Login

तिलांजली

स्वार्थी
दुनियादारीत होते
खऱ्याची शिकार
स्वार्थापोटी जडला
खोटेपणाचा विकार

स्वतःचेच बघण्यात
मनुज खपू लागला
चुकीच्या महत्त्वाकांक्षेने
विचित्र वागू वागला

संस्काराला तिलांजली
मोहासाठी दिली गेली
अहंकाराने सर्व नेस्तनाबूत
बहरल्या अतिविश्वासाच्या वेली

कुठेतरी या सगळ्या
गोष्टी रोखायला हव्या
जनहितार्थ विचार करून
सुखपालवी फुटू देऊ नव्या

© विद्या कुंभार
0

🎭 Series Post

View all