जीवन हे ओझं असतं
कळत नाही कसा पेलावा भार
जगण्यातील आनंदाला
ईराचा अनमोल आधार
✍️ईरा
आपले जीवन बालपण ,शिक्षण,नोकरी ,वैवाहिक जीवन , मुलांची जबाबदारी, वार्धक्य अशा विविध टप्प्यात चाललेले असते.या काळात अनेक जबाबदाऱ्या , संघर्ष, संकटांचा सामना करावा लागतो. आनंदाचे कांही क्षण जीवनाला उभारी देतात ;पण खरी जीवनाला कलाटणी मिळते ती आवडीतील छंदातील प्राविण्यामुळे ..! यामध्ये लेखनासारखा छंद मनाला अधिक उल्हासीत करतो. ईराची निर्मिती झाली आणि थकल्या भागल्या जीवाला नवा सहारा मिळाला. अशाच बॕंकेतून सेवानिवृत्त झालेल्या आदरणीय सीमा गंगाधरे या ईरावरील दर्जेदार लेखिका आहेत.
आईवडीलांचे योग्य संस्कार व मार्गदर्शन यामुळे सीमाजी यांचे बालपण सुखद गेले.शीस्त व स्वावलंबनाचे धडे आईवडीलांकडून मिळाल्यामुळे पुढील जीवनाला दिशा मिळाली. शालेय जीवनात वक्तृत्व , मैदानी खेळ यामध्ये त्यांना विशेष रस होता. दहावी , बारावीनंतर वाचनाचा छंद जडला त्यामुळे अनेक लेखकांची पुस्तके वाचली.पार्टटाईम नोकरी करत कॉलेज पुर्ण केले.टंकलेखन व लघूलेखन शिकल्यामुळे नोकरीच्या संधी आल्या. लहाणपणी बॕंकेत नोकरी करण्याची इच्छा होती ती पुर्ण झाली. अनेक बरे वाईट अनुभव आले. बॕंकेत प्रामाणिक सेवा केलेमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली.
बॕंकेत ४० वर्ष विविध ठिकाणी काम केले.सहका-सोबत काम करताना स्वभावांचे विविध पैलू पाहायला मिळाले.रेल्वे प्लॕटफॉर्मवर प्रेमाचे धागे जुळले व त्याचे रुपांतर वैवाहिक जोडीदारात झाले. संसारात एका नव्या कळीच्या आगमनाने आनंद झाला. तिला चांगले शिक्षण दिले.आज ती परदेशात आनंदाने संसारात रमली आहे.
नोकरी करता - करता ४० वर्ष कशी सरली सीमाजींना कळली नाही. रोजची गडबड धावपळ ,प्रवास , सहकार्याबरोबर मारलेल्या गप्पा हे सगळं थांबलं होतं. या सगळ्या सोनेरी आठवणी जगण्याची उमेदा देत होत्या. सेवानिवृत्तीनंतर आत्ता कुटुंब,वाचन व लेखन यांना वेळ देण्याची त्यांची इच्छा पुर्ण झाली. यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली. एरव्ही चौफेर धावणारे त्यांचे मन समाजातील निरिक्षणात रमले व अनेक कथांचा जन्म होऊ लागला. याच कथा ईरा व्यासपिठावर झळकू लागल्या त्यामुळे त्यांच्या लेखनाला सीमा राहिल्या नाहीत.कदर - तुझी आई असती तर , तिची फरफट , नात्यांचा गोडवा,पडक्या बंगल्यातील गूढ, द स्टंटमॕन,गुंतवणूक नात्यांमधली, नात्यांची गुंफण, सूर तेच छेडीता,तिची तपश्चर्या,परत फिरा रे ,सुख म्हणजे नक्की काय असतं, कुरुप, देवता,खरचं अस घडलं, श्रद्धचे वारकरी , घरकूल आपले छान ईरावरील अशा अनेक कथामालिका व लघूकथेतून त्यांनी समाजाची वास्तवता प्रकट केली आहे. ईरावरील चॕम्पियन ट्राॕफी व जलद लेखनमध्ये त्यांनी यश मिळवले आहे. नेहमी बॕंकेत आर्थिक व्यवहारात गुंतलेले मन आत्ता लेखणीतून प्रकट होत आहे हे त्यांच्यातील प्रतिभेला दिलेला न्याय आहे. लिखाणातील सातत्यता यामुळे एक प्रगल्भ लेखिका म्हणून त्यांची वाटचाल प्रेरणादायक आहे.

प्रेमळ व दिलखुलास स्वभाव, सहकार्याची भावना , मनमोकळे संवाद व मैत्रीचे धागे जोडण्याची कला , कुटुंबवत्सल, हरहुन्नरी अशा सीमाजी यांचे जीवन असेच आनंदमय व सुखकारक जावे ही सदिच्छा ..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!