सेरेनेडिंग माय हार्ट भाग ५

साखरपुड्याची तयारी जय्यत सुरु आहे.
मागील भागात आपण पाहिले सोनियाचे लग्न फिक्स झाले आहे. साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीला सर्वजण लगबगीने सज्ज झाले आहेत. आता पाहूया पुढे काय घडते ते,

" सोनिया आले ग बाळा मी. एवढीशी होतीस बाहुली सारखी तू. आता तुझे लग्न होणार मला भरुन आले बघ." डोळ्यातले पाणी पदराने पुसत आजी सोनियाला बोलत होती.

" आजी काय ग तू आल्या आल्या सुरु झालीस. जरा बस थोडावेळ पाणी घे.नाहीतर तुझे अश्रू बघून मला पण रडायला येईल बर का? "

" नको‌ नको लेकरा तू नको रडूस. तुझी आई गेल्यापासून घराला तूझ्या आईच्या मायेची ऊब दिलीस. आता कुठे तुझ्या आयुष्यात सुख आले. आता तू फक्त हसायचं. आणि आनंदात राहायचं."

" आज्जे आणि काम कोण करणारं ग. आता तर लग्नाच काम तुला तर माहितीचं आहे किती असतात ते."

" अग मग हि बकुळा कशासाठी आहे. तिला मुद्दामच घेवून आले मी."

" ताई साहेब मला एकदा किचन मधले सगळे सामान भांडी दाखवून द्या. म्हणजे तुम्ही आराम करायला निवांत आहात बघा."

" तुमच्या मदतीला आहेच की मी. सारखा आराम करुन थोडीच चालणार."

" सोनिया साखरपुड्याची तारीख निघाली बर का? दोन महिन्याचा मुहर्त निघाला आहे. राहूल बर झाला तू आलास. नैनाला फारसा त्रास देता येणार आहे. तिचं काॅलेजचे शेवटचे वर्ष आहे ना? "

" बाबा तुम्ही नका टेन्शन घेवू. मी आणि माझे काही मित्र आहेत सोबतीला."

" खंबीर असा तरुणाईचा जोश पाहून मला पण धीर येत आहे रे बाबांनो काम करायला." किचन मधून आवाज देते आजी बोलत होती.

"आजी तू तो अभी भी जवान है| हम तो कुछ भी नही." राहूल आजीला आवाज देत बोलत होता.

" बर चला नैनाला बोलावून घ्या. खरेदी करायला लागेलं ना परत. सोनियाला साडी, नैनाचीचं जास्त तयारी असणार बघा."

" आई अग तिला सांगून ठेवूया. पण तिला लवकर नको बोलवायला तिचं महत्वाच वर्ष आहे अग. ती आत्ताच सोनियाला पाहुणे बघायला आले होते तेव्हा येवून गेली होती. तिला मी फोन करुन सांगतो. साखरपुडा तर आहे आधल्या दिवशी ये."

" हॅलो नैना अग सोनियाच्या साखरपुड्याची तारीख फिक्स झाली. दोन महिन्यानंतरचा मुहर्त आहे. तू तशी सुट्टी घेवून ये एक दिवस आधी."

" हे काय बाबा, तायडीचा साखरपुडा आहे.मी एक दिवस नाहीतर आठ दिवस आधी येणार. आणि सगळी काम करु लागणार आहे. शिवाय मला पण खरेदी करायची आहे बाबा? "

" अग पोरी मला वाटलचं होते तू असेच करशील. अभ्यासाकडे लक्ष दे. परीक्षा पण जवळ आली आहे तूझी. चांगल्या मार्कांनी पास व्हायला हवी तू."

" बाबा मी माझा अभ्यास सांभाळून ताईच्या साखरपुड्याची सगळी तयारी करणार मी. प्लीज बाबा मी आठ दिवस आधीच येणार. येवू‌ द्या ना."

" बर बर ढंपे कर तुझ्या मनासारख करं"

" बाबा किती दिवसांनी तुमच्या तोंडून हा शब्द ऐकला आहे."

" बर चल ठेवतो आता फोन. आजी बोलवते आहे तुझी."

" आजी कधी आली बाबा? "

" अग चार-पाच दिवस झाले. सोबत बकुळा मावशी पण आली आहे."

" बर झाले ताईच्या मदतीला आली आहे ती."

" हो चल आता खरच ठेवतो फोन मी."

" अरे पाहुणे मंडळी या ना. बकुळा मावशी पाणी आणा.आधीच फोन करुन सांगायच ना? जेवण बनवलं असतो वो."

" नातेवाईकाचे लग्न होते जवळचं म्हटले तुमची भेट घ्यावी. पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे. त्याकरता काही तुमच्याकडच्या पद्धती, आमच्या कश्या यावर सविस्तर समोरा समोर बोललेल बर नाही का? "

" काय तुम्ही सांगाल तसे करुया की. हि माझी आई आहे. आणि या आमच्या बकुळा मावशी."

" नमस्कार, आई. पाहण्याच्या कार्यक्रमाला नव्हत्या का तुम्ही."

" आईची तब्येत नेमकी तेव्हा बिघडली होती. म्हणून तर साखरपुड्या करता दोन महिने आधीच बोलावून घेतले."

" लग्न होईपर्यंत आईंना इथेच ठेवून घ्या. कारण मी अजून एक आनंदाची बातमी घेवून आलोय."

" थांबा थांबा, आम्ही आजच आजींनी बनवलेला मोतीचूरचा लाडू घेवून येते. त्यानंतर तुम्ही आनंदाची बातमी सांगा आम्हांला." बकुळा किचनच्या दिशेने जात पाहुण्यांना उद्देशून बोलत होती."

" बर ऐका आता. आमच्या गुरुजींनी लग्नाचा मुहर्त साखरपुड्यानंतर बरोबर तीन महिन्यांनी सांगितला आहे."

" काय सांगताय? मनातलं बोलला अगदी."

" एवढ्या कमी वेळात तयारी होईल का आपली." आजी पाहुण्यांकडे पाहत बोलत होती.

" अहो तयारी काय फक्त मुलगी आणि नारळ द्यायचा. बाकी बस्ता आपण सोबत बांधूया. देण्याघेण्याच्या साड्या आणि टोपी, टाॅवेल आमच एक होलसेल दुकान आहे मित्राचे पसंद पडले तर तिथेच घेवूया."

" चालेल ना. साखरपुडा झाला की, आपण लगेच लग्नाच्या तयारीला लागूया."

" चला आता येतो आम्ही भेटूया साखरपुड्यालाच."

साखरपुड्याची तारीख जवळ येत होती तशी सोनिया स्वत:च्याच विश्वात जगत होती. मधेच मनात हसत होती. हे आजीच्या नजरेतून सुटले नव्हते.
साखरपुडा अवघा आठवड्यावर येवून ठेपला होता. खरेदी बाकी होती.

" आजी, तायडे मी आले."

" गुणाची बाय माझी. राहून राहून तुझीच आठवण काढत होते बघ सारखी मी."

" आता आले ना मी. चिंता नको करु. तुला कोणत्या रंगाची साडी घ्यायची आजी. मी तुला आणि मला सेम रंगाची साडी घेणार आहे."

" अग माझ काय मधेच. जिचा साखरपुडा आहे तिला विचारशील का नाही? "

" तायडे कधी जायचे खरेदीला."

क्रमशः

🎭 Series Post

View all