मागील भागात आपण पाहिले, साखरपुडा ठरला आहे साखरपुडा अवघा आठ दिवसांवर आलेला होता. मधेच मुलाकडच्या पाहुण्यांनी येवून लग्नाची तारीख कळवून आनंदाची गोड बातमी दिली होती. नैना देखील हाॅस्टेलवरुन साखरपुड्याच्या खरेदी करता घरी आली होती. आता पाहुया पुढे,
" अग यांचा फोन आला होता. साडी आणि अंगठी घ्यायला ते उद्या येणार आहेत. बोलले सोबत जावून खरेदी करुया."
" यांचा फोन का? आम्हांला कोण विचारयतयं बबा आता. जा तू. मी आणि आजी दोघी जातो शाॅपिंगला मग."
" मला खरच माहित नव्हते अग. मी तुला घेवून खरेदीला जाणार होते. तुझ्या करता थांबले पण होते मी."
" माहिती आहे ग ताई मला. जरा तुझी मज्जा केली. जा तू. मी बाबा, राहूल, बकुळा मावशी आणि आजीची खरेदी करुन येते."
" बघ तू आलीस आणि काम कशी पटापट मार्गी लागायला लागली आहेत."
" हो का मला माहिती आहे तू मला मस्का मारत आहेस ते. मी नाही चिडले तुझ्यावर जा खरच तू अग जिजूंसोबत."
" नैना अग मी माझ्या मित्रांसोबत जावून बाबांना आणि मला लखनवी कुर्ता आणि पायजमा घ्यायला जाणार आहोत."
" मी मग मावशी, आजी आणि माझी खरेदी करुन घेते."
" आजी तुला सांग कोणता कलर आवडतो. आपण दोघी मस्त ट्विनिंग करुया."
" तुला जो रंग आवडतो त्याच रंगाची साडी आण मला."
"मावशी तुझा आवडता रंग कुठला ग?"
" मला केशरी कलर खूप आवडतो."
" नैना तुला आवडणारे ड्रेस आणि साड्या आत्ताच घेताना जास्त घे. लग्नाची तारीख पण फिक्स झाली."
" आजी ने मला आल्या आल्याच सांगितले होते. अजून तीन महिने आहेत त्याला. तोपर्यंत या फॅशनची साडी आणि कपडे जुने होवून जातात."
" बर तुला हवं तसे कर. पण अभ्यासाचे तेवढे लक्षात असू दे."
" हो बाबा नका टेन्शन घेवू तुम्ही. अभ्यासाची देखील जोरदार तयारी चालली आहे माझी. आता मला ताईचा साखरपुडा एन्जाॅय करायचा आहे."
" बर बर जा तुम्ही खरेदीला. लवकर या आणि."
" आजी नाही येत सोबत. मावशी आणि मी जातो. काकू आणि काकांना पण कपडे घेवून येतो आम्ही."
" अग काय ग एवढ्या पिशव्या घेवून आलात? काय आणले त्यात एवढे? "
" अग मावशीचा आवडती केशरी साडी खूप सुंदर मिळाली बघ. तुला आणि मला जांभळ्या रंगाची लाल काठ असलेली साडी घेतली बघ. काकूला मोरपंखी काठ पदराची साडी आणि काकांना मस्त जॅकटेचा कुर्ता आणला बघ."
" अग किती सुंदर दिसते हि साडी. मला खूपच आवडली. लग्नाला पण याच सुतात साडी हवी मला."
" हो तेव्हा आपण परत खरेदी करुया आजी."
" ताई आलीस का तू. दाखव ना तूझी खरेदी मला."
" अग साड्या फाॅल -पिको करुन नंतर देणार आहेत. त्याचा ब्लाऊज पिस आणि फोटो दाखवते तुला."
" वाव ताई जिजूंनी तुला दोन साड्या आणि दोन ड्रेस, पर्स, मेकअप किट मजा आहे एका मुलीची. जिजूंना सांग सालीला पण एखाद गिफ्ट दिल तरी चालेल."
" तूच सांग फोन करुन त्यांना."
" नाही ग ताई मजा चालली आपली. आम्ही पण खरेदी करुन आलो. आजी, मावशी, काका, काकू ला कपडे आणि साड्या घेतल्या."
" आपण उद्या माझा ब्लाऊज,ज्वेलरी आणि पार्लर मधे ट्रायल घ्यायला जावूया."
" हो मला पण कानातले आणि किचन घ्यायचे आहे. मैत्रिणींना हवे आहे. त्यांनी फोन करुन सांगितले आहेत मला आणायला."
" चला झाली एकदाची खरेदी मनसोक्त आपली. आता उद्याचा दिवस कधी उजाडतोय अस झाले असेल ना एका मुलीला राहूल."
" हो ना. आणि नंतर आपल्याला कोणी विचारणार पण नाही."
" ऐ काय तुमचं सारख चिडवणे चालले. मी बाबांना आणि आजीला तुमचं नाव सांगेन बर का?"
" कोण बोलतय माझ्या बाळाला. सासरी गेल्यावर आम्हांला विसरु नको बर का? "
"बाबा, आता तुम्ही पण सुरु झालात का? "
" ये ग माझ्या दुधावरची साय. तुझी दृष्ट काढते बघ मी. कशाला चिडवता तिला."
" तुम्ही सगळे एका बाजूला आणि माझी आजी एका बाजूला. आता कसं वाटतय आजीने रागवल्यावर."
सगळे जण हसत-खेळत उद्याच्या क्षणाची वाट पाहत होते.
सोनिया गुलाबी साडीत राजकुमारी दिसत होती.
" आजी काय हिराॅईन दिसते ग तू. धर माझा हा गाॅगल लाव. आपण तुझा मस्त फोटो काढूया."
" राहूल थांब ना आम्हांला पण येवू दे फोटो काढायला."
" आजी स्पेशल फोटोग्राफी झाली की तुमचा नंबर. आधी आजी."
" माझे कसले फोटो काढतो या वयात. या आपल्या गोड परीराण्या आहेत त्यांचे काढ."
" आजी त्यांच्यापेक्षा तू काय कमी आहेस का? तू तर त्यांना पण मागे टाकले आहेस."
" चला हाॅलवर जायला हवं आपल्याला. राहूल अंगठी तुझ्याजवळ ठेव. सोनिया तू आणि नैना या गाडीत बसा आजी आणि मावशींना पण घ्या. काका, राहूल आणि काकू आम्ही येतो मागच्या गाडीतून."
" उशीर नका करु बाबा."
" अग गाड्या एकामागून एकच येणार आहेत."
" या या राजेशराव स्वागत आहे आपले. "
" चला मुहर्तावर साखरपुडा झाला पाहिजे. नवरा मुलगा आणि नव-या मुलीला इथे उपस्थित राहायला सांगा." पूजारी काका हाक मारुन बोलवत होते.
" हे काय आलेच दोघे." राहूल सांगत होता.
" पूजा संपन्न झाली. आता दोघांनी एकमेकांना अंगठी घालून कार्यक्रम पार करुया." पूजारी काका सांगत होते.
" जिजू ताईला गुडघ्यावर खाली बसून अंगठी घाला." नैना बोलत होती.
" हो सालीजी तसच करणार होतो मी."
टाळ्यांच्या कडकडाटात सारखपुड्याचा कार्यक्रम पार पडला होता.सर्व नातेवाईक फोटो काढायला राजेश आणि सोनिया भोवती गर्दी करत होते.
" अग नैना बास झाले. त्या दोघांना फोटो काढून देशील का नाही."
" तू शांत बस मी काढणार फोटो. अजून आहे की वेळ त्या दोघांना फोटो काढायला."
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा