रोहन प्लीज आज रात्री ११ वाजता माझ्याबरोबर एअरपोर्ट वर येशील का ?
वीक एंड च्या मूड मधे घरात शिरणाऱ्या नवऱ्याला शर्वरीने विचारले.
वीक एंड च्या मूड मधे घरात शिरणाऱ्या नवऱ्याला शर्वरीने विचारले.
काय गं तू पण ? मोठ्या मुश्किलीने शनिवार रविवार येतो त्यातपण तुझी काम . रोहन वैतागत म्हणाला.
अरे तुला सायली आठवते ? माझी मैत्रीण? आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो . मग पुढे ती शिकायला लंडनला गेली. आज ७ वर्षांनी भारतात परत येत आहे. तिनेच पिकअप करायला येतेस का विचारलं . मग नाही कसं म्हणू मी ?
सायली sss. कॉलेजमधील एक ब्युटी विथ ब्रेन गर्ल. पाहताच क्षणी प्रत्येकाला आवडायची. अर्थात रोहनलाही . पण तो पुढे काही बोलू शकला नाही. फायनल परिक्षेच्या आधीच सायली कॉलेज सोडून गेली नंतर पुढे शर्वरीशी मैत्री झाली आणि दोघांनी ठरवून लग्न केले.
अचानक सायलीचं नाव ऐकून रोहनच्या मनात ७-८ वर्षापूर्वीच्या आठवणी उफाळून आल्या.
अचानक सायलीचं नाव ऐकून रोहनच्या मनात ७-८ वर्षापूर्वीच्या आठवणी उफाळून आल्या.
हो थोडी थोडी आठवत आहे . पण ती लंडनला कधी गेली ? आणि आपण का तिला पिकअप करायला जायचं? तिचा नवरा, आई वडील कुठे आहेत?
रोहनने विचारले.
रोहनने विचारले.
अरे कॉलेजात असताना तिला नातेवाईकांच्या ओळखीवर लंडन युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळाला. तिथेच तिने शिक्षण पूर्ण करून काही काळ नोकरी केली. आता कायमची भारतात येत आहे . नेमकी रात्रीच तिची फ्लाईट लॅन्ड होत आहे आणि आपलं घर एअरपोर्ट पासून अर्ध्या तासांवरच आहे . म्हणून आजची रात्र आपल्याकडे थांबून उद्या ती घरी जाईल. आणि हो तीच लग्न नाही झालं अजून.
हे वाक्य ऐकून रोहनला उगाचंच आनंद झाला. शेवटी आढेवेते घेत त्याने होकार दिला.
नियोजित वेळेत ब्रिटिश एअरवेजचे भारताच्या धरतीवर आगमन झाले आणि रोहन समोरून येणाऱ्या सायलीला पाहतच राहिला.
अगोदरच सुंदर दिसणारी सायली आता हॉट बेब दिसत होती. लाल रंगाचा गुढघ्यापर्यंतचा फ्रॉक, नेहमीच्या स्टाईलमध्ये केसांत अडकवलेला गॉगल, खांद्याला गोल्डन पर्स, पायात हिल्स, एका हातात ट्रॉली तर दुसरे हात चेहऱ्यावर कोसळणारे केस सावरण्यात.
वय वाढले तसे अधिकच तिचे सौंदर्य खुलून आले. रोहन तर पुरता घायाळ झाला होता.
शेवटी भानावर आला तेव्हा शर्वरी आणि सायलीचं गळाभेट घेऊन झालं होतं.

हाय रोहन ..कसा आहेस ? ओळखलं ना मला? चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल देत सायली ने हात पुढे केला. तिच्या स्पर्शाने रोहनच्या अंगातून वीज सळसळली.
म्हणजे काय तुला कसं विसरेल मी ? - रोहन
तू तर आधीपेक्षा पण फार स्मार्ट आणि हँडसम दिसत आहेस ..शर्वरी खूप लकी आहे हा.
सायलीच्या बोलण्याने रोहन खुश झाला. पूर्ण प्रवासात आणि मग घरी पोचल्यावरदेखील दोन्ही मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या. रोहन आपले लक्ष नाही असं दाखवत होता पण प्रत्यक्षात मात्र त्याचे कान सायलीच्या बोलण्याकडे होते.
मधूनच तो तिला न्याहाळत होता. एका बेसावध क्षणी दोघांची नजरानजर झाली मग मात्र त्याने दुर्लक्ष केले आणि झोपायला निघून गेला.

दुसऱ्या दिवशी दुपारी सायली घरी निघून गेली. तशी शर्वरी रोहन जवळ आली आणि त्याला थँक यू म्हणाली.
इतक्या तासांनी आज रोहनला पहिल्यांदाच शर्वरीची जाणीव झाली. तसा तो ओशाळला. मनातच बडबडू लागला . काय करत आहेस रोहन तू ? कोण कुठली सायली. ? नावाखेरीज काय माहित होतं तिच्याबद्दल ? कॉलेज मध्ये तिला फ्लर्ट म्हणून ओळखायचे आणि तिच्यासाठी आपल्या बायकोचा शर्वरीचा विसर पडला.
रोहनला स्वतःच्या विचाराची लाज वाटली. मग त्याने सायलीला मनातून दूर केले आणि शर्वरीला जवळ घेऊन झोपी गेला.

नवीन आठवडा सुरु झाला त्याबरोबर सायलीचे विचारही त्याच्या मनातून निघून गेले.
रविवार दुपारी शर्वरी तिच्या बहिणीच्या डोहाळजेवणासाठी जाणार होती. इतक्यात डोअरबेल वाजली.
सरप्राईस sss असे ओरडत सायली आत शिरली.
हे बघं दुपारच्या मुव्हीची २ तिकिटं. मस्त thriller movie आहे आपण दोघी जाऊयात.
सरप्राईस sss असे ओरडत सायली आत शिरली.
हे बघं दुपारच्या मुव्हीची २ तिकिटं. मस्त thriller movie आहे आपण दोघी जाऊयात.
अगं पण आधी विचारायचं तरी . माझ्या बहिणीचं डोहाळजेवण आहे आणि मला जावं लागेलच. शर्वरीने काळजीने म्हणाली.
जाऊदे मग तिकिटं वाया गेली म्हणायची. सायली उदास होत म्हणाली.
वाया का जातील ? तू आणि रोहन जा ना . तसंही तो मला सोडायला येणार होता फक्तं . डोहाळजेवणासाठी त्याच काय काम ?
शर्वरीच्या अनपेक्षित उत्तराने रोहन खुश झाला.
शर्वरीच्या अनपेक्षित उत्तराने रोहन खुश झाला.
आणि हो येताना बाहेरच खाऊन या. मी घरी काही केलं नाहीये. दरवाजा लॉक करताना शर्वरीने सूचना दिली.
रोहनसाठी मात्र हा दुसरा धक्का होता.
रोहनसाठी मात्र हा दुसरा धक्का होता.
मुव्ही संपल्यानंतर रोहन आणि सायली कॉफी शॉप मध्ये गेले आणि मग खऱ्या अर्थाने संवादाला सुरुवात झाली.
सायली अजून लग्न केलं नाहीस तू ? नाही म्हणजे कॉलेज मधे भरपूर मुलं तुझ्या मागे होती. एकालाही हो बोलली नाहीस का ? कॉफीचा घोट घेत रोहनने विचारले.
हो ना कितीतरी जण माझ्या मागे होते . अगदी तू सुद्धा ..हो ना ? - सायली
ए चल असलं काहीही नव्हतं हा. असे कितीसे भेटलो बोललो आपण ? - रोहन
सायली पुन्हा एकदा जोर देत म्हणाली, खरं सांग रोहन तुला मी आवडत होते ना ? शर्वरीला नाही सांगणार मी यातलं काही.
पण रोहन आपल्या उत्तरावर ठाम राहिला.
यावेळी रोहनने तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहिली होती जी काही क्षणासाठी आली आणि परत निघून गेली.
मग मात्र दोघांनी भरपूर गप्पा मारल्या .
रोहनने सायलीला त्याच्या कारने ड्रॉप केले.
खूप मस्त संध्याकाळ गेली होती त्याची.
घरी आला तेव्हा नुकतंच शर्वरी आलीं होती. येताच तिच्या नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या.

आज पहिल्यांदाच त्याला ही शर्वरीची बडबड नकोशी झाली. त्याचं मन नकळत दोघींची तुलना करू लागलं आणि यावेळी त्याच झुकतं माप सायलीकडे होतं.
इतक्यात त्याची मेसेज टोन वाजली.
थॅन्क्स अलोट फॉर वंडरफुल इव्हिनिंग. एन्जॉयेड युअर कंपनी.
सायलीचा मॅसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं मग मोठ्या मुश्किलीने त्याने मेसेज डिलिट केला.
इतक्यात त्याची मेसेज टोन वाजली.
थॅन्क्स अलोट फॉर वंडरफुल इव्हिनिंग. एन्जॉयेड युअर कंपनी.
सायलीचा मॅसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं मग मोठ्या मुश्किलीने त्याने मेसेज डिलिट केला.
दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसला जायला गाडीत बसला तेव्हा सायलीच्या परफ्यूमचा सुगंध अजूनही दरवळत होता. रोहनला आता सायलीच वेड लागलं होतं .
एकीकडे सायलीची ओढ आणि दुसरीकडे शर्वरीची आठवण या मनस्थितीत तो सापडला होता.
एकीकडे सायलीची ओढ आणि दुसरीकडे शर्वरीची आठवण या मनस्थितीत तो सापडला होता.
ऑफिसमध्ये ही त्याच लक्ष लागेना . कसतरी काम संपवून निघणार तेव्हा त्याचा फोन वाजला.
डिस्प्लेवर सायलीचं नाव बघून त्याने फोन पटकन उचलला.
डिस्प्लेवर सायलीचं नाव बघून त्याने फोन पटकन उचलला.
सॉरी रोहन तुला आता फोन करतेय पण काल माझं जरा चुकलंच बघं. तू मला घरापर्यंत सोडायला आला आणि मी तुला साधं आत ये पण म्हटलं नाही. प्लीज येतोस का आता ? कॉफी घेऊया मग जा तू निवांत.
सायलीचा मधाळ आवाज कानी पडला आणि रोहनची बेचैनी संपली. शक्य तितका निरागस आवाज ठेवत त्याने तिला नकार दिला.
जमल्यास मी वीकेंड ला शर्वरीसोबत येईल .
जमल्यास मी वीकेंड ला शर्वरीसोबत येईल .
सायली त्याला समजावत म्हणाली - ते तर तुम्ही यालंच रे. पण बघ ना आज जमतय का ?
भरपूर आढेवढे घेत रोहनने होकार दिला आणि परस्पर शर्वरीला उशीर होणार असल्याचा मेसेज केला.
सायलीला भेटण्याच्या कल्पनेने रोहन खूपच खुश झाला आणि अर्ध्या तासात पोहोचला.
तेव्हा घरी सायलीशिवाय कोणीच नव्हतं.
विचारल्यावर समजलं की आई वडील बाहेर गेले आहेत रात्री उशिराच येणार आहेत.
तेव्हा घरी सायलीशिवाय कोणीच नव्हतं.
विचारल्यावर समजलं की आई वडील बाहेर गेले आहेत रात्री उशिराच येणार आहेत.
घरी फक्त मी आणि सायलीचं. या कल्पनेने रोहनचे हृदय धडधडू लागले.
इतक्यात सायली कॉफी घेऊन आली आणि त्याच्या अगदी शेजारीच बसली.
इतक्यात सायली कॉफी घेऊन आली आणि त्याच्या अगदी शेजारीच बसली.
रोहन खरंतर मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून घरी बोलावलं . मला असं वाटतंय की मी फार मोठी चूक केली आहे. कॉलेज मध्ये एक मुलगा मला फार आवडायचा आणि मला खात्री आहे त्यालाही मी खूप आवडायचे पण त्याने शांत आणि लाजाळू स्वभावामुळे कधी पुढाकार घेतला नाही.
आणि त्या वेळी मला माझ्या सौंदर्याचा फार गर्व होता म्हणून मी काही बोलले नाही.
आता मला पश्र्चाताप होत आहे . सारखं वाटतं की मी तेव्हा का नाही विचारलं. ? तुला माहितीये तो मुलगा कोण होता ?
रोहन - नाही गं सांगता येणार.
यावर सायली एक दीर्घ श्वास घेत म्हणाली , तो तू होतास रोहन . तेव्हाही आणि आताही मला आवडतोस . तुला पाहिलं आणि असं वाटलं का नाही तुला तेव्हाच विचारलं मी ? आता तू माझा कधीच होऊ शकणार नाहीस .

अगं पण तू .... रोहनचे वाक्य अर्धवट राहिलें.
सायलीने आपले बोट त्याच्या ओठावर ठेवले . शुsss काहीही बोलू नकोस. तिने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले आणि शक्य तितक्या जवळ जात म्हणाली, मला सगळं कळतं रोहन आणि तुझी परिस्थिती माहित आहे . तू बोलायची गरज नाही . माझ्यावर विश्वास आहे ना मग मी सांगते तसं कर . प्रश्न विचारु नकोस . मला जोरात ढकल आणि मोठ्याने म्हण हे होऊ शकत नाही.
रोहनला हे काय होतंय समजलेच नाही. एका सेकंदासाठी पुन्हा एकदा सायलीच्या डोळ्यात ती चमक आली. त्याने तिला डोळ्यांच्या नजरेनेच होकार देत दूर ढकललं आणि ओरडला ..
नाही सायली हे नाही होऊ शकत.

त्याबरोबर येस ss येस ss मी जिंकले मी जिंकले असं ओरडत शर्वरी पाठच्या खोलीतून बाहेर आली.
रोहनला मिठी मारत आनंदाने म्हणाली,
अरे या सायलीला ना गर्व होता की ती कोणत्याही विवाहित माणसाला पटवू शकते. मग मीच म्हटलं की बरोबर पण त्यात माझा रोहन बसत नाही. रोहन ला सोडून कोणालाही तू पटवू शकतेस.
कारण मला सोडून तो दुसऱ्या कोणाला भाव देणं शक्यच नाही. तेव्हा हिनेच काल पैज लावली होती आणि तू तिला खोट्यात पाडलं. तू सिद्ध केलंस की तू फक्त माझाच आहेस.
लव्ह यू रोहन.

रोहनला आता काय बोलावे हे कळत नव्हते. मनाशीच तो विचार करू लागला.
थोडक्यात वाचलो नाहीतर या बायकांच्या खेळापायी मेलोच असतो.
तो सायलीचा झाला होता आणि मघाशीचं त्याने तिचे प्रेम स्वीकारले असते पण ऐनवेळी सायली ने त्याच्या ओठावर बोट ठेवलं नसतं तर तो काहीतरी बरळून गेला असता.

जाताना रोहनने सायलीकडे बघितले.
ती त्याच्याकडेच बघत होती. चेहऱ्यावर तेच मिलियन डॉलर स्माईल. हसताना तिने अलगद त्याला डावा डोळा मारला.
शर्वरीसाठी हे सर्व नाटक असेल पण सायलीसाठी नक्कीच नाही.
नाहीतर जिंकण्यासाठी तिने मगाशीच माझ्याकडून वदवून घेतले असते की येस ss.. आय लव्ह हर.. पण तिने तसे केलेच नाही. तिला हे होऊ द्यायचे नव्हते. शर्वरीसाठी ती नक्कीच पैज हरली असेल पण माझ्यासाठी मात्र जिंकली होती.
येस सायली लव्हज् मी. .. शी इज माईन.

समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा