सेकंड इनिंग
संध्याकाळची सहाची वेळ होती. मीनाताई सोसायटीतील गार्डन मधल्या बाकावर एकट्याच बसल्या होत्या. खरंतर आज वातावरण खूप छान होतं. पक्षांचा मस्त किलबिलाट चालू होता, त्या किलबिलटामध्ये गार्डनमध्ये आजूबाजूला खेळणाऱ्या छोट्या मुलांचां किलबिलाट सामील होत होता.गार्डन मध्ये रंगीबेरंगी निरनिराळ्या प्रकारची फुले फुलली होती आणि त्यावर सुंदर सुंदर रंगांची फुलपाखरे मनसोक्त बागडत होती.
सगळे कसे छान वातावरण होते.तिथे येऊन कोणी उदास राहू शकत नव्हते पण तरीही या वातावरणात मीनाताई मात्र उदास , एकटक शून्यात नजर लावून बसल्या होत्या. त्यांना पक्षांचा आणि मुलांचा आवाज येत नव्हता तर त्यांच्या कानात घुमत होता आपल्या सुनेचा आवाज,
" समीर, तुझ्या आईला तोंड बंद ठेवायला सांग."
त्यांना तिथे असलेले सुदंर फुलं आणि फुलपाखरू दिसत नव्हते तर त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहत होता तो प्रसंग ज्यावेळी त्यांची सून सुचित्रा त्यांना अद्वातद्वा बोलत होती.
मीनाताई त्यांच्या विचारात एवढ्या गुंग होत्या की, प्रमिला ताई तिथे कधी आल्या हे त्यांना कळलेच नाही.
मीनाताई त्यांच्या विचारात एवढ्या गुंग होत्या की, प्रमिला ताई तिथे कधी आल्या हे त्यांना कळलेच नाही.
प्रमिला ताईंनी त्यांना खांद्यावर हात ठेवून विचारले,
" काय कुठल्या विचारात आहात."
त्यावेळी त्या भानावर आल्या आणि म्हणाल्या,
" अरे प्रमिलाताई तुम्ही कधी आल्या,माझ्या लक्षातच आले नाही."
"तेच म्हणाले मी, अशा कोणत्या विचारात आहात की, माझा आवाज ही ऐकू आला नाही."
"काही नाही....नेहमीचेच! तुम्ही सांगा कशा आहात.बऱ्याच दिवसांनी भेटलो आहोत आपण."
" हो....आठ दिवसांसाठी माया कडे गेले होते.
( माया प्रमिला ताईंची मुलगी. )
( माया प्रमिला ताईंची मुलगी. )
" अरे वा ! लेकीच्या घरचा पाहुणचार घेऊन आलात."
" हो! खूप आग्रह होता तिचा ...म्हणून गेले होते. तीन चार दिवसांपूर्वी आले.तुम्ही पण नव्हत्या इथे."
"समीर कडे गेलो होता. मोनू चा वाढदिवस होता."
"अगबाई! एक वर्षाचा झाला बाळ.काय दिवस पट पट जातात."
मीना ताई आणि प्रमिला ताईंच्या गप्पा रंगल्या.
मीना ताईंना दोन मुलं.
एक मोठी मुलगी आणि लहान मुलगा.
मोठ्या मुलीचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले होते तर लहान मुलगा समीरचे लग्न होऊन दोन वर्ष उलटले होते.समीर आणि त्याची बायको सुचित्रा दोघेही नोकरीनिमित्त मुंबईमध्ये राहत होते तर मीनाताई आणि त्यांचे मिस्टर
सुधीर पुण्यात.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर प्रमिला ताईंनी विचारले,
"काय झालंय उदास दिसताय."

प्रमिलाताई आणि मीनाताईंची घट्ट मैत्री होती. एकमेकींचे सुखदुःख त्या नेहमी एकमेकींना सांगत.
प्रमिला ताईंनी असं विचारलं बरोबर मीना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
प्रमिला ताईंनी असं विचारलं बरोबर मीना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
मीनाताई म्हणाल्या,
"काही नाही नेहमीचेच.नवीन आहे मुलगी, सगळ्या गोष्टी कळत नाही. आपल्याला अनुभव आहे म्हणून सांगायला जातो आणि स्वतःचा आता अपमान करून घेतो.
सुचित्राने,मशीन मध्ये कपडे लावले पावडर टाकली आणि ती लगेच जागेवर ठेवायची तर तिथेच ठेवली. म्हणून मी फक्त तिला म्हटले की लगेच जागेवर वस्तू ठेवून दिल्या म्हणजे जास्त काम वाढत नाही. तर एवढ्याशाचा पण तिला राग आला. वाटेल तसं बोलली मला. मुलगाही तसाच. आम्हालाच म्हणतो एक दोन दिवस येतात तरी शांत राहत नाही. आता तुम्हीच सांगा असं काय केलं मी."
यावर प्रमिलाताई म्हणाल्या,

"मीनाताई तुम्हाला एक सांगू का? हे आता घरोघरी ऐकायला मिळते. प्रत्येकाचे स्वभाव असतात.तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि भेटायला गेल्या ना ते फक्त आपल्या नातवाबरोबर खेळा. त्याच्याबरोबर आपला वेळ घालवा. मी लेकीकडे गेले ना तर तसंच करते."
त्या पुढे म्हणाल्या,
त्या पुढे म्हणाल्या,
"त्या दोघांच्या संसारामध्ये अजिबात लक्ष घालू नका. तुमचं बरोबर आहे,तिला अनुभव नाही. पण तिचं तिला शिकू द्या. काही गोष्टींचा त्रास झाल्यावर आपोआप लक्षात येईल. आपल्याला वाटतं आपला अनुभव सांगावा पण त्यांना जर तो अनुभव नको असेल तर उगाच आपण जीवाचा आटापिटा का करा. त्यामुळे उगाचच आपल्याला त्रास होतो."
"खर आहे तुमच. पण हे वेड मन ऐकतच नाही."
"मनाला आपल्याला आवर घालावा लागेल. भांडण होऊन शेवटी काय होणार. एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होणार. त्यापेक्षा त्यांचा संसार त्यांना करू देत आणि आता आपण आपल्या राहिलेल आयुष्य सुखा समाधानाने जगू. तुम्हाला जिथे वाटेल तिथे फिरा, वाचन करा, अजुन आवडतात त्या गोष्टी करा,ज्या करायला आपल्याला कधीच वेळ मिळाला नाही. मुलांचं टेन्शन घेणे सोडा. पटतंय का मी काय म्हणते ते."
"हो पटतंय."
"मग उद्या सकाळी माझ्याबरोबर चला.मी उद्यापासून योगा करायला जाणार आहे आपल्या सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये."
"हो का? येईल मग मी पण."
मीना ताईंनी आपलं दुःख बाजूला सारलं. मनोमन त्यांनीही आपल्या आयुष्यातील सेकंड इनिंग कोणतेही टेन्शन न घेता आनंदाने जगायचं ठरवलं.
समाप्त
सुजाता इथापे
समाप्त
सुजाता इथापे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा