सेकंड इनिंग
©® सौ.हेमा पाटील.
"अगं चहा टाकतेयस ना?"
"हो.थांबा जरा."
"मघापासून तीन वेळा तू हेच उत्तर दिले आहेस.एवढी कसल्या कामात गुंतली आहेस?"
"अहो जरा सामान भरत होते. शेतात निघालेय ना? ठेवला बघा चहा".
"आता आज परत काय आहे शेतात? काल उरकले ना सगळे?"
"कामे उरकली, पण झाडांना खत घालायचे राहिलेय."
"ते दामू घालेल की! त्याला तेवढ्यासाठीच ठेवलेय ना?"
"तो घालेलच.पण मलाही गेले पाहिजे.मागच्यावेळी खतात निंबोळी पेंड मिक्स करायला तो विसरला होता."
असे म्हणत सविताताई चहाचे दोन कप घेऊन विलासरावांच्या जवळ आल्या.त्यांच्या हातात एक कप देऊन दुसरा कप टीपाॅयवर ठेवत त्या शेजारी बसल्या.
"काय ही मागे कामे लावून घेतली आहेस? आता साठी आली. निवांतपणे रहायचे. या वयात झाडांची निगा घेणे किती अवघड आहे! आणि आता जी झाडे लावली आहेत त्यांचे आंबे खायला आपण हयात असू का हा पण प्रश्नच आहे."

"पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे,
झाडे आजोबांनी लावायची, फळे नातू खाणार..त्यांनी असा विचार केला असता आणि झाडे लावली नसती तर आपण आंबे खाऊ शकलो असतो का?"असे सविताताई म्हणाल्या.
"अगं पण आता हे वय आहे का दगदग करण्याचे?"
"अभी तो मैं जवां हूं | "
"बोलणे सोपे असते गं."
"तुम्हाला आठवते, आपले लग्न झाले तेव्हा मी तुमच्या किती मागे लागले होते की आपण जागा घेऊन घर बांधूया.पण तुम्ही ऐकलेच नाही.माझी खूप इच्छा होती की, घराभोवती खूप झाडे लावायची."
"आपण दोघेही नोकरी करणारे...सुरक्षेच्या दृष्टीने सोसायटीत फ्लॅट असणेच योग्य होते.आणि तेव्हा तुला वेळ कुठे मिळायचा?"
"आवड असली की सवड आपोआप काढता येते.असो.आता आपण रिटायर्ड झाल्यावर गावाकडच्या घरी रहायला जायचे हा निर्णय तर तुम्हीच घेतला होता ना?"
"हो.मीच घेतला होता.आयुष्यभर शहरातील धकाधकीच्या आयुष्याला कंटाळलो होतो.म्हणून निवांतपणे गावी रहायचे असे ठरवले होते."

"मग मी नकार दिला का त्यासाठी? मी ही तुमच्यासोबत आले ना? मग आता इथे आपल्या शेतात झाडे लावून मी माझी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण केली तर बिघडले कुठे? मला फळे खायला मिळावीत अशी माझी बिलकुल इच्छा नाही.पण तुम्हाला सांगू, मी जेव्हा शेतात जाते ना तेव्हा त्या झाडांना फार आनंद होतो.ती आपल्या फांद्या हलवून आपला आनंद व्यक्त करतात. त्या झाडांशी गुजगोष्टी करण्यात माझाही वेळ छान जातो. आणि मुले जेव्हा इकडे येतात तेव्हा ती सुद्धा किती आनंदी असतात! झाडांची वाढ किती झाली आहे,कुठले झाड आजारले आहे याकडे लेकाचे किती लक्ष असते! मुलांवर आपणच संस्कार करायचे असतात.आपण गोडी लावली तर ती इकडे वळतील.अर्थातच जन्मापासून शहरात राहिल्याने शेती करणे त्यांना जमणार नाही,पण झाडांची निगा ते घेऊ शकतात.याओढीने ते आपल्या माघारीही गावी चक्कर मारतील. हा भविष्याचा विचार माझ्या डोक्यात आहे.गावाशी नाळ जोडलेली असावी."
" बरोबर आहे तुझे. पण म्हातारपणी निवांत रहावे.उभे आयुष्य सर्वांसाठी वेचले.आता स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.मुलांचा किती विचार करायचा? टिव्ही पहावा.सिनेमा पहावा.विश्रांती घ्यावी.समवयस्कांशी गप्पा माराव्या.माझ्यासोबत उगी रहावे. तर हे व्याप कशासाठी मागे लावून घेतेयस?"

"तुमच्यासोबत तर कायमच आहे मी. फक्त काही तासांसाठी झाडांना वेळ देते.तोही रोज नाही. तुमची गावी रहाण्याची इच्छा पूर्ण झाली आहे ना? पारावर बसून इतरांशी गप्पा मारताना तुमचा चेहरा आनंदाने फुललेला असतो.तसेच मला झाडांच्या सानिध्यात आनंद मिळतो.आपली जोडी कायमच एकत्र असते व रहाणार! जिथे तुम्ही तिथेच मी ! पण आपली ही सेकंड इनिंग आपण आपापली आवड जपत जर खेळलो तर अधिकच आनंददायी होईल.ते आजची मुले म्हणतात ना, मला स्पेस हवी. तसे मी मागणे मागतेय,दिवसाचा काही वेळ झाडांसोबत घालवायला मला आनंदाने परवानगी द्या.त्यावेळात तुम्ही गावातील वाचनालयात जाऊन तुमचे वाचायचे राहिलेले साहित्य वाचू शकता.मला माहीत आहे,आपले लग्न झाले तेव्हा तुम्ही दररोज वाचनालयातून पुस्तक बदलून आणायचात.ती तुमची आवड जपा."
"खरंच! वाचन मागे पडले ते पडलेच! पण आता तू सुचवलेस हे छान केलेस.आता वेळ आहे तर आपले छंद जोपासायला हवेत.मला चित्रे काढायला पण खूप आवडायचे.आता पुन्हा प्रयत्न करेन."
"बघा बरं ! उगाचच गाड्याबरोबर नळ्याची यात्रा ! तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा.मला आवडेल ते मी करते.आणि दुपारपासून तर आपण एकत्रच असतो की! तेव्हा पत्ते, बुद्धिबळ खेळत जाऊ.म्हणजे मेंदूवर गंज चढणार नाही.आणि अगदीच गरज लागली तर दोघांकडेही मोबाईल आहेत.शेत तर चालत पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे.दामूकडे स्कुटी आहेच! गडबडीच्या वेळी तो शेतातून घरी सोडू शकतो."
"खरंच गं! जा.आजपासून तुला तुझी स्पेस दिली. तुझी आवड जप तू, पण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन.बोल आहे कबूल?"
"कबूल कबूल त्रिवार कबूल!"
यावर हसतच सविताताईंनी चहाचे कप उचलले आणि त्या आत गेल्या.बाहेर येताना त्यांच्या हातात पिशवी होती.ती पाहून विलासराव म्हणाले,
"चल, आज मी पण येतो तुझ्यासोबत झाडांशी गुजगोष्टी करायला."
हे ऐकून सविताताई समाधानाने हसल्या.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा