
" मी आता निघतो ,नंतर भेटतो तुम्हाला.... "
" अरे थोडा वेळ थांब ना ....... आता तर आला आहेस आणि आता लगेच काय चालला .... " प्रदीप त्याच्या चेहऱ्याला निहारत बोलला,
" एक महत्त्वाचं काम आठवलं....येतो मी नंतर..... " असे म्हणून अद्वैत कोणाचा काहीही न ऐकता सरळ तिकडून निघून गेला.. . . . .
" तू का मला त्याला काही सांगू दिले नाही.... " अद्वैत जाताच अश्विनी रागाने प्रदीप वर गरजली,
" हे बघ शांत हो....ही योग्य वेळ नाही हे सगळं सांगायची... " असे म्हणून प्रदीप अश्विनीला शांत करू लागला आणि तिला धीर देऊ लागला,
अद्वैतने त्याची गाडी प्रदीपच्या घरातून निघून डायरेक्ट एका शांत ठिकाणी फिरवली ...... थोडा वेळ तो त्या शांत ठिकाणी बसून राहिला, कोणाचेही फोन उचलत नव्हता की कोणाला काही बोलत नव्हता.. ... एक टक समोर बघत होता ..... त्याने आपल्या खिशातून सुहानीचा लग्नाचा फोटो काढला आणि तिला निहाळू लागला ,त्याच्या मनात विचार आले,
" माझी मैत्री ही फक्त मैत्री नसून त्यात माझं प्रेम होतं, हे आता मला तुला या लग्नाच्या साडीत बघून समजले आहे...... तू फक्त माझी होती आणि तुझ्यावर फक्त माझाच हक्क असेल असेच माझ्या मनात होते ,परंतु ते तसं नाही आहे आता तू दुसऱ्या कोणाची झाली आहे..... आता तुझ्या सुखातच माझं सुख आहे.... "
*******************
दुसऱ्या दिवसापासून अद्वैतने स्वतःला पूर्णपणे कामांमध्ये झोकून दिले होते..... तो आपल्या वडिलांच्या बिजनेस मध्ये लक्ष घालत होता.......... घरातून जास्त वेळ बाहेर राहणे, वेळेवर न जेवणे, मित्रांना भेटत नसे, त्याने स्वतःकडे लक्ष द्यायचे सोडून दिले होते...... घरात त्याच्या लग्नाचा विषय निघत होता, म्हणून तो आऊट ऑफ इंडिया शिफ्ट झाला आणि तिकडून सगळे काम संभाळू लागला........ असेच दिवस निघून जात होते.......
अद्वैतने त्याच्या वडिलांच्या कंपनीतून काम सुरू केले होते ,आज त्यांनी स्वतःच्या चार स्वतंत्र कंपन्या ओपन केल्या इतका तो यशस्वी झाला होता ....... आज त्याची गिनती पूर्ण जगातल्या टॉप बिझनेस मॅन मध्ये होत होती ........ अशातच एक दिवस त्याला प्रदीप चा मेल आला, कधी मेल ओपन करून न पाहणारा त्याने आज सहजच मेल ओपन केला तर त्यात प्रदीपने त्याच्या लग्नाचे इन्विटेशन कार्ड पाठवले होते....... प्रदीप आपला लहानपणीचा आणि चांगला मित्र आहे असे विचार करून त्याने त्याच्या लग्नाला जाण्याचे ठरविले....
प्रदीप च्या लग्नाच्या एक हप्ता आधीच अद्वैत इंडिया मध्ये आला होता आणि आज तो प्रदीप ला भेटायला त्याच्या घरी गेला होता....... तिकडे प्रदीप ,अश्विनी आणि अद्वेत तिघेही बसले होते तिघांचेही इतक्या वर्षाचे बोलणे चालू होते...... त्यांच्या बोलण्यातून प्रदीप आणि अश्विनी ने एकमेकांना प्रपोज केले आणि आता इतक्या वर्षांनी ते दोघे लग्न करत आहे हे त्याला समजले,
" ती पण येणार असेल ना तुमच्या लग्नाला? " अद्वैतने कातरतच विचारले,
" ती.......कोण? " प्रदीप ने न समजून विचारले,
" तुमची मैत्रीण, सुहानी ...... ती पण येणार असेलच ना तुमच्या लग्नाला, तिचा पण संसार एकदम सुखाचा चालू असेल... " अद्वैत्य मनात राग निर्माण होत होता तो त्या रागातच बोलत होता,
सुहानी चे नाव ऐकताच अश्विनी एकदम शांत झाली आणि सुहानी चा विचार करून तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले...... प्रदीप ही तिला धीर देऊ लागला ...... त्या दोघांकडे बघून अद्वैत गोंधळून गेला आणि तो अश्विनी जवळ जाऊन तिला शांत करत बोलू लागला,
" काय झालं? तू अशी का रडत आहेस..... सुहानी ठीक आहे ना..? "
" सुहानी ठीक आहे रे ....पण जसा तू विचार करतो तसं तिच्या नशिबात काहीही लिहिलेले नव्हते बिचारी..... " असे म्हणून अश्विनी अजूनच रडू लागली,
" अश्विनी तू आधी शांत हो आणि मला नीट सांग काय झालं ते...... हे बघ मला खूप बेचैन होतं, तू सांग आधी सुहानी कशी आहे.. " अद्वैत
" लग्न झाल्यावर नव्याची नऊलाई तेवढेच काय तिने चांगले दिवस बघितले . .... तिचा नवरा एक नंबरचा निर्दयी निघाला.... तिच्यावर खूप जाच करत होता....... तिला मारहाण करत होता ,घरातली नोकरांनी बनवून ठेवलं होतं , ती सगळं सहन करत होती, परंतु त्याला काहीच वाटत नव्हतं ,तिला कोणाला जास्त भेटूही देत नव्हता ....... तिचे माहेरचे असे कोणी नाही विचारणारे याचाच फायदा त्यांनी घेतला होता....... दोन वर्ष तिने सगळा त्रास सहन केला ..... ती फक्त आम्हालाच भेटायला तेवढी येत होती, पण तेही त्याला खूपत होतं .... एक दिवस ती माझ्या घरी आली होती, तर प्रदीप च्या नावाने पण त्याने शक घेतला...... तेव्हापासून तिने माझ्या घरी यायचं पण सोडून दिले..... मीच कधीतरी तिला भेटायला जायचे ,ती प्रेग्नेंट राहिली होती, तिला वाटलं होतं की आता तरी तो सुधारेल पण कशातच काय नाही एके रात्री तो नराधम तिच्यावर जबरदस्ती करत होता, तिला आधीच प्रेग्नेंसीचा त्रास होत होता ,तरीपण त्याने त्या गोष्टीला इग्नोर केले आणि त्याचा धक्का लागून ती बेड वरून खाली पडली त्यात तिच बाळ गेले.... " एवढ् सगळं बोलून अश्विनी प्रदीप च्या कुशीत शिरून रडू लागली....
अद्वैत तर हे सगळं ऐकून एकदम सुन्न झाला होता...... त्याचं रक्त उसळू लागलं होतं...... सुहानी ने एवढं सगळं सहन केलं आणि आपण तिकडे नव्हतो, याचा त्याला खूप वाईट वाटू लागले..... . त्याला स्वतःचाच राग येऊ लागला होता.....
" आता ती कशी आहे.... " अद्वैत
" आता ठीक आहे ती, सावरला आहे तिने स्वतःला..... एक आश्रमात राहत आहे ,आम्ही जातो तिकडे तिला भेटायला अधून मधून, तिकडच्या मुलांना शिकवून ती तीचा निर्वाह करत आहे... " प्रदीप ने शांत आवाजात सांगितले,
ते ऐकून मात्र अद्वैतच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव आले, तो प्रश्नार्थी नजरेने दोघांना बघू लागला..
" आश्रम मध्ये का? "
" एक दिवस तिचा नवरा त्याच्या कलिगला घरी घेऊन आला होता आणि तिच्याबरोबर लग्न करणार असे सांगितले होते........ त्यांनी सुहानी कडून जबरदस्ती डायवर्स पेपर वर सही करून घेतली आणि तिला घरातून बाहेर काढले ..... त्या रात्री ती रडत रडत आमच्या घरी आली होती.... आम्ही तिला इथेच ठेवून घेतले होते ,परंतु लोक काय विचार करतील ,याचा विचार करून तिला इथे जास्त दिवस राहायचे नव्हते, म्हणून तिने स्वतःसाठी त्या आश्रमात राहायची सोय केली.... " अश्विनी कळवळून अद्वैतला सगळं सांगत होती,
सगळ्यांच्या भावना उफाळून आल्या होत्या... कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं.....कोणाकडे बोलायला काही शब्दच नव्हतं..
दुसऱ्या दिवसापासून प्रदीपच्या लग्नाचे फंक्शन चालू होणार होते.... त्या दिवशी सकाळी सुहानी प्रदीपच्या घरी आली...... तिला बघून अद्वैत्य च्या मनात कालवा कालव होऊ लागले...... तिचा तो निस्तेज चेहरा त्याच्या काळजात अनेक वार करत होता..... त्याला तिला काय बोलावे तेच समजत नव्हते ,तिचे जसे त्याच्याकडे लक्ष गेले, तिचाही इतक्या दिवसाचा मनात साठवून ठेवलेल्या सगळ्या भावनांचा उद्रेक होऊ लागला..... परंतु तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि शांतपणे त्याच्याशी बोलू लागली.....
प्रदीप च लग्न होईपर्यंत ते चौघेही एकत्रच होते, चौघही पूर्वीसारखे वागत होते ..... अद्वैत तिला जसा पहिला प्रोटेक्ट करत होता तसेच सेम तिच्याशी वागत होता....ते पाहून तिचं मन ही थोडं थोडं फुलू लागले होते .... असे सगळे चालू असताना, लग्नाच्या आदल्या रात्री ते चौघे बसले होते,
" मला काही कन्फेस करायचं आहे गाईज.... " अद्वैत अचानक बोलून गेला, त्याचं बोलणं ऐकून तिघांनी त्याच्या दिशेला पाहिले,
" काय" प्रदीप ने विचारले परंतु अश्विनी आणि सुहानीच्या नजरेत ही हाच प्रश्न होता ,हे अद्वैत ने जाणून घेतले...
" सुहानी I love you....... " अद्वैत असे बोलून सुहानी कडे बघतो ,सुहानी काही बोलणार तर तो हातानेच तिला थांबवतो आणि पुढे बोलू लागतो,
" हे बघ तू शांत हो ,आधी माझं पूर्ण ऐकून घे.....तू असा विचार तर अजिबात करू नको की तुझी आजची परिस्थिती बघून मी असे काही बोलत असेल, कारण माझे प्रेम तर मला पाच वर्षांपूर्वीच समजले होते, जेव्हा मी तुझा लग्नाचा फोटो माझ्या हातात घेतला होता तेव्हाच माझी भावना मैत्री पलीकडे आहे आणि ती फक्त मैत्री नसून माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहित झाले होते........ परंतु तुझं लग्न झाले, म्हणून मी तुला भेटलो नाही ,मला तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे काही प्रॉब्लेम क्रिएट करायचा नव्हता ,पण त्याच क्षणापासून मी मैत्री करणे, स्वतःसाठी जगणं, जणू सोडूनच दिले होते आणि स्वतःला कामात झोकून दिले होते, घरच्यांच्या लग्नासाठी फोर्स होऊ लागला, म्हणून मी आऊट ऑफ इंडिया शिफ्ट झालो...... ते आत्ताच डायरेक्ट आलो ,प्रदीप च्या लग्नासाठी ..... मी तेव्हाच हे ठरवले होते की ,माझ्या मनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये फक्त एकच व्यक्ती असणार आणि ती म्हणजे तू. मी लग्न केले तर तुझ्याशी करणार ,नाही तर मी लग्नच करणार नाही.. . . . " एवढं सगळं बोलून अद्वैत आपला श्वास मोकळा सोडतो ,जणू इतक्या वर्षाच् साठवून ठेवलेल्या गोष्टी त्याने सगळं मनमोकळेपणाने तिच्यासमोर बोलून टाकले होते,
अद्वैत चे सगळे बोलणे ऐकूनही सुहानी तिकडे निर्विकार चेहऱ्याने बसली होती ,जणू आता आपण त्याच्या लायकच नाही असे तिला वाटत होते......
तिची ती शांत नजर बघून अश्विनीच तिला बोलली,
" हे बघ सुहानी, मान्य आहे की तुझ्याबरोबर खूप वाईट झाले पण इथेच आयुष्य संपत तर नाही ना, तू नव्या आयुष्याची सुरुवात करू शकते, ते पण तुझ्या प्रेमासोबत.... "
अश्विनी चे बोलणे ऐकून तर अद्वैत आश्चर्याने तिच्याकडे बघत राहतो,
" अश्विनी खरं बोलत आहे .... सुहानी तुझ्यावर प्रेम करत होती..... याची जाणीव तिला तिच लग्न ठरल्यावर झाली..... मग तिच्या लग्नाच्या वीस दिवसा आधीपासून आम्ही तुला सगळे मेल करून इकडे अर्जंटली बोलून घेत होतो ,कारण तू इथे आला असता तर काहीतरी करून तिचे लग्न अडवल असतेस, कदाचित नशिबात काही वेगळेच लिहिले होते, त्यामुळे तू ते मेल बघितले नाहीस आणि आम्ही तिची काही मदत करू शकलो नाही..... ही गोष्ट अश्विनी तुला त्यादिवशी सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी तिला शांत केले, पण आता असे वाटते तीच माझी खूप मोठी चूक झाली, जर ते तेव्हाच तुला समजले असते, तर आज तुमच्या आयुष्यात आनंद असता.... "
सगळ्यांचे बोलणे ऐकून सुहानीच्या भावना अनावर झाल्या आणि ती पळत जाऊन अद्वैत च्या कुशीत शिरली आणि रडत रडत त्याला बोलू लागली,
" कुठे होतास तू जेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज होती? तू मला लहानपणापासून प्रोटेक्ट करत आलास ,मी पूर्णपणे तुझ्यावर डिपेंड होते आणि जेव्हा मला खरंच गरज होती तेव्हा मात्र तू तिथे नव्हता का .....अद्वैत का ? "
" Sorry सुहानी....... I am really sorry.. But I promise इथून पुढे मी कधीच तुला एकटीला सोडणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ देईल..... " अद्वैत चे मन भरून आले होते ,आज कित्येक वर्षानंतर त्याचे प्रेम त्याला परत मिळाले होते ....
एकता निलेश माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा