मला नक्की नाही माहित कि भग्वद्गीता खरंच 5000 वर्षांपूर्वी लिहिली गेली आहे कि नाही किंवा कुरुक्षेत्रात आपल्याच आप्तेष्टांना विरुद्ध बाजूला लढायला आलेले पाहून शस्त्र टाकलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन पर स्वयंम श्रीकृष्णाने योगेश्वर रूपात येऊन ऐकवली कि नाही. पण मी हे ठामपणे सांगू शकते कि एका आदर्श व सकारात्मक जीवनशैली साठी गीता ग्रंथ सारखा दुसरा मार्गदर्शक मिळणे नाही.
कारण अगदी विजेचा शोध लागण्या पूर्वीपासून मानव जातीला माहित असलेल्या या ग्रंथातील शिकवण आज चॅट जिपीटिच्या काळातही तितकीच महत्वाची आहे जितकी तेव्हा होती. कित्येक विचारवन्त आले गेले, गीतेवर त्यांनी संशोधन केले. तिचा महिमा अजूनही थोर आहे. अजूनही ती अद्भुत आहे बरेच नावीन्य तिच्यात दडलेले आहे. म्हणूनच आजही कित्येक तत्वज्ञ या ग्रंथावर संशोधन करतांना थकत नाहीत. संत ज्ञानेश्वर यांनी सामान्य माणसाला गीता कळून येण्यासाठी (त्यांच्या काळच्या) मराठी भाषेत गीता सांगितली व तीच पुढे ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाली.
आज बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे कि महाभारत, द्वापर युग, कलियुग हे सगळं फक्त काही विशिष्ट व्यक्तींनी समाजाला मूळ प्रश्नांपासून भरकाटवण्यासाठी व समाजावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी तयार पसरवलेले भ्रम आहेत. असेल तसेही. मात्र यामुळे गीतेचे महत्व अजिबात कमी होत नाही. तिच्यातील ज्ञान तेव्हाही गरजेचे होते आणि आजही गरजेचे आहे.
जगातील वेगवेगळी, मोठ मोठ्या लेखकांची motivational पुस्तकं वाचा त्याचा सार तुम्हाला गीतेतच दिसून येईल. म्हणून वाटतं कि प्रेरणा मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकंती केल्यापेक्षा आपल्याजवळ आहे ते एकदा वाचून तर पाहा. हॊ त्यांचे अनुभव आताच्या तुमच्या पृष्ठभूमीशी परिचित असतील, तुम्हाला साम्य दाखवणारे असतीलच. तरीही इतकेच म्हणेल एक प्रेरणादायी लेखन करणारी लेखिका म्हणून मला वाटतं कि संस्कृत गीता वाचने ना शक्य आहे त्यांनी गीता सार तरी वाचायला हवा.
सरते शेवटी गीतेतील माझा सर्वात आवडता श्लोक :
कर्मन्येवाधिकारस्ते मा फले्षु कदाचन |
मा कर्मफलहेतु्रभुर्मा ते संगोS स्त्वकर्मणि ||
मा कर्मफलहेतु्रभुर्मा ते संगोS स्त्वकर्मणि ||
अर्थ - तु तुझे कर्म कर मात्र फळाची आशा न ठेवता.
कोणी म्हणेल, असे कसे चालेल? कष्ट घ्यायचे अन फळाची आशा करायची नाही हे विचित्र नाही का?
इथे फळाची आशा म्हणजे आसक्ती दर्शवते. काही माणसं फळ मिळवण्यासाठी इतकी आसक्त झाली असतात कि आपण काय कर्म करतोय याकडेही त्यांचे लक्ष नसते. त्यांना भलं बुरं काहीच कळत नाही. त्यांना फक्त त्यांचा फायदा हवा असतो.
दुसरं उदाहरण आपण एका उत्तम क्रिकेट खेळाडूचे घेऊ. तो त्याच्या येणाऱ्या क्रिकेट मॅचचे इतकं टेन्शन घेतो कि त्याची सर्व शक्ती त्यातच नष्ट होते. परिणामी तो खेळात व्यवस्थित प्रदर्शन करू शकत नाही.
काही आई वडील चांगल्या मार्कसाठी मुलांना दबावाखाली आणतात. मुलाला माहित असतं कि पेपर चांगला गेला नाही, अनुषंगाने मार्क चांगले मिळणार नाहीत. तो आत्महत्येचा मार्ग निवडतो.
फळाच्या आशेपायी माणूस वेडा होतो. आपलं हित अहित कशाचीच जाणीव त्याला राहत नाही म्हणून इथे म्हटलं आहे कि फळाची आसक्ती नको. असा बोध या श्लोकातून मी घेतला आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा