सीता....

About Seeta
*सीता*
आकाश हळहळले आज
आर्त तिची ऐकून..
थरथरली पाने फुले सारी
तिची अगतिकता पाहून...

खोल मनातल्या यातना तिच्या
तिने आजच व्यक्त केल्या..
कुणास ठाऊक किती वर्षे
तिने एकट्याच सोसल्या...

आला आज तिला न्यावयास सोबत
तिचा प्रिय सखा...
पण जणू आठवली
तिने दिलेली ती अग्निपरीक्षा...

स्वतःचे शील जपुनही ज्याने
तिला नाकारले होते...
आज तिला सोबत नेण्यासाठी
त्याने सारे जंग पछाडले होते...

ज्याच्यासाठी दिली अग्नीपरीक्षा
त्यांनीच तिला डावलले होते
आज ते राज्य, तो सखा
आज तिला परके वाटत होते.

तिच्या डोळ्यांतील आसवांचा थेंब
काळ्या मातीत पडला
त्या आसवांची वेदना पाहून
सारा आसमंत हळहळला

पाहून तिची यातना
सारी धरणी दुभंगली
मातीतून आलेली ती
त्या मातीतच सामावली

~ऋचा निलिमा