सेरेनेडिंग माय हार्ट भाग २

पाहुणे पाहायला येणार म्हणून घरातला प्रत्येक जण उत्साहाने कामाला लागला आहे.
मागील भागात आपण पाहिले आहे की, अचानक बहिणीच्या पाहण्याच्या आलेल्या कार्यक्रमामुळे भांडणे, हळवेपणं, थट्टा-मस्करी करणे एकंदर सुरु होती. सोबतीली थोडीशी शाॅपिंग करणे देखील सुरु होते.

" आज नैना ताईला आवडते म्हणून सोनिया ताईने पावभाजीचा मेनू बनवला आहे. सोबत नैना ताईचा पुढच्याच आठवड्यात वाढदिवस आहे तर., ताईने तिच्या करता ड्रेस देखील आणला आहे."

" वो छोटे सरकार, वार्ता देवून झाल्या असतील तर जरा आत मदतीला येताय का? "

" हो हो आलोच ताई."

" सगळं काही एका दमात सांगायची कसली घाई रे तुला. किती वेळा सांगितले की, बाहेरुन आलेल्या कोणालाही पहिले पाणी द्यायचे असते. थोडे रिलॅक्स‌ झाले की बोलायचे असते. कधी सुधारणार आहेस तू."

" पुढच्या वेळी लक्षात ठेवते बाई. सांग आता काय करायचं आहे."

" ताट, सॅलड, पाव बाहेर डायनिंग टेबलावर ठेव. भाजीचे पातेलं मी बाहेर आणते. गरम आहे जरा. चटका बसून तू सगळी भाजीचं इकड-तिकडे सांडवली मग."

" चार दिवस आलीच आहेस तर जरा शांत बस की तू नैना. नाहीतर उगाच मी काही बोललो तर रडत बसशील मुळूमुळू. इथं मला भाजल्यावर वेदना होतील हे नाही दिसायचं का तुला."

" आता खाण्याच्या वेळी भांडणाचा सूर नका रे लावू. एवढा मस्त बेत बनवला सोनिया ताईने. जरा तिच्या पण मनाचा विचार करा."

" बाबा बरोबर बोलता तुम्ही." राहूल समजूतदारपणा दाखवत बोलत होता.

" तायडे काय बनवलीस पावभाजी. अफलातून, काय परफेक्ट चव. जरा सुद्धा मीठ कमी - जास्त नाही. मला तर जाम आवडली बघ भिडू."

"काय ग ही तूझी भाषा नैना."आश्चर्याने बाबा नैना कडे पाहून बोलत होते.

ती रात्र गप्पा-गोष्टी करण्यात निघून गेली होती. दुस-या दिवशी सोनिया आणि नैना घरातला किरकोळ बाजार, शाॅपिंग करण्यासाठी निघून गेल्या होत्या.

" ताई, अग बघ हा लायरा कट. या ड्रेसची खूप फॅशन आहे सध्या. आपण दोघी जुळ्या बहिणी दिसू. तुला हा आॅरेंज कलरचा घे आणि मी हिरव्या कलरचा घेते."

" मला कशाला उगाच. नको अग. हवतर तुला आणखी एक नविन पॅटर्नचा ड्रेस घे. मी काय घर ते आॅफिस करत असते. तू काॅलेजला आहेस. या वयात सतत काहीतरी नविन घालण्याची, सजण्याची इच्छा होतच असते की."

" आता तुझे जमल्यावर लग्न होणार आहे तर, तू काय लगेच काकू बाई सारखी बोलायला लागली आहेस."

" काही पण तुझे आपले. चल घे मग तुला आवडत आहे ना. तुझ्या इच्छेखातर मी ड्रेस घ्यायला तयार आहे."

दोघीजणी शाॅपिंग करुन घरी आल्या होत्या. त्यांना एकदम शाॅक लागला होता. राहूलने चक्क बाबांच्या मदतीने स्वयंपाक सगळ्यांसाठी बनवला होता.

" आज दिवस कुठे उगवला आहे. चक्क बाबा आणि राहूल किचन मध्ये जावून स्वयंपाक कसा काय बनवला."

" वाजलेत किती माझ्या तायांनो, ते पहा. इथून पुढे कधी जेवण बनवणार तुम्ही? आम्ही ते किती वाजता खाणार?"

" मी एकटी असते तर झाला असता टाईम. पण माझ्या जोडीला नैना आहे ना सोबत. पंधरा ते वीस मिनिटात अस्स जेवण तयार होईल बघ."

" असं नाही ग पोरी. उद्या तुला पाहुणे पाहायला येतील. ते जमले की तुझे लग्न होणार. नैनाच पण काही वर्षाने लग्न होणार. मग तुम्ही आपल्या संसारला लागल्यावर आम्हांला नको का सवय करुन घ्यायला या सगळ्याची."डोळ्यातले जमा झालेलं अश्रू पुसत बाबा बोलत होते.

" या राहुलची बायको म्हणजेच तुमची सून येईल ना तुम्हांला भाकरी बनवून द्यायला."खेळी-मेळीच वातावरण निर्माण करत नैना बोलत होती.

" अरे व्वा. मस्त जमली डाळ आणि बटाट्याची भाजी." सोनिया ताई राहूलकडे पाहत बोलत होती.

" मस्त रे खरचं. मला वाटलं ताई तुला बरं वाटावं म्हणून बोलते का काय."

" माझ्याबद्दल पण कोणी बोला रे. ८०% मदत तर मीच केली आहे."

" बाबा तुम्ही फक्त बेसिक गोष्टी केल्या, चिरणे, पीठ मळणे. बाकी तर भाजीला फोडणी, चपाती, डाळ मीच बनवल्या ना."

" जे काम मी केलं आहे तेचं काम खरतर महत्वाच आहे."

" चला वाद घालू नका. दोघांचेही कौतुक आहे. जेवण करुन घ्या लवकर.आमचे जेवण संपत देखील आले आहे."

" हे काय झालेच बघ आमचे पण. "

आजची सकाळ सोनियाच्या आयुष्यातील महत्वाची सकाळ होती. ती आनंदाने दारापुढे रांगोळी काढत होती. घरातल्या टेबलावर गुलाबाच्या फुलांचा गुच्छ चार चांद लावत होता. गोड पदार्थ म्हणून सोनियाने नारळाची बर्फी आणि गुलाबजाम बनवले होते. इडली, सांबर आणि चटणीचा बेत बनवून सोनिया जणू तिला पाहायला येणाऱ्या मुलाचीचं वाट पाहत होती.

इतक्यात दरवाजाची बेल वाजल्याचा आवाज येत होता. दार उघडताच राहूलच्या बोलण्यावरुन पाहुणे मंडळी आले असल्याचे त्यांचे स्वागत करताच लक्षात आले होते. बाबांनी घाईने नैनाला आता खोलीच्या बाहेर न‌ येण्यास सांगितले होते. काका-काकूंना आजच्या कार्यक्रमाकरता बोलावून घेतले होते. ते देखील बोलावले म्हणून येण्याची जबाबदारी निभावत होते. उद्या बाहेरच्यांनी नाव ठेवू नये म्हणून खरतरं येवून त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. एरव्ही ते कोणत्याच सण, उत्सवाला एकत्र जमत नव्हते.

क्रमशः

🎭 Series Post

View all